डॉ.ण Profile picture
We're just young dumb and broke, But we still got love to give
May 14, 2021 8 tweets 2 min read
सिग्नल ऍप ज्यांनी इन्स्टॉल केलं होतं, त्यापैकी किती जणांनी त्याचा वापर सुरू ठेवला आहे?

उद्या १५ मे आहे, व्हॉट्सऍपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा प्रॉम्प्ट तुम्हाला येईल, तो स्विकारायचा की नाही हे तुमच्या हातात आहे. पण स्विकारण्याआधी तुम्ही त्या नवीन पॉलिसी समजून घ्याव्यात. तुम्ही फेसबुकसाठी एक प्रॉडक्ट आहात. तुमचं आणि तुमच्या डेटाचं अस्तित्व त्यांच्यासाठी बिझनेस मॉडेल आहे. नव्या पॉलिसीनुसार तुमचा डेटा फेसबुक वापरणार आहेत. 'नेमका कोणता डेटा वापरणार?' याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि ही पॉलीसी उद्यापासून अमलात आणली जाण्याची शक्यता आहे.
Apr 17, 2021 8 tweets 2 min read
आज एका कामानिमित्त एका कोव्हिड इस्पितळात जाणं झालं, खरंतर मीडियाने सांगितलेल्या, दाखविलेल्या फुटेजनुसार आपल्याला प्रत्यक्षात असलेल्या परिस्थितीची कल्पना येतच नाही. त्या क्लिप्स पाहून आपलं मन निष्क्रिय होण्याच्या प्रक्रियेत असतं. पण प्रत्यक्षात परिस्थिती प्रचंड "भयावह" आहे. डॉक्टर्स, नर्सेस व इतर सपोर्टिंग स्टाफ त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत, कोरोना परिस्थितीचा त्यांच्यावर इतका ताण आहे की त्यांना कोणालाही सांगण्याची सोय नाही. त्यांचे आपल्यावर प्रचंड उपकार आहेत.

समजा तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह झालात आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं तर..