#Kalnirnay is a yearly almanac for all religions. It gives simplified information about the Panchang, auspicious days, festivals,horoscope,recipes and articles.
Feb 27, 2020 • 5 tweets • 3 min read
१. ऋचा मायी. दिल्ली.
‘..आणि हिशोब चुकता झाला !’
पूर्वाला बळजबरी तो दवाखान्यात घेऊन गेला.आज सोक्षमोक्ष लावायचा होता. सात महिने पूर्ण झाले होते,आता गर्भपात अशक्य होता.पण तिच्या पोटात मुलगी आहे कळल्यापासून सासरचे अस्वस्थ झाले होते..
अखेरीस डॉक्टरच्या संगनमताने अवैध गर्भपाताच्या प्रयत्नात जीव गमावला तिने.. तिच्या मृत्यूने घाबरून हे क्रौर्य वैध ठरवायला गर्भधारणेची खोटी तारीख दाखवण्याची पूर्ण कागदपत्र बनवली होती. अवैधरित्या गर्भपात करून लेकीचा जीव घेतल्याची तक्रार तिच्या हताश वडीलांनी केली.