Rajendra Jadhav Profile picture
I work at Reuters. On Twitter and Facebook, I write for myself. Retweets are not endorsements.
Feb 27, 2023 9 tweets 4 min read
कांद्याची निर्यात वाढूनही दर का पडले?
निर्यात एप्रिल ते डिसेंबरमध्ये ४८ टक्क्यांनी वाढून १७ लाख ४३ हजार टनावर पोहचली. एकट्या बांग्लादेशने या काळात ५ लाख टन #कांदा आयात केला १/९ @ashish_jadhao @ss_suryawanshi @MarathiDeadpool @ShrimantManey @Marathi_Rash #Onion @vinodpatilzee मग दर का पडत आहेत?
महाराष्ट्रात २०१९ ते २०२२ ही सलग चार वर्षे मान्सूनचा पाऊस चांगला झाला. ज्यामुळे जमिनितील पाण्याची पातळी वाढून खरीप आणि रब्बी हंगामातही कांदा आणि अन्य पालेभाज्या घेणे शेतक-यांना शक्य झाले. कांद्याच्या उत्पादनात निर्यातीपेक्षा जास्त वाढ झाली. २/९