shrenik Narade Profile picture
Apr 14 8 tweets 2 min read
मोदींनी झोला उचललेला आहे. भाजप काय NDA सुद्धा सत्तेवर येत नाही.

आज भाजपचा जाहीरनामा आला. तो पुर्णतः फेल गेला आहे. काहीही बकवास मुद्दे आहेत. ज्यांचा जनतेशी कसलाच थेट संबंध नाही. उदा. एक देश एक निवडणूक चा जनतेला काय फायदा? एरवी १५ लाख खात्यात टाकण्याची भाषा करणारी भाजप (१) काहीच उधळपट्टी घोषणा जनसामान्यांसाठी कशी काय करू शकत नाही हा प्रश्न पडला असेल. तर त्याची उत्तरं तशी पाहीली तर सोप्पी आहेत आणि तितकीच भयानक आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. देशावर २००लाख कोटीच्या पुढं कर्ज झालं आहे. हा देश उद्योगपतींच्या दावणीला बांधून पुर्णतः खिळखिळा झाला आहे (२)
Apr 6 4 tweets 1 min read
मविआने काँग्रेसच्या जाहिरनाम्याचा फायदा करून घ्यावा.

काल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये सर्वसामान्य लोकांना अपील होणारे मुद्दे आहेत.

+ गॅस सिलिंडर फक्त ४५० रूपयांना मिळणार

+पेट्रोल डिझेल च्या किंमती कमी करणार

+महिलांना वार्षिक ७०००० देणार (१) + कृषी साधनांवरील कर कमी करणार

+ अग्निवीर भरती रद्द करून जुनी भरती योजना आणणार

+आरक्षणाची मर्यादा वाढविणार

+रेल्वे भाडे कमी करणार

यासह अनेक महत्वाची आश्वासनं सामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून जाहीर केलेली आहेत.

मविआमध्ये काँग्रेस वगळता घटक पक्षांकडे गद्दारी (२)
Jul 6, 2023 7 tweets 2 min read
फडणवीसांचा डाव लोकसभेला उलटणार!
अजितदादा यांच्या सरकारात शामील होण्यामूळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला असून ती मतं लोकसभेला भाजपला प्लस होतील हे गणित फडणवीस समर्थक घालत आहेत. (१) भाजपच्या मतदारांचा राग मूळातच राष्ट्रवादी काँग्रेस वर होता. काँग्रेस किंवा शिवसेनेबद्दल त्यांना विशेष राग नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल त्यांचा टोकाचा रोष होता.
नाही नाही नाही म्हणत फडणवीसांनी किंवा भाजपने दादांना उपमुख्यमंत्री केलंच‌. (२)
Jul 5, 2023 7 tweets 1 min read
अजितदादा वय वर्षे ६० ओलांडून गेलेत. त्यांच्या हातात पक्षाचा कारभार येईल म्हणून आजवर त्यांनी जो आदेश येईल त्याचे पालन केले. वाट्याला येईल ती भूमिका बजावली. प्रसंगी अपमान गिळले.
त्यानंतर ही जर त्यांच्या हातात कारभार येत नसेल तर त्यांनी उचललेलं पाऊल चुकीचं होत नाही (१) आजचं त्यांचं भाषण हि त्यांची खदखद होती. ती बाहेर निघाली. त्यांच्याकडे क्षमता आहे. वय आहे. मागून आलेली पोरंटोरं जर मुख्यमंत्री होत असतील आणि आपल्यात क्षमता असूनही आपण जर स्वकीयांच्या हट्टापोटी आपल्याला संधी मिळत नसेल तर करावं तरी काय? (२)
Jul 4, 2023 10 tweets 2 min read
अजितदादा चूकीचे की बरोबर?
अजितदादा हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांना खरेतर सिनियर राजकारणी. मात्र अजितदादांचे नशिब म्हणा किंवा आणखी काही पण फडणवीस शिंदे हे त्यांच्या अगोदर मुख्यमंत्री झाले. हेच नव्हं तर कशात काही नसताना उद्धव ठाकरेंना ही चान्स मिळाला (१) ठाकरे, शिंदे, फडणवीस या तिघांहून सरस @AjitPawarSpeaks आहेत. यात महाराष्ट्राला शंका नाही. अगदी विरोधकही हे उघडपणे मान्य करतात. दांडगा प्रशासकीय अनुभव, कामं करायची तर ती बेधडकपणे, बोलायचं तर बिनधास्त आणि उघड. छक्केपंजे नाहीत. (२)
Jun 6, 2023 7 tweets 1 min read
वृक्षारोपणाचा मुर्खपणा!
आता पावसाळा तोंडावर आला आहे, गावागावात वृक्षारोपणाचे पेव फुटते, मग कशीही झाडं लावा, हिरवागार निसर्ग, हिरवाई, सावली, अॉक्सिजन अशा काही नावाखाली हे सुरू होतं. वृक्षारोपण चुकीचे नाही. मात्र वृक्ष कुठं लावावे? हे बऱ्याच जणांना कळतच नाही (१) गेल्या चारदोन वर्षात महाराष्ट्रात एक भिकार प्रकल्प सुरू झाला आहे. तो म्हणजे माळरानावर वृक्षारोपण करण्याचा!
ओसाड माळरान हि पर्यावरणातील एक महत्वाची गोष्ट आहे पण तिथंही आपले गावकरी लोकं अलिकडे वृक्षारोपण करत आहेत आणि हे सर्रास चुकीचे आहे (२)
May 21, 2023 7 tweets 3 min read
बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डीचे काँग्रेस आमदार, सतिश जारकीहोळी. ज्यांचा कालच्या मंत्रीमंडळात समावेश झाला.
त्यांच्याबद्दल चर्चा होणे महत्त्वाचे वाटते.

सतिश हे अशुभ मानल्या जाणाऱ्या राहू काळातच आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात.
स्मशानभूमीत जाऊन सभा घेतात. (१) Image मागे एकदा दिल्ली मधील केंद्रीय मंत्र्याच्या घरी राहू काळाचा मोठा बोर्ड लावलेला फोटो सोशल मिडिया वरून व्हायरल झाला होता. तर आपल्या देशातील राजकारणी हे जोतिष, पंडीत, बाबा बुवा यांच्या नादी लागले असताना सतिश जारकीहोळी यांचं वेगळेपण उठून दिसतं (२) Image
May 20, 2023 7 tweets 2 min read
धनगरांच्या घरी जन्मलेला मुलगा, तिथून वकील झाला, नंतर राजकारणात आला आणि आज दूसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या जेव्हा शपथविधीसाठी उठले तेव्हा लोकांचा जल्लोष बघण्यासारखा होता. स्टायलिश नाही, उच्चवर्णीय नाही मात्र लोकांना तो आपला वाटतो (१) Image सिद्धरामय्या यांचे व्हायरल होणारे रील किंवा व्हिडिओ बघा. त्यात अतिरंजित किंवा लै भारी असं ईडिटींग नाही. आपल्या नगरसेवक लोकांचे कितीतरी स्टायलिश व्हिडिओ प्रसिद्ध होत असतात तशी इथं काही भानगड नाही. इथे जो काही आहे तो सच्चेपणा आहे. (२)
May 19, 2023 6 tweets 3 min read
उत्तर प्रदेश निवडणूकीच्या थोडं आधी @iamsrk चा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. ती अटक खंडणी उकळण्यासाठी केली होती हे रोज पुराव्यानिशी तत्कालीन मंत्री @nawabmalikncp हे मांडत होते. तेव्हा अनेक लोक मलिक साहेबांना दोषी ठरवत होते. (१) Image आता त्यावेळचा NCB zonal director समीर वानखेडे याच्याविरोधात CBI ने FIR दाखल केली आहे. कोट्यावधी रूपयांची खंडणी उकळण्यासाठी आर्यन खान याला अटक केली होती. हे आता CBI च सांगत आहे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप पुर्णतः खरे ठरत आहेत. (२)
May 18, 2023 4 tweets 1 min read
महाराष्ट्रात भाजपचा पराभव होणार हे आज @Dev_Fadnavis यांनी आज अप्रत्यक्षपणे मान्य केलं. ते म्हणाले कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, इथे फक्त मोदी पॅटर्न चालेल.
पराभवाची चाहूल लागली की माणूस कधीच स्वतःवर जबाबदारी घेत नाही. फडणवीस यांनी मोदींना पुढं करून (१) Image स्वतःला पराभवास कारणीभूत होण्यापासून वाचवलं आहे.

महाराष्ट्रात भाजप विरोधी जोरदार वातावरण आहे. त्याच भितीमुळे जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका इ. निवडणूक घेण्याचे धाडस भाजप करत नाही. त्यांना माहीत आहे निवडणूक लागली रे लागली लोक भाजपला पाडायची वाटच बघत आहेत. (२)
May 13, 2023 10 tweets 2 min read
भारत जोडो यात्रेची भाजप आणि त्यांच्या बेअक्कल भक्तांनी यथेच्छ चेष्टा केली. मात्र सर्वसामान्य लोक @RahulGandhi ला येऊन भेटत होते, मिठ्या मारत होते. देशात जातीधर्माच्या उकीरड्यावर भाजपची डुक्करं नंगानाच करत होती. तेव्हा समतेची मशाल हाती घेऊन राहूल भारत जोडत होता (१) Image गॅस सिलिंडर, डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल, खतांच्या किमती, जीएसटी रूपी लागलेला घोडा यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. त्याची हातातोंडाशी गाठ पडेपर्यंत नाकी नऊ येत आहे (२)
May 12, 2023 8 tweets 2 min read
बहुचर्चित केरळा स्टोरी चित्रपट पाहिला. असा बकवास शनिमा गेल्या अडीच हजार वर्षांत झाला नव्हता असे मत आमचे झाले आहे.
हिंदू मूसलमान पेटलेली भांडणं पेटवणे हा उद्देश जरी असला, तरी ते पण नीट जमलं नाही. आजकालच्या मुस्लिमेत्तर पोरी यडपाट आहेत असे दिग्दर्शकाला वाटते (१) Propoganda फिल्म करायची तर काय तर लॉजिक हवं. लॉजिक काय? तर मूसलमान लोक इतरधर्मीय पोरी पळवून नेतात आणि त्यांना सेक्स स्लेव म्हणून आयसिस सारखी संघटना वापरते. खरंतर असला ष्ट्राँग विषय असताना त्याचा पार चगळा चोथा करून ठेवलाय. (२)
Apr 28, 2023 15 tweets 2 min read
कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला विरोध का ?
आधी नाणार येथे होत असलेला प्रकल्प आता दूसरीकडे स्थलांतरित करण्यात आला आहे. त्याठिकाणी सर्वेक्षण सूरू झाल्यावर गावकरी आणि स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला आहे. कुणाच्याही जमीनी जाणार म्हणजे विरोध हा असणार हे साहजिक आहे, मात्र... (१) या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे तो जमिनीच्या बदल्यात जो मोबदला देणार आहेत त्याच्यावरून नाही. तर त्याची कारणं वेगळी आहेत. ती कारणं पाहिली तर आपणही एक नागरिक म्हणून या प्रकल्पाला विरोध करायला हवा असं मला वाटतं. (२)
Apr 25, 2023 9 tweets 2 min read
आज छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीचा निकाल आला आणि तिथं महाडिक गटाला एकहाती सत्ता मिळाली. हि निवडणूक एका कारखान्याच्या सभासदांपूरती जरी मर्यादित असली तरीही बंटी पाटील यांनी प्रचारात स्वतः उतरल्यामुळे हि निवडणूक राज्यभर चर्चेत होती. 'कंडका पाडायचा ' हे स्लोगन चर्चेत होते (१) Image बंटी पाटील हे कल्पक प्रचारयंत्रणा नेहमी राबवत असतात. @ruturajdyp यांच्या निवडणूक कार्यक्रमात असेल, गोकुळ संस्थेच्या निवडणुकीत चांगली प्रचारयंत्रणा राबविली होती. (२)
Mar 19, 2023 11 tweets 2 min read
जैनांनी जगाला अनेकांतवाद, नयवाद, स्यादवाद दिला. गेले काही दिवस शिरपूर येथे दिगंबर आणि श्वेतांबर पंथीय यांच्यात जोरदार वाद सुरू होता आज त्याचं पर्यावसान हाणामारीत झालं. जगाला अहिंसा शिकविणाऱ्या धर्मियांची हि अवस्था झाली आहे. जैन धर्म प्राचीन असल्याने साहजिकच भारतभर पसरला होता (१) त्यामुळे बऱ्याच ठिकाणी उत्खननात जैन मंदिरं सापडतात, मग याचा ताबा कोणी घ्यायचा? मूळ जैन धर्म हा भद्रबाहू आणि चंद्रगुप्त मौर्यांसोबत श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे आला जे लोक भद्रबाहूंसोबत आले नाहीत ते श्वेतांबर. त्यांनी मूळ जैन धर्माचा ढाचा बदलून टाकून हवे ते बदल केले (२)
Mar 4, 2023 8 tweets 3 min read
उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis हा नेता जरी विरोधी विचारांचा असला तरी एकूण राजकीय कौशल्यानी ते महाराष्ट्रात पुढे आहेत. राजकारण त्यांना चांगलं जमतं. सामदामदंडभेद ते वापरतात. आणि वापरावीत सुद्धा. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या कर्तृत्ववान नेत्याला डावललं जात आहे असं दिसतं (१) परवा झालेल्या कसबा निवडणूकीत भाजपचे पराभूत झालेले उमेदवार रासणे यांचं तिकीट मंत्री @ChDadaPatil यांनी दिल्लीतून जाऊन आणलं मात्र तिथं @Dev_Fadnavis यांच्या मनात दूसराच उमेदवार होता म्हणे मात्र चंद्रकांत दादांपुढे फडणवीस यांचे काही चालत नाही. त्यामुळे रासणेंना तिकिट मिळालं (२)
Mar 2, 2023 7 tweets 1 min read
भाजपचा पराभव का आनंददायी आहे?

गिरीश बापट या नेत्याने भाजपसाठी खूप काही दिलं.
मात्र त्यांची प्रकृती गंभीर असूनही भाजपने त्यांना प्रचारासाठी ओढत आणलं अॉक्सिजनसह.
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोघांनाही अत्यवस्थ असतानाही राज्यसभा निवडणुकीसाठी नेलं होतं (१) Image भाजप हा विकृत आणि किळसवाणा सत्तापिसाट पक्ष आहे. त्यांना कोणाच्याही प्रकृतीपेक्षा सत्ता महत्वाची वाटते‌. गोव्यातही मनोहर पर्रीकर यांना अशाच अवस्थेत फिरवलं होतं. हे झालं अत्यवस्थ रुग्णांच्या बाबतीत (३)
Feb 24, 2023 8 tweets 1 min read
गोमातेबद्दलची बोगस आस्था !
कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठात पंचमहाभूत महामंगल सोहळा चालू आहे, त्या कणेरी मठाचा सेंद्रीय शेती आणि गोमाता याबद्दल फार गवगवा होता. अशा ठिकाणी या कार्यक्रमादरम्यान ५२ गायी मृत्युमुखी पडल्या आहेत. अशी बातमी आहे. (१) या काडसिद्धेवर महाराजांनी कोल्हापूर जिल्हा भर गोमातेचे महत्व वगैरे सांगण्यासाठी गो परिक्रमा यात्रा वगैरे काढली होती. आज त्यांच्याच मठात एक नाही दोन नाही तर पन्नास गायी मरून पडल्या आहेत. (२)
Feb 23, 2023 5 tweets 1 min read
सुप्रिम कोर्टातील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांचे युक्तिवाद पाहता कदाचित निवडणूक आयोगाने दिलेला चिन्ह आणि पक्ष यासंदर्भातील निकालाची रिव्हीजन होईल असे वाटते. कारण शिंदे गट त्यावेळी ना दूसऱ्या पक्षात विलीन झाला. ना त्यांच्याकडे स्वतंत्र पक्ष होता. (१) त्यात तत्कालीन राज्यपाल यांनी भाजप आणि शिंदे यांना पूरक अशी भूमिका घेतली. चिन्ह आणि पक्ष याचा निर्णय तेव्हा झाला नव्हता, मग राज्यपालांनी तेव्हा पक्ष म्हणून कसं निमंत्रण दिलं ? तत्कालीन सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा जरी राजीनामा दिला (२)
Feb 22, 2023 7 tweets 2 min read
ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल खिंड लढवत आहेत. देशातील कोणत्याही स्वायत्त संस्था, न्यायालय यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. सर्वसामान्य जनतेतही न्यायालयांबद्द्ल फारसं चांगलं मत नाही. अशात आज कपिल सिब्बल यांनी दाखल केलेली याचिका न फेटाळता ऐकून घेतली गेली. (१) ECI च्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना धक्का बसला होता, मात्र पुढच्या तारखेपर्यंत शिवसेनेचा व्हीप ठाकरेंच्या आमदारांवर लागू होणार नाही. असं सुप्रिम कोर्टाने सांगितलं. हि याचिका सुप्रीम कोर्ट ऐकणार आहे आणि यात ECI ला पण पार्टी केलंय. (२)
Feb 19, 2023 10 tweets 2 min read
शहासाहब हे कोल्हापूर हाय!

आज कोल्हापूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री @AmitShah आलते. तिथे त्यांनी गंडीव-फशीव असं किळसवाणं भाषण केलं, काही नवं मटरेल त्यांच्याकडं नव्हतं. भक्तांच्या WhatsApp university मध्ये जेवढं सापडतं तितकेच बोलले. १ हे स्वतः गेली काही वर्षे गृहमंत्री आहेत, यांचं भाषण काय? तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केलाय. गेल्या आठ वर्षांत काय घंटा सिद्ध केलं का? किती लोकांना चक्की पिसायला लावली आणि किती लोकांना फासावर लटकवला? स्वतः महत्वाचे पद भूषवत असून अजूनही रडगाणं गातात, कारवाई का नाही? २