मार्मिक Profile picture
धर्मो रक्षति रक्षितः
Nov 21, 2022 7 tweets 4 min read
1970 पर्यंत दरिद्री असलेल्या "कतार" देशाला "पेट्रोलियम, नॅचरल गॅस"चे घबाड सापडले. थोडक्यात त्यांनी जे स्वतः निर्माण केलं नाही ते अमेरिकन कंपन्यांच्या उत्खनन क्षमतेवर विकून पैसे कमावले. त्या देशाच्या "फिफा वर्ल्डकप" आयोजन खर्चाचे कौतुक करत, लिब्रांडू भारताला ज्ञान पाजळत आहेत.
1/7 ते लिब्रांडू 2010 मध्ये भारताने आयोजित केलेल्या (UPA सरकारच्या कृपेने, कलमाडीच्या नेतृत्वात) कॉमनवेल्थ मधील झालेल्या घोटाळ्याबाबत, साहेबांनी बालेवाडीच्या सिंथेटिक ट्रॅकवर गाड्या नेऊन केलेला खेळ सोयीने विसरले. तेच लिब्रांडू खेळाला मोदींनी कसे महत्व दिले पाहिजे हे सांगतायेत.🤣
2/7
Sep 11, 2022 17 tweets 3 min read
सध्या बॉलिवूडला उतरती कळा लागलेली आहे. हे मत एखाद दोन चित्रपट आपटल्याने तयार झालेलं मत नाहीये. तर कुठल्याच विचारधारेशी, राजकीय पक्षाशी काही देणंघेणं नसलेल्या व्यक्ती जेव्हा बॉलिवूड चित्रपटांबाबत फारसे उत्सुक दिसत नाही तेव्हा हे जाणवते. असेही नाही की लोकांकडे पैसे नाहीत. परंतु लोकांना बॉलिवूडच्या थिल्लर चित्रपटांवर खर्च करायचा नाहीये. याबाबत प्रामुख्याने काही कारणे लक्षात घेतली तर बॉलिवूडचा हिंदुद्वेष व राष्ट्रविरोधी भावना जोपासणारे घटक कारणीभूत आहेतच. परंतु रसिक प्रेक्षक म्हणून ह्यासोबत मला अजून काही कारणे महत्वाची वाटतात.
Mar 13, 2021 4 tweets 2 min read
आघाडी सरकारकडे वीजबिल माफ करायला, शेतकरी कर्ज माफीला, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्याकरीता असलेल्या "सारथी शिष्यवृत्तीस" देण्यासाठी, सरकारी नोकर भरती करायला पैसे (निधी) नाही. परंतु दुसरीकडे धर्मनिरपेक्ष आघाडी सरकारला अल्पसंख्यांक समाजाला आकर्षित करण्यासाठी कोटीच्या कोटी रुपये आहेत.
औरंगाबाद येथील हज हाऊस बांधणीसाठी ₹ २९.८८ कोटी निधीला मान्यता राज्यसरकारने दिली आहे. सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) ₹ १२ कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे, त्यातील 30% निधी बांधकामासाठी "सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
Dec 1, 2020 12 tweets 6 min read
डॉ.शीतलताई आमटे यांच्या निधनाची बातमी जशी इतरांसाठी धक्कादायक आहे, तशीच माझासाठीही आहे. त्या सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे त्या अनेक लोकांशी संवाद करायच्या हे कालपासून विविध सोशल पोस्टवरून लक्षात येतच आहे. माझीही इकडेच ओळख झाली होती, त्यानंतर नंबरची देवाणघेवाण आणि संवाद.
1/n काही महिन्यांपूर्वी लोकसत्ताने ह्या वृत्तपत्रातत त्यांच्याविषयीचे दोन लेख प्रसारित झाल्यावर त्या व्यथित होत्या. त्यावेळी बोलताना "मोठे षडयंत्र आहे, महिला नेतृत्व नको असते अनेकांना, भ्रष्ट लोकांची साखळी आहे, राजकारणी जमिनीवर डाव लावून बसल्याचे बोलले होते"
स्क्रीनशॉट👇
2/n
Jul 10, 2020 15 tweets 3 min read
सध्या जगभरात कोरोना, भारत-चीन तणाव सोबतच नव्याने चर्चेत आलेला विषय म्हणजे टर्की देशातील इस्तांबूल शहरातील हाइया सोफिया संग्रहालय, आपल्याकडे जसा राम जन्मभूमी- बाबरी मस्जिद वाद जुना होता तसाच वाद आजही पाश्चिमेकडे "हाइया सोफिया"च्या रुपाने धगधगता आहे.
#HagiaSofia
1/n शेकडो वर्षांपूर्वी रोमन शासकांच्या ताब्यात असलेल्या ह्या भूभागात तत्कालीन रोमन राज्याने सध्या जिथे "हाइया सोफिया" इमारत आहे तिथे लाकडी चर्च बनवले, ते तेव्हाच्या युद्धात शत्रूंकडून जाळले गेले, पुन्हा लाकडी चर्च उभारले गेले तेसुद्धा युद्धात जाळण्यात आले.
2/n
May 24, 2020 15 tweets 3 min read
@OfficeofUT साहेब तुम्ही पूर्णपणे राजकीय व्यक्ती नाहीत आधीपासून म्हणून हे मनोगत मांडण्याचा प्रयत्न आहे.
तुम्ही कोरोनाशी लढण्यासाठी तुमच्या पातळीवर उपाययोजना करताय, परंतु दिवसेंदिवस त्या कुठेतरी कमी पडतायेत हे मान्य करा तुम्ही आता कृपया, अपयश मान्य करण्यात काही कमीपणा नाही. अपयश मान्य केलेत तर ते दूर करण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्याचे मार्ग मोकळे होतील. तुम्ही तुमच्या पातळीवर निर्णय घेतले त्याला जनतेने जमेल तेवढे सहकार्य केले, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांनीही त्यात पूरक असे योगदान दिले. परंतु रोज नव्याने हजारात रुग्ण वाढतायेत.
Jul 30, 2019 14 tweets 3 min read
"एक होत माळीण"
मध्यरात्री झालेली माळीण घटनेची बातमी तिथं जाणाऱ्या एस.टी. चालक वाहकामुळे दुसऱ्या दिवशी प्रशासनाला समजली. दुपारपर्यंत शेजारील तालुक्यांमध्ये सर्वत्र वाऱ्यासारखी ही बातमी पसरली होती. प्रशासकीय यंत्रणेची हालचाल सुरू झाली होती. दुपारनंतर ह्या घटनेचे भीषण स्वरूप बातम्यांच्या माध्यमातून देशभर पसरले. आम्हीही मित्रपरिवार गाड्या काढून तिकडे निघालो. वाटेत वाडा-भीमाशंकर रस्त्यावर कधी नाही एवढं ट्रॅफिक लागलं. अनेक पर्यटक बाहेरून भीमाशंकरमध्ये माळीण घटना समजल्यामुळे लँड स्लाईडच्या भीतीने बाहेर पडण्यास सुरुवात