प्रतीक पुष्कराज 🚩🚩 Profile picture
जो जे वांछील तो ते लाहो! 🙏
4 May
आता कळतोय नथुराम??

होय त्याहीवेळी हाच बंगाल होता.
हेच बंगाली बांधव मरत होते.
तेच बंगाली राक्षस माजले होते.

पाकिस्तानपेक्षा पूर्वपाकिस्तानची फाळणी जास्त दुखरी होती.
जणू जिथे सिंदूर भरावा अशा भांगेत कुर्‍हाड मारून दोन तुकडे झाले होते बंगालचे!

ढाकेतून मृतदेह येत होते कोलकतेत..
मार खाल्लेले, सर्वस्व गमावलेले हिंदू येत होते पळून इकडे..

आणि एक महात्मा त्यांनाच उपदेश करत होता!
बाबांनो,
सशस्त्र प्रतिकार करू नका बरं!
स्वतःचा खून होऊ द्या..
बलात्कार करून घ्या.
रक्त वाहू दे..
पण हो, त्या आपल्या बांधवांवर तुम्हीमात्र प्रतिवार नका हं करू!

अहिंसा परमो धर्म☝️
समोर घडणारे अत्याचार पाहून, बलात्कार पाहून, खून पाहून त्वेषानं मुठी आवळल्या जात होत्या, दात कराकरा चावले जात होते, रक्त साकळेपर्यंत ओठ दाबले जात होते,

पण करणार काय?

त्यांना महात्म्याचा पाठींबा आहे.
आणि खुद्द पंतप्रधानदेखील देशाहून त्यालाच मोठा समजतोय!
तेही त्या उपोषणाला घाबरून?
Read 10 tweets
2 May
अरे मोदीशहा इतके येडे वाटले का रे?

Of course बंगालात भाजपमुख्यमंत्री होणार नव्हताच मुळी! तसा चेहरा सुद्धा अद्याप भाजपकडे नव्हता.
मूळ हेतू हा फक्त पक्षाच्या एस्टॅब्लिशमेंटचा होता.
तो सुंदररीत्या साध्य झालाय, भाजप त्यात जिंकलाय!

तळागाळात पोचून पक्षशाखा उघडून आधी सामान्यांना -
कळू तर द्या की भाजप काय आहे.. राष्ट्रनिष्ठा काय आहे.. राष्ट्रवाद काय आहे.. तर पक्ष जिंकेल..

यासाठी पहिल्यांदा चंचुप्रवेश करावा लागतो.
पण भाजपने तर इथे पार खिंडारप्रवेश केलाय..!

८०+ जागा येणं ही चेष्टा वाटली?
खुनी, गुंड, धनदांडग्या बेडकांच्या तळ्यात एवढी कमळं फुलली आहेत हीच एक -
अचिव्हमेंट आहे. त्याबद्दल भाजपचं अभिनंदन!

आता त्यांना 'access' मिळाला आहे.
आता त्यांचे कन्सिडरेबल आमदार आहेत तरी.. लोकांचे प्रश्न धसास लाऊन त्यांना उत्तम प्रशासन द्यायची आता खरी संधी मिळाली आहे..
नक्कीच, आता खरं भाजपचं काम सुरू होईल.

तिथल्या बेबंद सरकारला विरोधी पक्षच नव्हता..
Read 5 tweets
14 Apr
"स्वामीसमर्थ हे काय संत आहेत?

गजाननमहाराज,स्वामी,साईबाबा असल्यांच्या नादी लागून काय उपयोग? आयुष्यात यांनी कधी काही उपदेश केला नाही की साहित्यनिर्मिती नाही.
मदत,सामाजिककाम तेही नाही..

संतमंडळी जरा तरी बरी, पण हे स्वामी, महाराज, बाबा लोक? श्या!"

👆
अशी मल्लिनाथी ऐकत होतो एकाची!-
विस्मय वाटला. ते मत पटल्यासारखं वाटतंय की काय असं झालं!
अरेच्चा! आईवडलांनी केलेला श्रद्धेचा हा संस्कार चुकीचा आहे की काय? वाईट वाटलं. चिंतन सुरू झालं..
ज्ञानोबा,तुकोबा,रामदासस्वामी यांच्या साहित्यातून बोध तरी होतो, पण या अर्वाचीन संतांचं काय बरं योगदान आहे? पोथ्यांतले चमत्कार?
नाही.
विचार केल्यावर समजतं की यांचे उपकार खरं तितकेच महत्त्वाचे आहेत.
कसे?
बर्‍याचदा 'उपदेशा'पलीकडे 'सज्जनसंग्रहाची' निकड फार असते.
समाजात जिवाच्या ओढीमुळे शिवाची आठवण रहात नाही तेव्हा पर्यायानं त्याचा परिणाम सौजन्यावर होतो. मग हे सज्जनत्व टिकवून कसं ठेवावं?

उत्तर - सद्संगतीनं!
Read 12 tweets
13 Apr
कंबरडं मोडतंय रे सामन्यातिसामान्यांचं..

पाडव्याच्या दिवशी गळ्यातली सोन्याची चेन मोडली एका मित्राने..

लग्न झालंय मागच्यावर्षी, सलूनचा धंदा बंदय आणि घरात पत्नीआईवडीलआजीआजोबा एवढे लोक आहेत.

ब्रेक द चेन म्हणजे हेच काय?
कष्टानं मिळवलेलं सोनंही मोडलं जावं इतकं गरजेचं आहे Lock-down?
त्या स्वाभिमानी मित्राला नेमकी मदत तरी काय offer करू मी?
वडीलही असायचे दुकानावर..
म्हटला गेले सहा महिने एकट्यानेच काम केलं, दाढीकटींगमुळे संसर्ग वाढेल म्हणून वयस्कर वडलांना घरी ठेवलं,

दुकानात जास्तीचा खर्च करून तापमानडिजिटलचेकर काय, ती सलूनकिट्स काय, स्प्रेज काय सगळं सगळं आणलं..
का तर, दुकान बंद नको रहायला..
मामाला जागेचं भाडं द्यावं लागतं, त्याचं घर पण भाड्यावर सुरू आहे.. तो तरी बिचारा काय करणार..

जबाबदारीनं वेढलेलं अवघ्या 28 वर्षांचं ते लेकरू पाहून जीव हळहळला.. आम्ही बसल्याजागी पगार घेऊन बेदरकार मतं ठोकतो, पण असे कित्येक तरुण अक्षरशः रस्त्यावर येतायत.
Read 6 tweets
6 Apr
तुकाराम महाराज आणि 'बामणं'.👇

"साधा वाणी असलेला हा तुक्या,
गावातले ब्राह्मण त्याच्या पाया पडतात?"

मंबाजी नावाच्या देहूग्रामपुरोहिताला हे सहन होईना.
लक्षात घ्या,
'ब्राह्मण' पाया पडत आहेत याला त्याचा आक्षेप आहे.
इथे, मंबाजी सोडला तर बाकी सर्व ब्राह्मण तुकोबांच्याच बाजूने आहेत.
मंबाजीनं रामेश्वरशास्त्री बहुलकरांना बोलवून तुकोबांच्या वेदज्ञानाचा पराभव करायला व गावातल्या सगळ्या ब्राह्मणांना शासन करायला सांगितलं.

👆
आता काय झालं? रामेश्वरशास्त्री स्वतःच प्रभावित होऊन तुकोबांचे शिष्य बनले!

पुढे महाराजांच्या प्रसिद्ध चार टाळकऱ्यांत पहिले चार टाळकरी कोण?
होय, ब्राह्मणच.
त्यातल्याच एका 'गंगाधरपंत मवाळ' यांच्या कडूस गावचा मी आहे.. मला अक्कल शिकवू नये.

एका मंबाजी नावाच्या पुजारी लेवलच्या ब्राह्मणाने त्रास दिला पण बाकीच्या समस्त विद्वान ब्रह्मवृंदांनी तुकोबांची कीर्तनं समोर बसून ऐकली ते नाही का दिसत?

ब्रिगेडी लपून धर्मविरोध करतात
Read 6 tweets
1 Mar
काल मी 98ने पेट्रोल भरलं..

तळतळाट, उद्वेग, हळहळ या सगळ्या भावना आल्या.
त्या स्वाभाविक आहेत. 500मधे तीन आठवडे चालणारी माझी प्लॅटिना आता आठवड्याला साधारण तितकंच पेट्रोल मागू लागलीए..

याची चीड रोजची 30km+ drive असणार्‍याला येणारच रे!

पण नक्की कुणावर रागवायचं⁉️
खरी गोम यात आहे..
कारण असंय, की आपला असा सरळसोट ग्रह झालाय की इंधनकिमती फक्त केंद्रसरकार नियमित करू शकतं..
लिट्रली हाच समज आहे प्रत्येकाचा..
माझाही होता.

लेकिन वैसा है नही!

इंधनकिमतीच्या सुमारे 30 टक्के कर हा राज्य सरकारचा असतो. (अतिरिक्त सेस आणि आता कृषी सेस धरून.)

खरं पेट्रोल महागतं ते इथे👆
कच्चं इंधन आजमितीला 23.9 लिटर मिळतंय.
रिफाइन, प्रोसेसिंग करून पंपात पोचेपर्यंत ते होतं 29rs.
रोडसेस,excice duty कर केंद्राचे असतात. त्याने ते होतं अंदाजे 61rs.

पंप डीलर किती घेतो माहित्येय?
तब्बल 4 रुपये लिटरमागे!🤑
उगाच पेट्रोलपंप उघडत नाहीत राजकारणी!

पेट्रोल झालं 65 रुपये!
Read 8 tweets
26 Feb
सावरकर आम्हाला का पूज्य आहेत?

त्यांच्याइतकं नेमकं, bull's eye vision ज्याला म्हणतात तितकं थेट समीक्षण दुसर्‍या कुणाचंही नाही.

ते,
हिंदुत्ववादी, पण सनातनी नाहीत
कविह्रदयी, पण कल्पनाविलासी नाहीत
राजनीतिज्ञ, पण राजकारणी नाहीत

त्यांची एकूणएक कृती तार्किक असण्याचं हेच खरं कारण.
हा तोल कसा सावरला?
किती अवघड आहे हे?

पूर्ण हिंदुत्वाकडे जायचं, मात्र एका कलाकडे झुकत बाजू घ्यायची नाही.
आणि पूर्णतः धर्म नाकारून एककल्ली शुष्कही व्हायचं नाही.
फार अवघड सुवर्णमध्य.

जो धर्मावर कठोर भूमिका घेईल आणि
हिंदुस्थान हिंदूंचाच आहे हेही छातीठोकपणे सांगेल.. एकाचवेळी..!
पण याचा दुहेरी फटका त्यांना बसला!

सर्वधर्मसमभावाच्याखालून स्वार्थ साधणारे तथाकथित secular पक्ष त्यांच्यापासून दूर गेले. कारण सावरकरांनी हिंदुत्व पुरस्कृत केलं.

आणि हिंदुत्ववादी म्हणवणारी सनातनी मंडळी त्यांच्यापासून दूर गेली.. कारण त्यांनी हिंदुत्वाला पारखून घ्यायला सांगितलं..
Read 10 tweets
25 Feb
पेशवाई!
उदाहरण म्हणून.
फक्त राजांच्या गादीशी निष्ठा ठेवणारं पद. स्वराज्य फक्त वाचवलंच नाही तर वाढवलं..

स्वराज्यातला 'स्व' स्वतःचा मानून रक्त सांडणारे पेशवे टीकेचे धनी का आणि कसे झाले?
त्यांच्या श्रीमंती मुकुटाच्याआतले काटे लोकांना दिसले का नाहीत? पराक्रमाचं श्रेय का मिळालं नाही?
हे दिसतं तसं नाही. ही परिस्थिती आजची आहे.
पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत इतका द्वेष नव्हता.. श्रीमंतबाजीरावांचं नाव आदराने घेतलं जायचं सर्वत्र.

जातीपातीच्या राजकारणाने महाराष्ट्रसत्ताघट ढवळता येतो हे इथल्या राजकारण्यांना कळलं आणि इतिहासाचं विद्रूपीकरण सुरू झालं..
सरसकट जाती वर आल्या.
एखाद्या थोर माणसावर अगदी कुणीही उठून शिंतोडे उडवायला लागला.. धरबंध राहिला नाही..

इतर राज्यांहून बराच बरा असलेला महाराष्ट्र पुन्हा जातीपातीच्या राजकारणात अडकला तो कायमचाच!!

पुन्हा वर कधी येणार?
प्रयत्न आपणच करायला हवेत!
इतिहास आपणच उपसायला हवा, समोर आणायला हवा, अभ्यास करायला हवा
Read 6 tweets
24 Feb
ब्राह्मण मराठा वाद लावणे म्हणजे, केसरकांती हिंदूंअवकाशातील 'ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज' या दोन सूर्यांमधे राहूकेतूंची सावली आणण्याचा प्रयत्न करणे!
अशी ग्रहणं लावणारे कित्येक आले आणि गेले.!
पण या तेजाने ही भूमी अशीच उजळत राहिली!

कुणाची भीती घालता रे? कुणात भांडण लावता?
आमच्यात?
दादा, आपल्याच समाजातील शिर्के, खोपडे, मोरे असे चांगले कुलवंत मराठा गडी छत्रपतीशिवाजीमहाराजांच्या मुळावर उठले होते हे लक्षात ठेवा..
फितुरी करण्यात, भांडणतंटे करण्यात, बादशहाला जाऊन मिळण्यात कोण पुढे होते त्याचा अभ्यास करा.. भवानीमूर्ती फोडायला खानाला गाभारा दाखवणारा मंबाजी भोसले-
हा अफझल्याचा निष्ठावान सरदार असेल किंवा राजांवर विषप्रयोग करणारा जावळीचा चंद्रू मोरे असेल..
पण तुम्ही उल्लेख कुणाचा करता? अनाजी आणि भास्कर?
महाराजांच्या गादिशी गद्दारी करणारे किती कुलवंत मराठा दाखवू? पवार, गायकवाड, शिर्के घराणी स्वायत्त झाली पण नानासाहेब पेशवा म्हटला आम्ही मात्र-
Read 7 tweets
19 Jan
थंडीत स्वतःची बसलेली जागा आपल्याला सोडवत नाही..
पण आजच्याच दिवशी हजारो निरपराध लोकांना आपली राहती जागाच काय, घरंदारं, संपत्ती, कपडेलत्ते, अन्नधान्य सारं सारं सोडून पळून जावं लागलं होतं..
स्वताच्याच घरातून..

भर जानेवारीच्या बर्फाळ थंडीत, प्रतिकार करू पाहणाऱ्यांचं रक्त वहावलं होतं
दोष इतकाच, की हल्लेखोरांच्या देवापेक्षा यांचा देव वेगळा होता!
अडीचशेवर्षांपूर्वी जे संपूर्ण भारतभर खुलेआम घडत होतं त्याची झलक 98साली काश्मिरात दाखवली गेली होती!
पण अर्थात,
अकबर-औरंग्यासारख्या क्रूरकर्म्यांच्या कारकीर्दीतही जो निद्राभंग झाला नाही त्या हिंदूना आताही जाग आली नाहीच!
त्यामुळे फार फार मजेशीर गोष्ट घडली..
त्या दुर्दैवी हिंदूंच्या बलिदानाची क्रूर थट्टा झाली..

कुणालाही ते बलिदान लक्षात राहीलं नाही की कुणी त्यांना श्रध्दांजली वाहिली नाही.. प्रतिशोधवगैरे लांबच्या गोष्टी.

निदान, अंगावर काटा येणार्‍या त्या घटनेने आपल्या झोपेची कूस तरी बदलू🙏
Read 4 tweets