रंगस्याही🫰🎶🎶🚩 Profile picture
धर्मो रक्षति रक्षितः🇮🇳🇮🇳 कट्टर RW. विचार करून फॉलो करावे. थोडा हैं थोडे की जरुरत हैं जिंदगी फिर भी यहाँ खुबसुरत हैं!!!
Feb 11, 2024 5 tweets 1 min read
जिना

आज एका हॉस्पिटलचा जिना घाईघाईने चढत होतो, पंधराएक पायऱ्या असतील! माझ्या पुढे कठडा पकडून उजव्या हातात दोन पिशव्या सांभाळत एक साठीच्या आसपासचे गृहस्थ हळूहळू जिना चढत होते. किरकोळ शरीरयष्टी, अंगात मळकट शर्ट, साधीशी पॅन्ट!

सहसा मी असं कधी करत नाही, पण आज का कोणास ठावूक वाटलं+ वाटलं आणि मी मागून त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, "द्या इकडे पिशव्या!"
त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं, एकंदरीत माझे कपडे, डोळ्यांवर राहून गेलेला गॉगल, आणि तसं पाहता माझं वय... मी देखील गेलोय की पन्नाशीत! म्हणजे आमच्या वयात फारसं अंतर नसावं. +
Feb 21, 2023 8 tweets 2 min read
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या आवारात एक झाड नेमकं अशा जागी होतं की त्यामुळे जागेला कुंपण घालता येत नव्हतं. झाड पाडलं तर कुंपण आणि प्रवेशद्वार अशा दोन्ही गोष्टी होणार होत्या पण नगरपालिका ते झाड पाडण्यास परवानगी देत नव्हती.
त्यावेळी शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते.+ ते काही तरी करतील म्हणून पदाधिकारी त्यांच्याकडे गेले. शंकररावांनी , " छे छे, हे बेकायदेशीर काम आहे. झाड न पाडण्याचा नियम आहे, ते तोडता येणार नाही. नियम आहे त्याचे पालन झाले पाहिजे. मी यात मध्यस्ती करू शकत नाही. प्रवेशद्वार दुसरीकडे काढा " असा सल्ला दिला.+
Nov 18, 2022 11 tweets 2 min read
दादा कसय ना... ज्या व्यक्ती वर बितते त्याला कळते...
माझा स्वतः चा अनुभव सांगतेय..
मी माझ्या आई बाबांशी close नसती आणि जर घरी पोचल्यावर आई बाबांना हर एक गोष्ट संगील अशी नसती तर...आणि आई बाबा मला समजून माझी बाजू घेणारे नसते तर...

2nd year चा paper सुरू होता माझा... 3रा paper होता+ मी tension मध्ये paper सोडवत होती.. जी तिथे invisilator म्हणून होती, ती माझ्या बाजूला येऊन मला बोलली paper hone ke बाद रुकना मुझे तुमसे जरा बात करनी है..
मला जाम टेन्शन आलेलं(मुळात मी फार bright student nahi.. त्यात ती असं बोलली..)+
Sep 28, 2022 13 tweets 3 min read
शास्त्रीय जागर....

"काय कटकट आहे!" म्हणत , पाय आपटत श्रुतिका आरतीला आली. तिच्या चेहेऱ्यावरचा त्रासिक भाव आईने टिपला होता. आरती झाल्यावर प्रसादासाठी पुढे आलेल्या हातावर चापट देत आई म्हणाली , "आता कशाला प्रसादाला पहिला नंबर? यायचं नव्हतं ना आरतीला?" + अर्धवट कळत्या , १३ वर्षे वयाच्या श्रुतिकाला हे पूजा , आरती , नवरात्र सगळं बोरिंग वाटत होतं. आज आईने तिला समजवायच ठरवलं. "काय गं , तुला माहित आहे का नवरात्र का करतात?" आई ने विचारलं. तशी ती रागाने म्हणाली , "त्यात काय , काहीतरी ऑर्थोडॉक्स रूढी , कुठे देवी पाहिली कोणी? +
Sep 24, 2022 11 tweets 2 min read
थोड्याच दिवसांनी नवरात्र सुरू होतील
देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते.
पण आपण जर आजूबाजूला शोधले तर ही देवीची नऊ रूपे आपल्या घरातच सापडतील ते असे

'रूप पाहता लोचनी'

आपण बालपणापासून देवीची विविध रूपे पदोपदी पाहत आलोय. + पहिली माळ - 'मातृदेवतेची'.
जी आपल्यासाठी कष्ट उपसताना दिवस-रात्र, आजारपण, थकवा, तहान-भूक कशाचीही पर्वा करत नाही.
आपल्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करणे सोडत नाही.
मातृदेवते, तुला शतशः प्रणाम !
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 +
Feb 27, 2022 14 tweets 3 min read
*शब्दसंपदा*

आजकाल इंग्रजी मिश्रित मराठी बोलण्याची पद्धतच आली आहे. आपली भाषा किती सुंदर आहे. अनेक अलंकारांनी , शब्दसंपदेनी नटलेली भाषा आजकाल एखाद्या कार्यक्रमाच्या निवेदनातच कानावर पडते.
इतर अलंकारां बरोबरच म्हणी आणि वाक् प्रचार भाषेला समृद्ध करतात.+ भाषेचं सौंदर्य अलंकारानी खुलतं.
पूर्वी सहज बोलतांना आई ,आजी म्हणींचा वापर करत असत.
माझ्या सासुबाईंना बोलतांना म्हणी वापरायची खूप सवय होती. त्यांच्या काही म्हणी जरा हटके असायच्या.
उन्हाळा - दिवाळीत आम्ही सगळे एकत्र जमायचो. +
Feb 26, 2022 4 tweets 2 min read
सुप्रिया ताई असं म्हणतात की स्त्री ही स्त्री ची शत्रू असते , पण हे चित्र आता बदलायला हवं आणि बदलायच असेल तर तुम्हालाच प्रथम पाऊल उचलवं लागेल. ताई पुढे या आणि चूक करणाऱ्या तुमच्या ह्या मावळ्याची जीभ हासडा. + ज्या शिवाजी महाराजांचे मावळे तुम्ही स्वतःला म्हणवून घेता त्यांनी पण वेळ आली तेंव्हा आपल्याच लोकांना शिक्षा करताना मागे पुढे पाहिले नाही. त्यांनी तर सुभेदाराच्या सूनेला पण पूर्ण सन्मान देऊन परत पाठवले आणि तुमचे हे मावळे आपल्याच एका भगिनीला खालच्या भाषेत बोलतात आहेत😡+
Feb 25, 2022 12 tweets 2 min read
*अनुदिन अनुतापे*

दासनवमीच्या उत्सवात समर्थ रामदासस्वामींच्या दासबोध, मनाचे श्लोक इ .मधील मौलिक शिकवण ऐकायला मिळते. दरवेळी त्याचा नव्याने अर्थ उलगडत जातो.
रामदासस्वामींची विपुल ग्रंथसंपदा तर भारावून टाकणारी आहे.+ Image एका संन्याशाने प्रपंचातल्या किती बारीकसारीक गोष्टींचा विचार केला हे पाहून मन थक्क होते .
आध्यात्मिक क्षेत्रात मी शून्यच. ग्रंथांचे वाचन , किर्तन, प्रवचन यातला ऐकण्याचा अनुभवही नगण्यच. मात्र समर्थांची करुणाष्टके मला फार जवळची वाटतात.+
Aug 21, 2021 25 tweets 4 min read
*आटपाट नगर होतं* ......
श्रावण सुरु झाला की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. आठवतात त्या श्रावण महिन्याच्या प्रत्येक वाराच्या कहाण्या. आजीने मनोभावे सांगितलेल्या आणि तांदुळाचे चार दाणे हातात घेऊन चित्तभावाने ऐकलेल्या.
आपल्या प्रत्येक कहाणीत काहीतरी शिकवण आहेच,...(१) विशिष्ट लयीत सांगितलेल्या कहाण्या मनात घर करुन रहातात.
दिव्याच्या आवसे पासून कहाण्या सुरु होतात.अंधःकार दूर करणाऱ्या दिव्याला लखलखीत करुन पूजन करायचे.अज्ञानाच्या तमाला उजळून टाकण्यासाठी ज्ञानाची ज्योत तेवत ठेवायची एवढेच नव्हे तर ज्योतीने ज्योत लावत सगळे जग ज्ञानाने....(२)
Jun 24, 2021 19 tweets 3 min read
🌳वटसावित्री🌳
आज वटपौर्णिमा, काल पासूनच समाजमध्यमांवर निरनिराळे मेसेज फिरायला सुरवात झाली आहे. त्यातला मला खटकणारा एक मेसेज म्हणजे सत्यवानाच्या सवित्रिपेक्षा सावित्रीबाई फुलेंचा मार्ग धरला तर उत्तम. सावित्रीबाई फुलेंचे कार्य तर अनमोल आहेच त्याबद्दल वादच नाही....१/n पण कुणा एकाची स्तुती करताना किंवा महत्त्व सांगताना दुसऱ्यावर टीका केलीच पाहिजे का? कोणाला कमीपणा दिला तरच एखाद्याचे महत्त्व वाढते का?
काय जाणून घेतलं आपण सत्यवनाच्या सावित्री बद्दल? केवळ व्रत वैकल्य, सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाची पूजा करा, फेऱ्या घाला इतकाच?....२/n