पाचवी पर्यंत पाटीवरची लेखणी जिभेने चाटत कॅल्शियमची कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती.
अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक चावून झेललं होतं...
पास / नापास हेच आम्हाला कळत होतं... % चा आमचा संबंध कधीच नव्हता.
शिकवणी लावली, हे सांगायला लाज वाटायची.... कारण "ढ" असं हीणवलं जायचं...
पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा दृढ विश्वास होता...
कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं...
Feb 28, 2021 • 4 tweets • 2 min read
नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा,
व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी,
घरी राहणाऱ्याला वाटतं काही तरी करावं पण घराबाहेर पडावं,
एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळा राहतो त्याचंच आईला कौतुक जास्त,
वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही,
गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा,
शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं आहे,
देशात राहतात त्यांना वाटतं परदेशी जावं,
परदेशात राहणाऱ्याना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतो,
केस सरळ असणारी म्हणते कुरळे किती छान
कुरळे केसवाली म्हणते किती हा गुंता