Rajveer Profile picture
Never say 'No', never say 'I cannot', for you are infinite. All the power is within you. You can do anything. -Swami Vivekananda-
Rajveer Profile picture 1 added to My Authors
10 Apr
#Live_updated :- हॉस्पिटलमध्ये "काँट्रॅक्ट बेसिस" वर काम करणाऱ्या लोकांना मूर्खात काढून पगाराचा काळाबाजार चालू आहे.
हिशोबात घोळ चालू आहेत त्याचे प्रत्यक्ष उदाहरण डोळ्यांनी पाहून घ्या.

Shift. Per duty pement
Morning - 330₹
Evining - 235 ₹
Nightshift - 280₹ 👇
म्हणजे #COVID19 योध्याची रोजची हजेरी 845₹ रुपये होते बरोबर का ??

पण काँट्रॅक्ट वाल्यांचा अकाऊंटंट वेगळाच हिशोब सांगणार तो असा 👇
Morning 9 duty = 330 × 9 = 2,970
Evening 7 duty = 235 × 7 =1,175
Night 9 duty = 280 × 9 = 2520
(Total payment = 854 × 25 =6,665)
आता किती कोव्हिडं हा अनुभव आलाय ??
माहिते तुम्हाला नोकरी करायची आहे हॉस्पिटलमध्ये पण तरीही तुम्ही दिवसरात्र काम करता आम्हाला तुमचा आदर वाटतो, त्यामुळे विचारतोय .
कस काय adjust करता तुम्ही घरखर्च ??

अरे हो तुम्हाला तर ओव्हर टाईम चे पैसे मिळतात ना मग जाऊदे.
Read 9 tweets
9 Apr
#Live_updated:- "पाकीट पत्रकारांच्या शब्दखेळांमुळे लवकरच महाराष्ट्रात अशांतता पसरणार"
संभाजी भिडे गुरुजींचे वक्तव्य मला अजून तरी अजिबात वादग्रस्त वाटले नाही.
सर्वसामन्य निरोगी माणसांचे प्रॉब्लेम त्यांनी अस्सल मराठी भाषेत सांगितले आहेत.
(गावरान म्हणू शकता) 👇
उगाचच कोरोना पेशंटच्या आड लपून वादाचा वादंग करण्याचा प्रकार महाराष्ट्राला अनुभवता येणार आहे
उदाहरण पाहायचं तर पुढील हॅशटॅग पहा
#CoronaVirus #Covid_19 #Maharashtra
#SambhajiBhide #ShivPratishthan #coronavirus #maharashtralockdown
प्रत्येक वृत्तपत्राच्या, न्यूज चॅनेलच्या हेडलाईन पाहून सुद्धा सर्वांना समजेल की लोकशाही वर आघात कोण करत आहेत ??
प्रत्येकाच्या हेडलाईन वेगळ्या बातमी देण्याची मानसिकता वेगळी.
समोरच्या माणसाचे विचार वेगळे बातमी देणार्यांचे अर्थ वेगळे यावरूनच राजकारण कोण करतंय हे सिद्ध होत. 👇
Read 19 tweets
8 Apr
#Live_Updates :- मैत्रीण जराशी चिडलेली होती. कारण आज तिची नाईट शिप होती. ते सुद्धा कोव्हिडं word ला.

रागाने मला फोन करून सोडायला चल असा आदेश देऊन माझी वाट पाहू लागली.
कसाबसा तिच्या घरापाशी गेलो.

उशीर झालेला त्यामुळे तिला गाडीवर बसण्याची नम्र विनंती करून गाडी स्टार्ट केली.
नेहमी च्या रस्त्याने जाताना पोलिसांनी अडवले पण तिचे हॉस्पिटलचे id card पाहून आम्हाला लगेच सोडले.
तिथून पुढे माझ्या निरागस अशा बालमैत्रीणीने सरकार च्या नावाने ज्या ओव्या गायल्या 🎧
त्या ऐकून माझे तर कानच तृप्त झाले.
मी फक्त hmm असा रिप्लाय करत गाडी चालवत होतो. . . .
शेवटी तिचे हॉस्पिटल आले. आणि त्या वेताळबाईला तिथे सोडून मी गाडी घराकडे वळवली.
येताना तोच मार्ग निवडला. पण वाटेत पोलिसांनी पुन्हा अडवले. 😕
मग मी पुन्हा नम्र विनंती, घरी फोन वगैरे प्रयत्न करून तिथून घरी आलो..
(हुश्श सुटलो बाबा एकदाचा)
Read 10 tweets
27 Mar
GOOD AFTERNOON @SunderChavan

तुला एक चांगला सल्ला देतो. त्याआधी तुला एक समजावून सांगतो.
.@Shona__RS सोनल ताई हि मला मोठया बहिणी समान आहे
तिच्या मैत्रिणी :- वेदश्री, तृप्ती, इत्यादी या सर्वच मुली मला बहिणीसमानच आहेत.
या सर्व बहिणींच्या ट्विट पासून तू दूरच राहा, अगदी दुसऱ्या अकाउंट वरून पण ट्रोल वगैरे करायचे नाही.
कारण तुझी भाषा अगदीच गलिच्छ आणि अश्लिल स्वरूपाची आहे,

तू स्वतः राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मिरवतोय, आणि हे असले घाणेरडे चाळे करतोय,
बदनामी तुझी नाही तुझ्या पक्षाची होते.
आणि स्क्रिनशॉट वगैरे ते तुझ्याकडे असतील तर तू जास्त पावरफुल वगैरे ते गैरसमज सोड,

ते दादा, भाई , गुंड, पक्षाचा कार्यकर्ता, ती दहशद तिकडं गल्लीत दाखवायची, इकडं

आमच्या बहिणींना त्रास अजिबात द्यायचा नाही. रिट्विट वगैरे अजिबात नाही,
Read 7 tweets
25 Mar
Image
पांडवांनी खांडववन जाळले व त्या भूमीवर इंद्रप्रस्थ वसविले.युधिष्ठिर राजा झाला. पराक्रमी पांडवांनी चारी दिशांच्या राजांना जिंकून त्यांना मांडलिक बनविले. जरासंधासारख्या बलाढय राजालाही शिताफीने ठार मारले. त्यानंतर युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला. त्या महान सोहळ्याला विविध देशांचे राजे,
दुर्योधन, शिशुपाल, ऋषिगण, व्यास वगैरे आले होते. भीष्मांनी राजमंडळात श्रेष्ठ अशा कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला. कृष्णाच्या आतेभावाला दुष्ट शिशुपालाला ते रुचले नाही. त्याने भीष्मांची व कृष्णाची खूप निंदा केली. शिशुपालाच्या लहानपणच्या एका प्रसंगातून त्याच्या मातेला कळले होते की
Read 7 tweets
18 Mar
*त्रासांचं ओझं; सुखी राहण्याचा मार्ग*🌷🌷

तथागत गौतम बुद्ध आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे शंका निरसन करत असत. समस्येतून उपाय सांगत असत. त्यांच्याकडे आलेला कोणीही विन्मुख होऊन परतत नसे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या दुःखाची उकल करण्यासाठी तथागत बुध्दांकडे येत असे..
एक दिवस एक व्यक्ती एक प्रश्न घेऊन भगवान बुद्धांच्या भेटीस आली. भगवान बुद्धांच्या नुसत्या दर्शनाने त्या व्यक्तीचे मन शांत झाले.

ही मनःशांती सातत्याने अनुभवता यावी, म्हणून त्या व्यक्तीने भगवान बुद्धांना प्रश्न विचारला, 'भगवान,आम्ही संसारी माणसं छोट्या गोष्टींनी त्रासून जातो.
Read 12 tweets
17 Mar
सेक्युलर हिंदू बनून sorryAsif असले ट्विट टाकण्या पेक्षा

गुंड हिंदू बनून माझ्या हिंदूधर्माच्या पवित्र देवस्थानाच रक्षण केलेलं माझ्या मनालाही पटेल, आणि धर्मालाही पटेल

वो फिर आयेगा तो फिरसे मार खायेगा, संपला विषय

धर्मनिरपेक्ष (secular)हिंदूंनी आम्हाला हिंदुधर्म शिकवूच नये, 🙏🚩
तुमच्या मस्जिद मध्ये आम्हाला प्रवेश नाही,
आमच्या मंदिरात तुम्हलाही प्रवेश नाही,

आम्ही दर्ग्याचा अपमान करत नाही ,
तसा तुम्ही आमच्या देवळांचा अपमान करू नका,
#सर्वधर्म_समभाव 🙏🚩
हिंदू- सर्व धर्माचा आदर करणारा, शांततापूर्ण

हिंदुत्व- "भले तर देऊ कासेची लंगोटी, नाथळाचे माथी हाणू काठी" 🚩
'संत तुकाराम महाराज' 🙏

धर्मांध - औरंगजेब बादशहा ने कट्टरपणा दाखवला, कत्तली केल्या, मंदिर पाडली, वगैरे वगैरे, हा इतिहास झाला, अजून खूप काही आहे
Read 6 tweets
17 Mar
तुमचे विचार चांगले असतील तर तुम्हाला चांगल्या व्यक्तींची साथ सुद्धा मिळते,

LW किंवा RW करत बसण्यात काहीच अर्थ नसतो,
खेकड्यासारखं एकमेकांचे पाय ओढत बसून हिंदुत्वाचे विचार मांडताच येत नाही,
जातीपाती, राजकारण, याच्या दलदलीत अडकण्यापेक्षा हिंदुत्ववादी बनून विचार मांडले तरच योग्य व्यक्तींची साथ मिळते,

आपण राजकारनाच्या नादी लागून हिंदुद्वेष तर पसरवत नाही ना ?
हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा आधी,

बाकी जय शिवराय 🙏🚩
हे वरच सर्व त्या लोकांसाठी होत ज्यांचा #Secularism धर्मनिरपेक्षता, नास्तिकता
#सर्वधम_समभाव या शब्दावर त्यांचा अधिक विश्वास आहे,

"जेवढे लोक टॅग केलेत त्यांचे विचार मला जास्त पटतात, म्हणून मी त्यांची साथ देणारच"

बाकी गुलाम, चमचे वगैरे लोकांनी मला आत्ता unfollow करावं 🙏
Read 6 tweets
29 Jan
नेटवर्क मार्केटिंग (तुचिया बनाने की निन्जा टेक्निक)

कोणे एके काळी मी बेरोजगार झालो होतो,
दाढी वाढवून डायरेक्ट हिमालयात जाऊन राहण्याचा घरच्यांचा टोमणा ऐकून त्रासलेलो,
असेच एके दिवशी टोमणे ऐकून
बसलेलो असताना अचानक
इन्स्टाग्रामवर एका अप्सरेसमान सुंदर आशा मुलीचा Hi असा मॅसेज आला ,
मग तिला रिप्लाय न दयावा असे पाप कोण करेल, मी पण Hii असा रिप्लाय करून टाकला
तिथून बोलणे सुरू झाले, ते जॉबवर येऊन थांबले,
(घरी किंवा ऑफिस मध्ये आठवड्यातील फक्त 2-3 दिवस काम करून महिना 15 ते 20 हजार कमवा)
आशा टाइप ची ऑफर आली,
मी बेरोजगार होतो लगेच हो बोललो,
तिकडून सुंदरीचा मॅसेज
आला की तुम्हाला ट्रेनिंगला यावं लागेल,
त्यासाठी तुमची अपॉइंटमेंट फिक्स करते तुम्ही उद्या सकाळी 10 ला पाठवलेल्या पत्त्यावर या
मी ठीक आहे असं बोलून चॅट संपवली, घरी येऊन खुशखबर देऊन टाकली,
त्या दिवशी मी जमिनीपासून 4 बोट उंच हवेत चालत होतो,
Read 26 tweets