Sahil V Profile picture
काफ़िर हूँ साहब दुनिया को सच्चाई दिखाता हूँ।🖤
आदिती 🍁 Profile picture 1 subscribed
Oct 2, 2021 4 tweets 1 min read
गांधींचे राष्ट्रपितापण हे कुणाच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नाही आणि कुणाच्या मेहेरबानीने ते महात्माजींना मिळालेले नव्हते. शतकानुशतके अन्याय आणि शोषणामुळे अवनत झालेल्या करोडो भारतीयांच्या उत्थानाचा आशय गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडला. अस्पृश्य, दलित, शेतकरी, कष्टकरी, महिला अशा सर्वानीच आपले उत्थान भारतीय स्वातंत्र्यलढय़ात पाहिले. सर्वाच्या दु:खांवर गांधींनी आपल्या करुणेची केवळ फुंकरच घातली नाही, तर त्यांच्यातील स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत करून समतेवर आधारलेला राष्ट्रवाद गांधींनी उभा केला.
Feb 6, 2021 25 tweets 5 min read
मैं नमाज़ नहीं पढ़ूंगा...

ईद का दिन था
सुबह-सुबह किसी ने टोका,“ईद मुबारक हो!”
मैंने कहा, “आपको भी ईद मुबारक हो!”
सवाल हुआ, “नमाज़ पढ़ने नहीं गए, “लेकिन स्वीमिंग करने जा रहे हो!”
मैंने कहा, “हां, मैं नहीं गया”
क्यूंकि मैं नाराज़ हूं उस ख़ुदासे जो ये दुनिया बना के भूल गया है जो कहीं खो गया है या शायद सो गया है
या जिसकी आंखें फूट गई हैं
जिसे कुछ दिखा नहीं देता
कि उसकी बनाई हुई इस दुनिया में क्या-क्या हो रहा है
हां, मैं नाराज़ हूं
और तब तक मस्जिद में क़दम नहीं रखूंगा
जब तक गोरखपुर के बाबा राघव दास मेडिकल कॉलेज में मरे
Aug 2, 2020 21 tweets 4 min read
पर्यावरण संदर्भात भारत सरकार कोरोना परिस्थितीचा गैरफायदा घेऊन उद्योगपतींच्या फायद्यासाठी EIA च्या कायद्यामध्ये बदल करत आहे. त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे कृपया सर्वांनी वाचा आणि पर्यावरण वाचवण्यासाठी @Nirmiti4Change सोबत प्रयत्न करा...🙏🏻 EIA - Environmental Impact Assessment (पर्यावरणीय प्रभाव अभ्यास)

१५ मार्च २०२० ला सरकारने EIA कायद्यात बदल करण्यासंदर्भात माहिती जाहीर केली. लोकांची मते जाणून न घेणे आणि कोरोनाचा गैरफायदा घेऊन उद्योगपतींच्या फायद्याचे कायदे बनवणे हा मुख्य हेतू.
Jul 25, 2020 9 tweets 2 min read
देशात आजही अनेकांना दलित आरक्षण संपावे असे वाटते. पण देशात दलितांची परिस्थिती कोणी जाणून घेत नाही. त्यांच्यावर होणारे अन्याय आजही थांबलेले नाहीयेत. उच्च जातीकडून दलितांवर होत असलेले अन्याय आणि त्यांची परिस्थीती आपण पाहू शकता..👇 National Family Health Survey Data अनुसार दलित महिलांचे सरासरी मृत्यू वय ३९.५ वर्ष इतके आहे. तर उच्च जातीतील महिलांचे हेच वय ५४.१ वर्ष इतके आहे. जवळ जवळ १४ वर्षाचा फरक आहे.
Jun 25, 2020 14 tweets 4 min read
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निम्मित मानाचा मुजरा...🙏🙏💐

शाहू महाराज यांच्या माहितीवर आधारित मालिका सुरू केली होती त्या मालिकेची लिंक दिली आहे ज्यांना शाहू महाराज समजून घ्यायचे असतील त्यांनी सर्व थ्रेड नक्की वाचा..👇🙂

#शाहूमहाराज
#ShahuMaharaj
Jun 25, 2020 23 tweets 3 min read
छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांची शेवटची भेट...

"दीनदुबळ्यांच्या भवितव्यावरचा सर्चलाईट विझला..." शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाला दिलेला आश्रय‚ त्यांच्या जलशांना दिलेले उत्तेजन‚ ब्राह्मणेतर पक्षाची केलेली स्थापना आणि त्या माध्यमातून घेतलेला कायदे मंडळीच्या निवडणुकीतील सहभाग‚ अस्पृश्यता निवारणाचे कायदे‚ कुलकर्णी वतन बरखास्ती अशा एक ना दोन उपक्रमांमुळे
Jun 24, 2020 18 tweets 3 min read
"राजर्षी शाहू महाराज" आणि "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांच्या उपस्थितीत झालेली प्रसिद्ध 'अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्णाची माणगाव परिषद...' 👇 माणगावच्या बहिष्कृत मंडळांनी
अस्पृश्य समाजातील उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणाचा म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्याचे ठरवले. या मंडळींचे जातीभेद मोडून काढून एकीने लढण्यासाठी परिषद घ्यायची असे ठरले. या चर्चेत खुद्द नाना मास्तर, गणू मसू सनदी, नागोजी यल्लापा कांबळे,
Jun 23, 2020 13 tweets 2 min read
पृथ्वीवर ‘ब्राह्मण’ मुळीच नाहीत!

नागपूर येथे ‘अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदे’च्या समारोपप्रसंगी राजर्षी शाहू महाराजांनी केलेले हे छोटेखानी भाषण
(दि ३० मे १९२०). या पृथ्वीवर आता ब्राह्मण व शूद्र असे दोनच वर्ग अस्तित्वात आहेत‚ असे प्रतिपादणाऱ्या अहंकारी ब्राह्मण पंडितांवर महाराजांनी येथे कठोर हल्ला चढविला आहे. ब्राह्मण सोडून बाकीचे तिन्ही वर्ग जिवंत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे.
Jun 22, 2020 12 tweets 2 min read
राजर्षी शाहू महाराज यांच्यावर झालेले कमरेखालचे वार...👇 राजर्षी शाहू महाराजांना ब्रिटिश साम्राज्य सत्तेशी राजनैतिक संबंध ठेवणे गरजेचे होते. आणि एक हिंदी मांडलिक संस्थानिक म्हणून राजनैतिक कर्त्यव्यही होते. रयतेचे भले हाच त्यामागील हेतू होता. याचे भान आजही ठेवणे गरजेचे आहे.
Jun 21, 2020 25 tweets 3 min read
छत्रपती शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गाजलेले "डांबर प्रकरण" 👇

चित्र साभार :
चित्रकार - विजय चोकारकार | राजर्षी : उमेश सुर्यवंशी. १४ फेब्रुवारी १९१४च्या रात्री उशिरा बादशहा सातवे एडवर्ड व महाराणी अलेक्झांड्रा यांच्या पुतळ्यास कोणीतरी डांबर फासल्याचे पहाटे पहाटे निदर्शनास आले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुढे हिंदुस्थान सरकारने रामकृष्ण हणमंत पागे या गुप्तचर अधिकाऱ्यास कोल्हापुरात पाठविले.
Jun 20, 2020 17 tweets 3 min read
"छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यातील नाते"
आवर्जून वाचण्यासारखे..👇🏻 प्रबोधनकार ठाकरे खूप दिवसापासून आजारी असल्याची बातमी शाहू महाराजांना समजते तेव्हा शाहू महाराज आपल्या श्रीपतराव या कार्यकर्त्यांकडून पाच हजार रुपयाचा चेक मदत पाठवतात, ती मदत पाहताच ‘‘पैशाच्या जोरावर अनेक माणसांची मी गाढवे बनविली आहेत’’असे महाराज एका भेटीत म्हणाल्याचे त्यांना आठवते
Jun 19, 2020 15 tweets 2 min read
"आजचा कोरोना आणि छत्रपती शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षे आधी दिलेला प्लेग विरुद्धचा लढा."

खूप काही शिकण्यासारखे...👇 शाहू महाराजांनी १८९६-९७ काळात कोल्हापूर संस्थानात आलेली प्लेगची साथ आणि दुष्काळा या दोन्ही विरूद्ध दिलेला लढा आपल्यासमोर आदर्श ठरेल.
Jun 16, 2020 13 tweets 2 min read
"शाहू महाराज यांनी खेड्यातील "कुलकर्णी" वतने नष्ट करून ब्राम्हणी वजन समाजातून कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न." 👇
(भाग -२)

"कुलकर्णी" वतन खालसा करण्यासाठी काढलेला हुकुम महाराजांनी जुलै मध्ये अमलात आणला. त्यानंतर कुलकर्ण्यांनी महाराजांशी पत्रव्यवहार सुरू केला. त्याचबरोबर सर्व कुलकर्णी मंडळींची पहिली सभा शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली मठात भरली.

शाहू महाराजांनी कुलकर्ण्यांच्या पत्रास प्रतिउत्तर म्हणून एक पत्र अगदी युक्तिवादासहित पाठविले. हा युक्तिवाद पुढीलप्रमाणे:
Jun 15, 2020 15 tweets 2 min read
"शाहू महाराज यांनी खेड्यातील "कुलकर्णी" वतने नष्ट करून ब्राम्हणी वजन समाजातून कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न." 👇
(भाग - १) कोल्हापूर संस्थानात प्रत्येक गावात एक "कुलकर्णी" असायचे. यांचे वेतन क्षुल्लक असले तरी अनेक ब्राम्हण या कामासाठी तयार असायचे. गावचा पाटील हा "राजा" समजला जायचा पण हा राजा निरक्षर आणि अडाणी असल्यामुळे सर्व कारभार "कुलकर्णी" सांभाळायचे.
Jun 14, 2020 14 tweets 2 min read
भाग - २
"शाहू महाराज यांचा ऐतिहासिक जाहीरनामा"

धनंजय कीर हे महाराजांचे चरित्रकार होते ते जाहीरनाम्याबद्दल लिहितात,
"नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत" हा जाहीरनामा प्रसिद्ध होताच ब्रम्हवृंदाच्या पायाखालची जमीन सरकली. ब्राम्हण लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. अनेक मार्गांनी विरोध होऊ लागला.
Jun 13, 2020 17 tweets 3 min read
"शाहू महाराज यांचा ऐतिहासिक जाहीरनामा"

शाहू महाराजांच्या आधी जवळपास ५०-६० वर्षे कोल्हापूर संस्थानाच्या राजवटीत अल्पवयीन राजे झाले.हेच कोल्हापूर संस्थानाच्या लोकांचे दुर्दैव होते. त्यांना खऱ्याखुऱ्या राजाची गरज होती. पण ती ५०-६० वर्षे कोल्हापूरकरांसाठी दुर्दैवी आणि अंधकारमय ठरली. याच काळात अनेक कृष्णवर्णीयांची प्रकरणे गाजली होती. शाहू महाराजांचे दत्तक पिता, चौथे शिवाजी महाराज यांचे मानसिक छळ आणि अहमदनगर येथील बंदिवासात झालेली हत्या. अशा घटनेमुळे कोल्हापूर त्याचबरोबर महाराष्ट्र थरारून गेला होता.
Jun 6, 2020 13 tweets 3 min read
महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला विरोध केला, हे सत्य तर सर्वांना माहीतच आहे. चातुर्वर्ण्याच्या रचानेप्रमाणे व हिंदू धर्मशास्त्रप्रमाणे राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणांना आणि क्षत्रियांनाच होता. शिवाजी शुर असला, त्याने राज्ये कमावले असले, तरी तो राजा होण्यास पात्र नाही असे धर्ममत होते. काहींना त्याच्या क्षत्रियत्वाची शंका होती. आणि उरलेल्याना तो मुळात क्षत्रिय कुळातला असला तरी संस्कारक्षय झाल्याने क्षत्रिय राहिला नव्हता. शिवाजीची मुंज झाली नव्हती. मंत्रविधिसह लग्न झाले नव्हते. मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार?
May 27, 2020 16 tweets 3 min read
भक्तांशी भिडत असतो तेव्हा भक्तांना मुद्द्यावर बोलायचं नसेल तेव्हा त्यांच्या तोंडातून काफिर शब्द नक्की निघतो... काही कट्टर हिंदू संघटनांनी मुस्लिम धर्माला बदनाम करण्यासाठी कुराणच्या अर्धवट आयतांचा आधार घेतला. त्यातील काफिर एक. त्यांच्या मते मूर्तिपूजा करणारे काफिर असतात. त्यांना मारा आणि त्यांना धर्मपरिवर्तन करायला लावा असं कुराण सांगतो. आणि त्यामुळे मुस्लिम लोक हिंदूंना मारतात.
May 23, 2020 13 tweets 3 min read
"लव्ह जिहाद" हे Oxymoron आहेत. याचा अर्थ असा की, या दोन शब्दांचा उपयोग एकत्र केला जातो पण त्यांचे अर्थ पूर्णतः भिन्न आहेत. वरती दिलेल्या Image वरून दिसून येईल की, जेव्हा जेव्हा धार्मिक तेढ निर्माण करायची वेळ येते तेव्हा महिलांना प्रदर्शित केले जाते. त्यांच्या शिक्षणावर, त्याच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न चिन्ह उभे केले जातात. पुरुष प्रधान संस्कृतीला महिलांवर लादलं जात. लव्ह जिहाद त्यापैकीच एक.
May 14, 2020 8 tweets 2 min read
“संभाजी महाराजांनी काय केले?” असा प्रश्न जे विचारतात – खास त्यांच्यासाठी पुढील माहिती – संभाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये ५००० किलोमीटरची भर घातली. त्यांनी दक्षिणेवर दोनदा स्वारी करून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू प्रांत स्वराज्याला जोडले.

जंजिऱ्याजवळ फेसाळलेल्या लाटांना ठेचत ८०० मीटर लांबीचा पूल बांधला. आरमार वाढवून सागरालाही आपल्या कवेत घेतले.
Apr 19, 2020 10 tweets 3 min read
1946 मध्ये भारत पाकिस्तान या दोन राष्ट्रांच्या बरोबर देशाच्या मालमत्तेचे देखील विभाजन झाले. त्यातील काही मजेशीर गोष्टी मांडतो आहे. नक्की वाचा.👇🏻1/8
@ImLB17 @prash_dhumal @iamShantanu_D @Mauli6510 @Kartik_N_Jadhav @Bhilavadeamol @faijalkhantroll @ShubhamJatal1 @Manoj2211Khare सरकारी कार्यालयातील सर्व साहित्यांचे 80-20 प्रमाणात वाटप झाले. 80% भारत आणि 20% पाकिस्तान. खुर्च्या, टेबल, निब, रबर, टाईप राईटर, झाडू. अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी वाद विवाद होऊ लागले. पाण्याच्या जगाच्या बदली शाईची बाटली. तर मुत्रालयातील भांड्याच्या बदल्यात 125 पिन बॉक्स. 2/8