Hope is dengerous thing, hope can drive a man insane.
May 8, 2023 • 4 tweets • 1 min read
हायफाय हॉलबाहेर बेपर्वा श्रीमंतीनं फेकलेल्या अर्ध्या रित्या पाण्याच्या बाटल्या भंगारवाला झाडांच्या मुळात ओतत होता.एकाच ठिकाणी न ओतता रस्त्यावरच्या अनेक झाडाना पाणी घालत रिकाम्या केल्या.हा फोटो संवेदनशील निवृत्त पोलीस आयुक्त अजीतदा देशमुखांनी काढला असून खालील काव्य रचना कोणी (१/४)
केली,हे मला माहिती नाही.🙏
वरवर बघता वाटत असेल,
याचा धंदा केवळ भंगार!
उपेक्षेच्या जगण्यालाही,
याने केला आहे शृंगार!
वजन कमी करण्यासाठी,
पाणी ओततो मुळावर!
आतमधे सजली माणसं,
अतृप्तीच्या सुळावर!
भंगारवाला नसेल तर,
बकाल होईल सगळं जग!
ए.सी.ची तर वृत्ती अशीच,
आत गारवा,बाहेर धग!(२/४)
May 7, 2023 • 5 tweets • 1 min read
कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीला आक्टोबर १८९२मध्ये स्वामी विवेकानंदांचा पदस्पर्श झाला आणि स्वामीजींच्या इथल्या वास्तव्यात इतिहासात नोंद करुन ठेवाव्यात अशा मौलिक घटना घडल्या याबद्दलचे अनेक संदर्भ शोधून आणि अभ्यासून'स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान' हा ग्रंथ साकार झाला आहे.(१/५)
आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांनी देह ठेवल्यानंतर सन १८८८ मध्ये स्वामी विवेकानंदांनी आपल्या परिव्राजक काळात कलकत्यापासून सुरवात करीत भारताच्या उत्तरेपासून दक्षिण टोकापर्यंत भारतभ्रमण केले. या परिव्राजक काळात त्यांनी कोल्हापूर शहरास आक्टोबर १८९२ मध्ये भेट दिली. कोल्हापूरच्या (२/५)
May 7, 2023 • 4 tweets • 1 min read
१. टूर ऑपरेटर लोकांच्या गो एअर संदर्भात पेपरात जाहिराती येत आहेत.
२. त्यांचा सूर असा आहे की पैसे जरी आम्ही घेतले असले तरी त्यांचं विमान कॅन्सल झालं ही आमची जबाबदारी नाही. त्यांच्याकडून रिफंड आला तर तुम्हाला देऊ अन्यथा…सब चंगासी…
३. ज्यांचे असे टूर्सचे वांदे झाले आहेत, अशा (१/४)
लोकांनी एकदा लिखित स्वरूपात टूर ऑपरेटरशी बोलून घ्यावं.
४.जर पैसे बुडण्याची किंवा टूर रद्द होण्याची चिन्हं दिसत असतील तर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टची पोलीस कंप्लेंट कन्सुमर फोरमची केस अवश्य करावी. टूर ऑपरेटरच्या मालक कम CEO/MDवगैरे लोकांस त्यात वैयक्तिक जबाबदार म्हणून लिहावं. (२/४)
May 7, 2023 • 4 tweets • 2 min read
पंढरपूर शहरामध्ये सतरा वर्षांपूर्वी रक्तदान शिबिर घेण्यासाठी अथवा रक्तदान चळवळ उभा करण्यासाठी ज्या व्यक्तीने प्रेरणा दिली ज्यांच्या दिशेमुळे आज एवढे मोठे रक्तदान शिबिर आम्ही दरवर्षी भरवत असो की व्यक्ती म्हणजे डॉक्टर अशोक दोशी. बजाज रक्तपेढी ची स्थापना करून पंढरपूर शहरातील (१/४)
रक्ताची गरज भागवण्यासाठी त्यांनी तीस वर्षांपूर्वी पंढरपुरामध्ये ब्लड बँक स्थापन केली आणि गरजू रुग्णांना रक्ताची उपलब्धता करून दिली. आत्ताचे अरिहंत पब्लिक स्कूल जुने इंग्लिश मीडियम हे सुद्धा डॉक्टर अशोक दोशी यांच्या प्रेरणेतूनच स्थापन झाले. याच शाळेतून हजारो विद्यार्थी आज (२/४)
May 5, 2023 • 6 tweets • 2 min read
नानाजी देशमुख यांची राजकीय निवृत्ती
शरद पवार यांच्या निवृत्तीचे कवित्व सुरू आहे. शरद पवार सक्रिय राजकारणात राहणारच आहेत पण या निवृत्ती चर्चेत महाराष्ट्राच्या एका भूमिपुत्र असलेल्या नानाजी देशमुख यांच्या निवृत्ती आणि निवृत्तीनंतरचे आयुष्य यांची आठवण येते. जनसंघाचे राष्ट्रीय (१/६)
नेते म्हणून नानाजी ओळखले जात. आणीबाणी नंतर जनता पक्षाची निर्मिती आणि सरकार स्थापना यात त्यांची महत्वाची भूमिका होती. पण वयाची ६०वर्षे पूर्ण होताच नानाजी यांनी दिल्लीच्या राजकारणात महत्वाची भूमिका असतानाही निवृत्ती घेतली व उरलेल्या आयुष्यात उत्तरप्रदेशात आरोग्य, शिक्षण, (२/६)
May 1, 2023 • 12 tweets • 2 min read
जोशीकाका पुणे महानगरपालिकेतून निवृत्त झाले त्याला ४-५ वर्षे होऊन गेली होती. काकांना ना चित्रपटांची आवड ना TVवरच्या मालिकांची.
त्यामुळे निवृत्तीनंतर ते टाईमपास कसा करतात हा त्यांच्या मित्राला पडलेला यक्षप्रश्न.
"जोशा, लेका तुला ना काही छंद, ना वाचनाची आवड, ना अध्यात्माची. (१/१३)
रिटायर झाल्यावर टाईमपास तरी कसा करतोस तू?"
जोशीकाकांना आपल्या मित्राच्या भोचकपणाची,नसत्या चौकशा करण्याच्या वृत्तीची चांगली कल्पना होती. त्याच्या डोक्यात एकदा हा कीडा वळवळला आहे म्हणजे त्या शंकेचं निरसन होईस्तोवर तो आपल्याला काही सुखाने जगू देणार नाही हेही त्यांना ठाऊक होतं.(२/१२)
Apr 30, 2023 • 6 tweets • 2 min read
हिटलरचं सगळं झकास चाललेलं होतं. म्हणजे त्याच्या फौजा धडाधड जिंकत होत्या. बलशाली देश कोसळत होते. विन्स्टन चर्चिलने ब्रिटन कसेबसे राखले होते. १९३३साली सत्तेत आल्यापासून हिटलरचे जे महिमामंडन सुरू होते ते अगदी १९४१च्या उन्हाळ्यात शिगेला पोचले होते.
पण, २२जून१९४१ला हिटलरच्या फौजा(१/६)
सोव्हियेत युनियनमध्ये घुसल्या आणि परिस्थितीचे फासे पलटायला सुरुवात झाली. १९४२च्या मार्चपर्यंत हे स्पष्ट झालं होतं की जर्मन फौजा रशियन बर्फात फसल्या आहेत.
१९४२पासून अशी नामुष्कीची चिन्हे असली तरी खोट्या राष्ट्रवादाची झिंग चढलेल्या जर्मन नागरिकांना त्याची आजिबात कल्पनाच नव्हती(२/६)
Apr 28, 2023 • 12 tweets • 4 min read
पहिले बाजीराव पेशवे हे मराठी मातीला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं.
छत्रपती संभाजी महाराजांच्या नृशंस हत्येनंतर महाराष्ट्रभूमीत जो जाज्वल्य यज्ञ उसळला, त्या यज्ञातुन निघालेले तेजस्वी अमृत म्हणजे थोरला बाजीराव पेशवा. त्या सत्तावीस वर्षाच्या धगधगत्या स्वातंत्र्य समरातून जे (१/१२)
युद्धकौशल्य मराठ्यांना गवसले, ते संपुर्ण पचवून त्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा रणनायक समरधुरंधर म्हणजे थोरला बाजीराव पेशवा.
वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी आपल्या वडिलांसह दिल्लीच्या वेशीवर काही एका निश्चयाने उभा राहिलेला बाजीराव हे एक वेगळंच रसायन होतं.
विसाव्या वर्षी (२/१२)
Apr 28, 2023 • 4 tweets • 3 min read
कोणत्याच मेंढपाळाला कळप सोडणारं मेंढरू आवडत नाही. शंभर मेंढ्या कळपात नीट चालतील, पण ह्या अशा एक-दोन मेंढ्या गटात राहत नाहीत, त्यांचं आपलं वेगळंच चालू असतं. कळप एकीकडे अन हे एक-दोन दुसरीकडे. मेंढपाळाची उरलेल्या 98 मेंढ्या सांभाळायला जितकी ताकद खर्च होते, तितकीच किंबहुना (१/४)
त्यापेक्षा जास्त ऊर्जा ह्या दोन मेंढ्यांचा सांभाळ करायला खर्च होते.
मेंढपाळालाही शेवटी जीवाला शांती हवी असते, शिवाय ह्या दोन्हीच्या मागे लक्ष देता देता उरलेल्या 98 कडे दुर्लक्ष नाही झाली पाहिजे, अशी त्याची धारणा असते.
दोन मेंढ्या लै बाराच्या असतात. त्यांना कळपाचं डोकं मंजूर (२/४)
Mar 27, 2023 • 4 tweets • 1 min read
मनुष्य म्हणजे एक रंजक रसायन असते.
कुणा एकात कमालीचा वेडेपणा ठासून भरलेला असतो. वेड प्रत्येकात असते..नसतो तो वेडेपणा ..
वेड म्हणजे आतल्या आत धुमसणारी विचित्र विक्षिप्त आग.. नशा ..किंवा सभ्य भाषेत आवड..
आणि वेडेपणा म्हणजे ती आग स्वतःला लावून घेणे.
एकदा पेटले की जन्मभर पेटतेच..(१/४)
पण
स्वतःच्या हाताने हा वेडेपणा मात्र करता यायला हवा.
इट हॅपन्स ...
I didn't do anything by half.
सुख द्यावं आणि घ्यावं.
इट has to be mutual ! तरच नातं खुलतं.
त्याच त्या गप्पा नव्यानं मारल्या तरी ...अशावेळी त्याच त्या प्रतिक्रियांची हावभावांची आणि संभाषणाची टवटवी कधीच कोमेजत (२/४)
Mar 27, 2023 • 4 tweets • 1 min read
काही लोक सापाचे तोंड ठेचायला घाबरतात इथवर ठीकच.. त्याचा मणका तोडणारा घाव घातला तरीही काम होण्यासारखे असते.. तेही जमत नसेल तर शेपूट बडवून साप किरकोळ जखमी होईल मात्र त्याचे मोठे नुकसान संभवत नाही. मात्र त्याही पेक्षा बावळट लोक.. कधीकाळी सापाने सोडून दिलेल्या कातेवरच तुटून (१/४)
पडतात तेव्हा हास्यास्पद ठरतात.
साप इतकेही निर्बुद्ध नसतात की, कातेत आपला काही ऐवज शिल्लक ठेवून जातील. उलट ते अशी कात बडवनारावर घात लावून लक्ष ठेवून, योग्य टायमिंग साधून करेक्ट कार्यक्रम करु शकतात.
तात्पर्य साप आपल्या स्वभावानुसार वागणार. तुम्ही तुमच्या बावळट स्वभावानुसारच (२/४)
Mar 27, 2023 • 5 tweets • 1 min read
नव बौद्ध, लेफ्टिस्ट, फेमिनिस्ट ह्या सर्वांचे म्हणणे असते की उच्च जातीय हिंदू आमच्याकडे समान नजरेने बघत नाही.
अठराव्या शतकाच्या शेवटी जाती पडल्या आर्थिक विषमतेने. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश सत्ता भारतभर पसरल्यावर ही विषमता वाढतच गेली.
म्हणूनच जातिभेदाचे व त्याच्याविरुद्ध (१/५)
लढ्याचे उदाहरणे एकोणिसाव्या शतकात सुरू झाले.
त्यापूर्वी श्रीमंत म्हणून गणले जे जात असत, आमिर उमराव, सरदार, यांच्या विरुद्ध कोणीच बोलत नसे.
शस्त्राच्या भरोशावर मिळवलेला पैसा हा बहुतेकांना अनैतिक वाटत नाही. (म्हणूनच money heist सारख्या series मध्ये जे villain असायलाच हवे (२/५)
Mar 27, 2023 • 4 tweets • 1 min read
आदिमायेच्या पोटातून एकीकडे गुणमाया किंवा प्रकृती बाहेर पडते आणि त्या प्रकृतीला पाहण्यासाठी ईश्वर पुरुष बनतो. प्रकृतीच्या पोटातून पडणाऱ्या विभूतींपैकी पिंड किंवा जीव ही विभूति विशेष आहे. प्रत्येक जीवा मध्ये ईश्वर पुरुष रूपाने राहतो. जीव सूक्ष्म व जड देहाचा बनलेला असतो. (१/४)
जडदेह पंचमहाभूतांचा तर सूक्ष्मदेह वासनांचा बनलेला असल्याने पुरुष,वासना व पंचमाहाभूते मिळून जीव रचला जातो. त्यामध्ये पंचकोश (अन्नमय, प्राणमय, मनोमय,विज्ञानमय आणि आनंदमय) तीन अवस्था पण असतात. चौथी तुर्यगा या मध्ये शिवो$हं हा अनुभव स्वरूप असल्याने जीवाची अवस्था बदलून जाते. (२/४)
Mar 25, 2023 • 7 tweets • 2 min read
राहुल गांधी... एक सामंतशाही विकृती !
देशात कालपासून एकच चर्चा चालू आहे,ती म्हणजे काँग्रेसचे राजकुमार राहुल गांधी यांच्या खासदारकी वरुन उचलबांगडीची.
मुळात एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की, राहुल गांधींची खासदारकी ही कोर्टाने दिलेल्या निकालानंतर संविधानात दिलेल्या नियमानुसार (१/७)
गेलेली आहे, पण जो परिवार स्वत:ला संविधानापेक्षा मोठा समजतो त्यांना हा निकाल झोंबला नसता तरच नवल होते.
राहुल गांधी हे सामंतशाहीचे प्रतिक आहे, आजही त्यांना असे वाटते की हा देश म्हणजे आपल्या बापजाद्यांची प्राॅपर्टी आहे आणि या देशातील सर्व नागरिक हे आपले गुलाम!
आणि याच (२/७)
Mar 25, 2023 • 6 tweets • 4 min read
- भ**; च्यु**; ह**खोर वगैरे शिव्या जाहीरपणे उच्चारणारे माननीय खासदार.
- सर्व विधीमंडळाला चोर म्हणणारे..
- एका जातीच्या संवेदनशील प्रश्नावर काढलेल्या मूक मोर्चाला ‘मुका मोर्चा’ म्हणून टिंगल करणारे...
- सर्व गुजराथी ठग असतात असं परवाच बोललेले एक मान्यवर उपमुख्यमंत्री. (१/६)
- ‘गंगू तेली’ म्हणून जातीवाचक हिणवणारे नेते.
- सोशल मिडीयावर असंच काही आडवळणाने किंवा प्रत्यक्ष लिहिल्यानं लोकांना दोन दोन महिने तुरुंगात डांबलं तेंव्हा आपणच मुमं होतात.
- गोमूत्र, शेंडी- जानवं Jibes वापरून जाती- धर्माचा उपहास आपणही केलेला आहे.
- ज्यांच्या बचावार्थ आज आपण हे(२/६)
Mar 24, 2023 • 10 tweets • 2 min read
शिकार
परवा एक चित्र पाहण्यात आलं. एका चित्त्यानं एका माकडीणीची केलेली शिकार आणि तरीही तिच्या पोटाला बिलगून बसलेलं तिचं लेकरू तेही जिवंत......
शिकार करुन विजयाच्या उन्मादात चाललेला चित्ता आणि त्यानं त्याच्या तोंडात पकडलेली निष्प्राण माकडीण.
नाही म्हंटलं तरी ते चित्र पाहुन (१/१०)
मन हेलावून गेलंच. कदाचीत त्या माकडीणी साठी नसेल, पण तीला तेव्हड्याच विश्वासांनं बिलगून बसलेल्या पिल्लासाठी. त्या निरागस लेकराला कदाचीत माहीत आहे का नाही कुणास ठाऊक,की आपल्या आईची शिकार झाली आहे. त्याला एव्हडंच माहीत की आईच्या कुशितील सुरक्षितता जगात कुठेच नाही आणि तितक्याच (२/१०)
Mar 24, 2023 • 6 tweets • 3 min read
कधीकधी काही गोष्टी इतक्या विरोधात जातात कि सगळं संपल्यासारखं वाटत.
काहीवेळेस असंख्य प्रयत्न करूनही मार्ग सापडत नसल्यावर अपयशी झाल्यासारखं वाटतं.
कधीकधी आपण कुठेतरी कमी पडतोय हे जाणवत असतं पण कुठे कमी पडतोय ते मात्र समजत नाही.
कधी इतके नैराश्य आलेले असते कि सगळी सृष्टी (१/६)
आपल्या विरोधात लढत आहे कि काय असा भास होतो...
अशा गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात अनेकदा घडतात. कधी यामुळे प्रचंड नैराश्य येतं, कामात लक्ष लागत नाही, कधी चिडचिड होते.
कुणावर तरी राग काढावासा वाटतो, आदळआपट करावीशी वाटते.
मग कुणावर तरी चिडचिड कर, दरवाजे खिडक्या जोरात आपट, (२/६)
Mar 23, 2023 • 4 tweets • 2 min read
काँग्रेसी ठोंब्याचे प्रमोशन - सोनियाम्मांना मागे टाकले
कितीही मोह झाला तरी लोकांच्या आडनावावरून सरसकटपणा करू नये एवढी किमान अक्कल वयाची पन्नाशी ओलांडूनही आणि बराच काळ सार्वजनिक आयुष्यात व्यतीत करूनही काँग्रेसी ठोंब्याला कळत नसेल तर त्याचे काय करायचे, हा विचार काँग्रेसींनी (१/४)
करायचा आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी धडपणे पार पाडता येत नाही, म्हणून पक्ष्यांचे सोडा; माशीही घाबरणार नाही अशा बुजगवण्याला अध्यक्ष करायचे व स्वत: उधळ-उधळ उधळायचे हा प्रकार चालणार नाही.
याला दोन वर्षांची शिक्षा झालेली असली तरी लगेचच जामीन मिळालेला असल्याने व हा अपिलात जाणार (२/४)
Mar 22, 2023 • 4 tweets • 3 min read
अतिशय गोपनीय मुलाखत: @Awhadspeaks आणि @KokateShrimant यांना P. hD देणार्या त्यांच्या मार्गदर्शकांच्या मुलाखती. कोठे भेटले तर लोक जोडे मारतील म्हणून आपली नावे प्रसिद्ध करू नयेत अशी मार्गदर्शकांनी केलेली विनंती मान्य केली आहे:
हे शब्दश: हिरे आहेत. प्रत्येक मार्गदर्शकाला असे(१/४)
हिरे मिळावेत.
त्यांनी माझ्या अपेक्षेच्याही इतके वरचढ काम केले की त्यांना डबल पीएचडी द्यावी अशी सूचना मी केली होती, शेवटी शेवटी तर आपला विद्यार्थीच ज्ञानाच्या बाबतीत आपल्यापेक्षा वरचढ असल्याची जाणीव आपल्याला झाली होती हे याठिकाणी कबूल करणे गरजेचे आहे. आपला विद्यार्थी जातद्वेष(२/४)
Mar 21, 2023 • 8 tweets • 2 min read
विषेशत: युवा पिढीसाठी…
तुम्हाला देशाच्या सुरक्षाव्यवस्थेविषयी काहीही माहीत नाही हरकत नाही(?) तुम्हाला देशाच्या सुरक्षेत रात्रंदिवस झिजणाऱ्या सुरक्षा बलांची(BSF, CRPF, SSB, ITBP, CISF, ASSAM RIFLE) साधी नाव वा त्यांच फूलफॉर्म देखिल माहीत नाहीत, त्यांची कार्य प्रकारवैगेरे(?)(१/८)
हरकत नाही, बाकी आर्मी डे, शौर्य दिवस, कमांडोचे प्रकार किंवा व त्यांचे कार्य , सर्जिकल स्ट्राइक, गोपनीय कार्य करणार्या शाखा ही माहित नसतील(?) हरकत नाही, का तर त्यांच्या बद्दल माहीती असायलाच पाहीजे सक्ती नाही किंवा तो तुमचा क्षेत्रही नाही वा त्या माहीतीची तुम्हाला कुठे गरजही(२/८)
Feb 10, 2023 • 11 tweets • 2 min read
सलवा जुडूम'चे नेते, माओवाद्यांशी संघर्ष करत नक्षल पीडितांसाठी झटणारे के. मधुकरराव अनंतात विलीन.
दंडकारण्य...हा एक असा पौराणिक प्रदेश आहे, ज्यात वर्तमानातील पूर्व विदर्भ (गडचिरोली जिल्हा, गोंदिया), छत्तीसगढ आणि तेलंगणाचा काही भाग समाविष्ट होतो.
बंगालमधील नक्षलबाडी येथून (१/११)
जमीनदारांविरोधात उसळलेल्या स्थानिक जनचवळीचा प्रमाद झाला आणि पुढे ही चळवळ नक्षलवादी या नावाने कुप्रसिद्ध झाली. पुढे ही चळवळ चीनसमर्थित माओवादाने ग्रासली आणि भारतीय घटनेविरोधात एल्गार पुकारला गेला.
माओवाद्यांच्या देशद्रोही आणि जनसामान्य विरोधी कृतीचा फटका दंडकारण्यातील (२/११)