खंडप्राय प्रदेशातील असंख्य लोकांची मने समान सूत्राने बांधणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता! आपल्याला अशी किती सूत्र माहीती आहेत?
तांदूळ, पाऊस आणि रस्ते देशातील एकात्मतेची सर्वात मोठी व महत्वाची सूत्रे आहेत असे म्हटले तर? #Tweet4Bharat@iidlpgp
मी २०१७ साली महाराष्ट्रातल्या कोकण प्रांतात एका दुर्गम गडावर एका साधूच्या कुटीत गरम आमटी भात खाल्ला. २०१८ साली सिक्किम राज्यात अभ्यासदौर्या ला वरण आणि भात खायला मिळाला. २०१९ मध्ये कर्नाटकमध्ये एका खानवळीमध्ये अम्मा आग्रह करून भात वाढत होत्या. कोलकत्त्यामध्ये खिचडी खायला मिळाली.