श्री जोशी Profile picture
ना कुणाशी स्पर्धा ना कुणाचा द्वेष आम्ही धुंदीत आमुच्या ना मनात कसला क्लेश #श्रीबंधन #स्वर_मनातले #ऋणानुबंध #शब्द_श्री
Mar 21, 2023 7 tweets 5 min read
बीट ज्यूस पिण्याचे फायदे -

बीट हा असा एक पदार्थ आहे ज्याला तुम्ही कोणत्याही पद्धतीने खा त्याचा तुम्हाला फायदाच मिळतो. जर तुम्हाला बीटचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही त्याचा ज्यूस देखील पिऊ शकता. चला तर मग बीटचे आरोग्यदायी कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊयात..

👇🏻 1. रक्तदाब नियंत्रण : अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की बीटरस प्यायल्याने सिस्टोलिक रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी होतो. या रसामध्ये नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात. नायट्रिक ऑक्साईड रक्त पेशींना आराम देते आणि रक्त प्रवाह सुधारतो

👇🏻
Mar 20, 2023 5 tweets 4 min read
कोरफडीच्या ज्यूसचे फायदे -
कोरफडीचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले आहेत. यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन आणि प्रोटीन असतात. याचा ज्यूस प्यायल्याने शरीरास डबल फायदे होतात. हा ज्यूस प्यायल्याने २०० प्रकारचे आजार दूर होतात. कोरफडीचा ज्यूस बॉडीला डिटॉक्सही करतो.

👇🏻 यात मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे शरीरातील अनेक आजार दूर होतात. हा ज्यूस प्यायल्याने शरीरातील प्रतिकारक क्षमता वाढते. जर तुमचे वजन अधिक आहे आणि ते कमी करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते...

👇🏻
Dec 7, 2021 9 tweets 8 min read
सिंहगड
पुण्याजवळ असलेले दोन किल्ले म्हणजे पुरंदर आणि सिंहगड. हा गड पुण्याच्या नैऋत्य दिशेला २४ किमी अंतरावर आहे. खडकवासला धरण सोडले की आपण डोणजे गावापाशी येतो. हे गाव गडाच्या पायथ्याशी आहे. पुणे-डोणजे अशी सारखी बस आहे. पुणे-सिंहगड अशी पीएमटी बससुध्दा दर अर्ध्या तासाला आहे.

👇🏻


Image
Image
Image
Image
पूर्वीपेक्षा आता गडावर जाण्यास सोय चांगली झाली आहे. गडावर हिवाळा व उन्हाळ्यात भरपूर गर्दी असते. गडाची उंची १३१७ मी. आहे. डोणजे गावाच्या पुढे चढावाला लागलो की ६७० मीटर चढावे लागते. कल्याण गावाकडील चढ़ सोपा आहे. आता थेटपर्यंत डांबरी सडक झाली आहे.

👇🏻


Image
Image
Image
Image
Sep 4, 2021 7 tweets 6 min read
आंबा गाव - कोल्हापूर
कोल्हापूरहून प्रथम पन्हाळा मग बांबवडे, मलकापूर, चांदोली, वारूळ अशी गावं करत आपण शाहूवाडी तालुक्यातील आंबा गावी येऊन पोहोचतो. बघितलं तर वाटेत भात लावणीची कामं जोरदार सुरु असतात.
आंबा गावामध्ये पोहोचल्यावर एक फाटा विशाळगडकडे जातो. हा रोड म्हणजे एक घाटच आहे.

👇🏻


Image
Image
Image
Image
या घाटरस्त्यावरून आपण कधी जंगलाच्या रोडवर येऊन पोहोचतो कळतंच नाही. वळणावळणाचा रस्ता, उंचच्या उंच झाडं, दोन्ही बाजूला असलेलं जंगल असा हा मार्ग. वाटेमध्ये "वन्यप्राण्यांना जाण्यासाठी प्रथम जागा द्या, संरक्षित क्षेत्र" असे फलक लावलेले दिसतात, या गोष्टी आपण पाळल्याच पाहिजेत.

👇🏻

Image
Image
Image
May 13, 2021 6 tweets 3 min read
"आरे-वारे बीच" रत्नागिरी

एका बाजूने घाट आणि दुसऱ्या बाजूने समुद्रकिनारा असे सहसा न पाहिलेले "कॉम्बिनेशन' पाहायचे असेल, तर रत्नागिरीजवळच्या आरेवारे बीच ला भेट द्यायलाच हवी. रत्नागिरी पासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आरेवारे समुद्रकिनारा आहे. पर्यटकांची नेहमीची गर्दी
👇
Image
Image
समुद्रकिनाऱ्यावरील कलकल इथे बघायलाही मिळणार नाही. त्यामुळेच दूरवर पसरलेला समुद्र, पांढरीशुभ्र रेती, आजूबाजूला नारळाची आणि सुरुची बने अशा अस्सल कोकणातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव येथे घेता येतो. अजूनपर्यंत पर्यटकांची "वक्रदृष्टी' इथे पडली नाही.हेच आरेवारेच्या सौंदर्याचे गुपित आहे
👇
Image
Image
May 6, 2021 10 tweets 3 min read
"दाभोळ"
हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक निसर्गरम्य गाव आहे. या गावच्या खाडीपलीकडे गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावी रत्नागिरी पॉवर प्रोजेक्ट प्रा.लि. (पूर्वीची दाभोळ पॉवर कंपनी) हा विद्युतनिर्मिती प्रकल्प आहे.
प्राचीनकाळी दालभ्य ऋषींच्या नावावरून यास दाभोळ नाव पडले असे मानले जाते..
👇 Image दापोलीकडून दाभोळ गावात प्रवेश करताना सड्यावरून खाली चिपळूणकडील येणारी वाशिष्ठी नदी,पलीकडील डोंगरावरचा गोपाळगड किल्ला व टाळकेश्वरच्या देवळाचे शिखर,दाभोळकडील बाजूचे मशिदीचे मिनार, शिळावरचे मारूती मंदिर,समुद्र किना-याला लागून वाढलेले सुरूचे दाट बन आणि खाडीच्या किनारपट्टीत वाढलेले
👇 Image