PM Patil Profile picture
इतिहासाची आवड. देशभक्त. राष्ट्रप्रथम 🇮🇳. Cricket 🏏. Politics. Sarcasm. Retweets / Likes are not my Endorsements to the Post / Comment.
Apr 4, 2021 16 tweets 5 min read
पालखेड चे युद्ध!!! बाजीराव पेशव्यांच्या असामान्य युद्ध शैलीची एक झलक. आज बघुया एका विलक्षण युद्धाची कहाणी.

एखाद्या परिपूर्ण युद्धाचे वर्णन करायचे म्हणलेच तर पालखेड चे युद्ध म्हणजे एक उत्तम उदाहरण. आपल्या पेक्षा शक्तिशाली असलेल्या शत्रूच्या नाकी नऊ आणे ही काही साधी गोष्ट नव्हे. शत्रू आपल्याला पाहिजे तसा बनवून घेतला की युद्धातील विजयाचे पारडे सदैव आपल्या बाजूने राहते.
मीर कमरुद्दिन खान सिद्दिकी हा हैद्राबाद चा पहिला निजाम होता. तो देखील एक नामांकित तसेच मुरब्बी सेनापती होता. औरंगजेब च्या काळात तो दख्खन चा सुभेदार होता.
Mar 31, 2021 22 tweets 7 min read
पन्हाळगड चा रणसंग्राम

इतिहासातील एक अत्यंत रोचक घटना. नक्की वाचा.

अफजखानाचा नायनाट केल्यावर महाराजांनी अवघ्या पंधरवड्यात पन्हाळा काबीज केला. हा पराभव आदिलशहा साठी अत्यंत लाजिरवाणा होता. त्यामुळे आदिलशहा ने 40000 फौजेसह सिद्दी जौहर ला शिवाजी महाराजांच्या बंदोबस्तासाठी रवाना केले बघता बघता सिद्दी ने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याच्या सेनेत सिद्दी मसूद, फाजल खान ह्यांसारखे सरदार होते. तसेच आपल्या लांब पल्ल्याच्या तोफा घेऊन टोपीकर इंग्रज देखील पन्हाळ्याच्या वेढ्यात सहभागी होते. जौहर म्हणजे काही साधा योद्धा नव्हता. मूळ हबशी असलेला सिद्दी एक अनुभवी सरदार होता.
Aug 28, 2020 12 tweets 6 min read
मराठा साम्राज्याच्या अस्ताची मुख्य कारणे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संपूर्ण सतराव्या शतकात अखंड हिंदुस्तानात निर्भिड सत्ता असणाऱ्या मराठ्यांच्या सत्तेचा १८१८ मध्ये अस्त झाला. काय होती ह्याची मुख्य कारणे ? थोरल्या बाजीरावांचा कमी वयात मृत्यू

सर्वांना माहिती आहे की पेशवे बाजीराव बल्लाळ ह्यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारताचा दोन तृतीयांश भाग मराठा साम्राज्याला जोडला होता. त्यांनी अक्षरशः मुघल साम्राज्या ला फाडून त्याचे तीन वेगळे भाग करून टाकले होते. आयुष्यभर अजिंक्य असलेल्या बाजीराव
Aug 14, 2020 16 tweets 6 min read
समर्थ रामदास स्वामी यांच्या बद्दल काही महत्त्वाची माहिती. 🙏🙏
समर्थांचे मूळ नाव म्हणजे नारायण सूर्याजी ठोसर. त्यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला. अगदी बालपणापासूनच ते रामाचे आणि हनुमानाचे उपासक होते.
#समर्थ_रामदास #स्वराज्य #samarth_ramdas #sajjangad #Maharashtra Image श्रीरामांच्या प्रति त्यांची भक्ती पाहून लोकांनी त्यांना रामदास हे नाव दिले. किशोर वयातच त्यांनी संसाराचा त्याग करून नाशकाची वाट धरली. पुढील १२ वर्षे त्यांनी रामाची उपासना केली. बालपणापासूनच त्यांना कठोर व्यायामाची आवड होती. नित्य व्यायामाचा नेम ते कधी चुकवत नसत.