#मासळी#धागा
माशांची नावे सांगणारा एखादा धागा लिहावा असे वाटले, म्हणून हा प्रयास करीत आहे.
मुख्यतः समुद्री माशांची नोंद घेतलेली आहे.
१) तेली बांगडा (Indian Mackerel): चवीला उग्र असतो पण कोकणी वाटणात उत्तम बनतो. या माश्याला खोबरे,तिखट,तेल आणि आंबसूल(कोकम) लागते मगच चव भारी येते
२) काठी बांगडा (Horse Mackerel): हा तेली बांगडयांपेक्षा आकाराने किंचित मोठा आणि चंदेरी असतो. तेली बांगड्यात असलेली पिवळी छटा याला नसते. हा चवीला कमी उग्र असतो
Sep 25, 2021 • 7 tweets • 3 min read
E-SIM काय असते?
SIM म्हणजे Subscriber Identification Module.ही चिप आपला नेटवर्क प्रोव्हाडयर आपणास देतो जी मोबाईल मध्ये समाविष्ट केल्यानंतर आपण त्यांच्या नेटवर्कशी संलग्न होऊ शकतो व त्याच्या सुविधा वापरू शकतो.
सध्या ४ प्रकारचे Sim उपलब्ध आहेत
1.Normal
2.Micro
3.Nano
4.E-Sim
१/७
E-Sim ही एक सिलिकॅान चिप असते जी सध्याच्या नॅनो सिम पेक्षा दसपटीने लहान असून, ती मोबईल उत्पादक मदरबोर्डवर जोडून देतो.
आकाराने कमालीने लहान असलेली ही चिप अत्याधिक सुरक्षा व कार्यक्षमता पुरवते.
E-Sim हे Operating System च्या सुरक्षेत कटिबद्ध असते.
२/७
Sep 20, 2021 • 5 tweets • 2 min read
IP Rating म्हणजे काय?
हल्ली मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंना IP प्रमाणपत्र पुरवले जाते.
IP म्हणजे Ingress Protection म्हणजे बाहेरून आत येणाऱ्या कणांविरूद्ध सुरक्षा.
फोनची IP rating ही वापरानुसार कमी होत जाते. आज आपण त्याविषयीची अधिक माहिती घेऊया १/५
IP67 या प्रमाणपत्रात 6 अंक हा सॅालिड प्रोटेक्शन (स्थायू कणांविरूद्ध सुरक्षा) आणि 7 अंक हा लिक्विड प्रोटेक्शन (द्रव सुरक्षा) दर्शवतो.
धुळ व माती वगैरे कणांविरूद्ध सॅालिड प्रोटेक्शन मोजण्यात येते. ही गुणवत्ता 1 ते 6 च्या श्रेणीत मोजण्यात येते. इथे 6 ही सर्वोच्च गुणवत्ता आहे. २/५
Jul 3, 2021 • 17 tweets • 6 min read
फणसपुराण
फणसावर काहीतरी लिहावे असे बरेच दिवसांपासून मनात होते म्हणून हा प्रयास
आंबा व फणस ही कोकणातील मुख्य खाण्याची फळे.भारतात पुराव्याने फणस हा ६व्या शतकापासून आहे
फणस म्हंटले की मला आठवते ते लांबच्या वाडीतुन डोक्यावर फणस घेऊन आलेले तात्या.त्यांनी दारात येऊन फणस ठेवावा
१/१७
आणि ठेवणीतली साद द्यावी "वैनीनू फणस आणलाय लेकरांसाठी, वाईस पाणी देवा".
फणसाच्या प्रत्येक भागास विशिष्ठ नावे आहेत,माहितीसोबत फणसाचे भाग खालील चित्रात अधोरेखित करत आहे.
१)जो गर खाल्ला जातो ते गरे
२)बियांना आठळ्या म्हणतात
३)गऱ्यांच्या आजूबाजूच्या तंतूंना चिवर/पाती म्हणतात