मराठीचिये नगरी Profile picture
तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..
Nov 21, 2020 13 tweets 5 min read
आज हुतात्मा दिवस. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्यासाठी प्राणाची पर्वा न करता लढणाऱ्या १०७ हुतात्मे व प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी असंख्य कार्यकर्त्यांना वंदन.

#हुतात्मादिवस संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०७ हुतात्मे

१] सिताराम बनाजी पवार

२] जोसेफ डेव्हिड पेजारकर

३] चिमणलाल डी. शेठ

४] भास्कर नारायण कामतेकर

५] रामचंद्र सेवाराम

६] शंकर खोटे

७] धर्माजी गंगाराम नागवेकर

८] रामचंद्र लक्ष्मण जाधव

९] के. जे. झेवियर

१०] पी. एस. जॉन

#१०७हुतात्मे
Jun 11, 2020 8 tweets 2 min read
ARTICLE by - Jayant Howal

m.facebook.com/story.php?stor…

शिक्षण क्षेत्राचे निर्णय तारतम्य बाळगून घ्या.गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्राला क्षेत्राविषयी चाड,आणि जाण असणारा शिक्षण मंत्री मिळाला नाही.ऑनलाईन ऑनलाइन हा धोशा म्हणजे गंमत आहे का? एका घरात चार मुले असणाऱ्या पालकांनी चार अँड्रॉइड फोन लॅपटॉप घ्यावे का?हे किती कुटुंबाला शक्य आहे?समाजातील गरीब वर्गापासून विचार करायला शिका. सगळ्यांची मुले काही इंटरनॅशनल शाळेत, पटसंख्या 20 ते 30 असणाऱ्या शाळेत शिकत नाहीत.
May 9, 2020 5 tweets 2 min read
देवगोंडा ज्योतीगोंडा पाटील नावाचा त्यांचा आज्जा. मोठ्ठा घरंदाज आसामी. त्या काळात तो डोक्याला मोठ्ठा रुमाली फटका बांधीत असे म्हणून लोक त्याला "रुमाल गोंडा पाटील" म्हणत.

एकदा न्यायनिवाड्याकरीता नांदणी मठाचे मठाधिपती असणाऱ्या या देवगोंडा पाटलांना बोलवण्यात आले. न्यायनिवाडा झाला. समेटाची कागदपत्रे तयार झाली. त्या वेळी वडिलधाऱ्या माणसाने देवगोंडा पाटलास सही कराय सांगितले. देवगोंडा मोठा माणूस पण निरक्षर. पाटलाला नामुष्की वाटली. तो घरी आला.

मोठा मुलगा पायगोंडा शेतात काम करत होता. त्याला शेती बंद कराय सांगितलं व आष्ट्याच्या शाळेत शिकायला पाठवलं.
Mar 11, 2020 49 tweets 6 min read
कोरोना विषाणू आणि कोविड १९ आजाराबद्दल सविस्तर माहिती

कोरोना व्हायरस म्हणजे काय?

कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक प्रकार आहे. यामध्ये अनेक विषाणूंचा समावेश होतो. या विषाणूंचा संसर्ग प्राणी आणि माणसांना होतो. विविध प्रकारच्या कोरोना विषाणूंमुळे श्वसनसंस्थेशी संबंधित आजार होतात. अगदी नेहमीच्या सर्दी- खोकल्यापासून ते २०१२ मध्ये समोर आलेला मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (मेर्स), सिव्हीर ऍक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) हे कोरोना व्हायरसमुळे उद्भवणारे आजार आहेत.
Mar 8, 2020 17 tweets 2 min read
नमस्कार..
मी प्राजक्ता आबासाहेब गोडसे.
माझा जन्म 16 जानेवारी चा असून माझं मूळ गाव जेऊर तर सध्या पुणे येथे वास्तव्य. माझं शिक्षण पुढीलप्रमाणे..

Ph.D Appeared
D.Ed. B.Ed. M.Ed.
Double Graduate
Double Post Graduate
D.S.M.
Both TET and TAIT qualified
CBSE UGC NET qualified
Mar 8, 2020 14 tweets 3 min read
मी पौर्णिमा राजेंद्र पवार. माझा जन्म १७/११/१९९८ चा, डोंबिवलीचा. सध्या मी डोंबिवलीमध्येच राहते. सध्या मी मेकअप आर्टिस्ट म्हणुन काम करते , लहानपणीपासुन  स्वतः च्या नावापुढे कलाकार ( आर्टिस्ट) म्हणून टॅग लावण्याची इच्छा होती . याच इच्छेच्या मार्गाने जात २०१९ मध्ये मी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट झाले.