Sanket Phadke । sahyafirasti Profile picture
Nationfirst | IT Student | Traveller | Historylover | Researcher | वैयक्तिक मते |
Sep 21, 2021 4 tweets 1 min read
श्री नरेंद्र मोदी : लोकनेता ते विश्वनेता

गेल्या सात वर्षात पंतप्रधान काळातील प्रवासाची वाटचाल पाहिली तर ' लोकनेता ते विश्वनेता ' अशी राहिली आहे. भारतीय संस्कृतीची जीवनमूल्ये जगणारे आणि आपली जीवनमूल्ये पटवून देण्याचे , म्हणजेच जागतिक परिभाषेत सांगायचे तर 'कल्चरल सॉफ्ट पॉवर' प्रभावी रितीने मांडण्याचा प्रवास त्यांचा कार्यकाळात झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रवासाची वाटचाल सा विवेकच्या आगामी 'लोकनेता ते विश्वनेता' या ग्रंथाद्वारे उलगडली जाणार आहे.
Aug 17, 2021 4 tweets 1 min read
मदनलाल धिंग्रा : (१८ सप्टेंबर १८८३ - १७ ऑगस्ट १९०९ )

भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक थोर हुतात्मा!

जालियनवाला बाग इतिहासाची काही पात्रे लगेच डोळ्यासमोरून फिरू लागतात तो हरामखोर क्रूरकर्मा जनरल डायर, हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा मदनलाल धिंग्रा.. हुतात्मा भगतसिंहांनी येथीलच माती घरी नेली होती आणि त्यातूनच त्यांना क्रांतिकाऱ्याची पहिली प्रेरणा भेटली होती.

या ठिकाणी आणखीन एका क्रांतिकारकांचे नाव घ्यावे लागते ते म्हणजे हुतात्मा मदनलाल धिंग्रा ,यांनी ही या त्याक्रूर भारतमंत्र्याचा स्वीय साहाय्य्क कर्नल विल्यम कर्झन वायली
Mar 11, 2021 6 tweets 2 min read
हल्ली एक नवीन फॅड आलंय, एक फोटो दाखवायचा आणि म्हणायचं, "इतरांची सही सगळेच घेतात, पण हि माझ्या राजाची सही", आणि मग मोडीत लिहिलेला एक शब्द दिलेला असतो.

याने होतं काय, कि वाचणाऱ्या व्यक्तीला मोडी येत नाही त्यामुळे काय लिहिलंय ते नेमकं समजत नाही. पाठवणाऱ्या व्यक्तीला मुळात मोडी येत नसल्याने, केवळ मोडी हि शिवकालीन लिपी, त्यामुळे प्रत्यक्ष महाराजांची म्हणून तो समोरच्याला काहीही माहित नसताना चिकटवून देतो ! अशाने काय होतं ? जी गोष्ट मुळात नाही ती पसरण्यास आपण कारणीभूत होतो.

असेच हे दोन फोटो पुढे देत आहे.
Mar 11, 2021 7 tweets 3 min read
किती गोड पोरगी ही.. पाहताक्षणी उचलून घ्यावं आणि पोट भरून पापे घ्यावेत अशीच नाही का?

कोणाला खरं वाटेल की ही सध्या "स्पायनल मस्क्युलर ऍट्रॉफी" सारख्या जीवघेण्या आजाराशी लढतीये? ह्यावर भारतात औषध नाही. परदेशात ह्यावर जालीम इंजेक्शन आहे, ज्याची किंमत आहे १८ कोटी रुपये. घरची परिस्थिती एवढी नाहीये कि ते स्वतः हा खर्च करू शकतील. आत्ताच ही बातमी न्यूज १८ लोकमतवर पहिली.

ह्या आजारात एक एक अवयव निकामी होत जातो. अवयव निकामी झाल्यावर इंजेक्शन देऊन गेलेला अवयव परत आणता येत नाही.
Jul 24, 2020 5 tweets 2 min read
#पोलिसांमधला_माणूस
काल माटुंगा (दादर) येथे बंदोबस्त करत असताना एक १४ वर्षाचा मुलगा आला आणि विचारलं ,"साहेब चहा घेणार का ?" कारोना सारख्या महामारीचा विचार करून आधी वाटल हा कोण ? कसा आहे चहा ? कसा बनवला असेल ? म्हणून त्याला नाही सांगितले.
पण नंतर समजले नाही मनात काय विचार आला.. त्याला बोलवून घेतले सहज विचारलं, "बाळा नाव काय तुझं?" "सागर माने" असं नाव सांगून त्याने नकळत अंगावर असलेल्या वर्दी कडे बघितले. त्याला विचारले, "बाळा चहा का विकतोस?" तर त्याने सांगितले "२९ मार्च ला वडील वारले, त्यांचं चहा च कॅन्टीन होतं, आता पर्यंत जितकं कमवल होत तितकं सगळ संपलं
Jul 10, 2020 11 tweets 3 min read
छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले शेकडो वर्षांनीसुद्धा ताठ मानेने अभेद्यपणे उभे आहेत.
शिवरायांनी गडकिल्ले तुम्हाला सिगरेट ओढायला जिंकले का?गड-किल्ल्यांच्या बाबतीत नेहमी एक गोष्ट समोर येते,ती म्हणजे गड- किल्ल्यांवर होणारा व्यसनी लोकांचा धिंगाणा Image वाढती व्यसनाधीनता आणि सामाजिक बेजबाबदारपणा यामुळे अनेक गडकिल्ले असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकले आहेत. कधी दारूचे अड्डे तर कधी गर्दुल्यांचे अड्डे तर कधी सिगरेट, हुक्का पिणे.गड-किल्ले हा केवळ सामाजिक किंवा सांस्कृतिक विषय नाहीये.
Jun 29, 2020 11 tweets 5 min read
ट्रेकिंग करणे जितकं वाटत तितकं सोपं नाही.येण्या जाण्याची सोय बघणं.सगळ्यात अवघड म्हणजे पहाटेच्या साखर झोपेतून जागे होऊन सह्याद्रीची वाट धरण.आडवे उभे डोंगर चढण येड्या गबळ्यांच काम नाही.चालताना लागणार दम ,येणारा घाम हे सगळं सहन करावं लागतं.इथं सगळ्याची तयारी ठेवावी लागते. उन्हासाठी सनब्लॉक, टोपी, गॉगल असेल , पावसासाठी वाऱ्यासाठी जॅकेट आणि थंडी साठी कानटोपी, थर्मल्स, स्वेटर...याच्यासाठी हे आणि त्याच्यासाठी ते..तरीही जोरात पाऊस यायच्या आत त्यात उबदार गोष्टींचा बंदोबस्त असून.थंडी वाजणार नाहीच तळपत्या उन्हानं सनबर्न होणार नाहीच याची काही खात्री नाही.
Jun 24, 2020 5 tweets 2 min read
गडावर हनुमानाची मूर्ती का असते?
वायूप्रमाणेच हनुमानाची गती, तेज व त्वरा आहेत. तो पर्वतप्राय प्रचंड रूप धारण करू शकतो; यथेष्ट रूप धारण करण्याचा त्याचा हा गुण तर खास यक्षवंशीय गुण आहे. नंतरच्या काळात हा पूर्वीचा यक्ष- हनुमान रामकथेशी जोडल्यामुळे आदर्श रामभक्त म्हणून जनमानसात रूढ झाला. हनुमान शेंदूरलिप्त, रक्तवर्ण, भुतांचा स्वामी, रोगांपासून वाचविणारा, संततिदायक असल्याने गावात याचे स्थान पाण्याजवळ, पिंपळाखाली पारावर किंवा वेशीजवळ आढळते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक किल्ल्यावर कमीत कमी ५० तर जास्तीत जास्त २००० चे सैन्य असे.
Jun 22, 2020 7 tweets 2 min read
"गोंदया आला रे "
२२ जून १८९७ साली पुण्याच्या गणेशखिंडीत आरोळी घुमली! गोंदया आला रे...
आणि पुण्यावर अत्याचार करणाऱ्या रँडचा वध !!!
प्रसंग १ : रात्रीच्या वेळी एक बग्गी जातेय. फक्त घोड्यांच्या टापंचा आवाज, मागे एक तरुण धावतोय. योग्य ठिकाणी तो आवाज देतो. "अण्णा गोंद्या" शेजारच्या झाडीतून एक तरुण बाहेर येतो व बग्गीवर चढून गोळीबार करतो.

प्रसंग २ : धावत एक तरुण घरात घुसतो. लोकमान्यांना कार्यक्रमातून बाहेर बोलावतो आणि सांगतो की " खिंडीतला गणपती नवसाला पावला"