1/ फोनच्या मेमरी पेक्षा कैक पटींनी मोठी जागा मनात असते. इथे आठवणींच्या साठवणी होतात. अनेक अव्यक्त विचार गुदमरलेले असतात! वाटतं कधी तरी, मोकळं व्हावं पण पुन्हा मन सावरून मागे सरसावतं. भय,प्रेम,चिंता,द्वेष भक्कम तटबंदी करून घेतात आणि मग अव्यक्त व्यक्त च होत नाही! 2/ मनाच्या कोपऱ्यात असंख्य विचार धूळ खात पडलेले असतात. काहींना व्यक्त करायचं नसत तर काहींना व्यक्त होताच येत नसत! कृती आधीच परिणामांची चिंता याला खतपाणी घालते. खूप वेळा ओठांवर येऊन बाहेर पडत नाही. व्यक्त होणे हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे, त्याला अनेकदा स्वतः स्वभाव च आळा घालतो.
1/ मराठी साहित्याची वाटचाल आता तिसऱ्या अंकाकडे जाताना दिसत आहे. 'साहित्य' या शब्दाचा अर्थ देखील निम्म्या मराठी मातृभाषिकांना माहित नसेल! मराठी भाषेची ही उपेक्षा आता सहन होत नाही. तिची गोडी जपली ती फक्त सच्च्या रसिकांनीच! 2/ या अमृताची गोडी हिंदी, इंग्रजी चित्रपटांची चटक लागलेल्यांना काय कळणारे! काळाच्या ओघात रसिकांच्या आवडी निवडीही बदलल्या आहेत. "आडात च नाही तर पोहऱ्यात कुठून येणार !" ही म्हण साजेशी ठरेल. हल्ली मुलांना हनुमाना ऐवजी सुपर हिरो सर्वशक्तिमान वाटतात...