Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Profile picture
Official handle of Thane Municipal Corporation | Be Smart Citizens of Smart City | For Civic Emergencies in Thane City: 1800 - 222 - 108
Cave Man Profile picture 1 subscribed
Mar 22, 2023 7 tweets 1 min read
*शुक्रवारी ठाण्यातील काही भागातील पाणीपुरवठा बंद* (१/७) ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. (२/७)
Mar 21, 2023 11 tweets 2 min read
कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला काटकसरीचा ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प

प्रशासक तथा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मांडला अर्थसंकल्प (१/११) · मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान

· मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना

· अमृत योजना 2 पाणीपुरवठा व्यवस्था

· क्लस्टर योजना

· पार्किंग प्लाझा येथे मल्टिस्पेशॅलिटी हॉस्प‍िटल

· महापालिका सुरू करणार सीबीएससी शाळा (२/११)
Mar 20, 2023 7 tweets 2 min read
ठामपाच्या सहकार्याने तुरुंगातील महिला कैदी व महिला पोलीसांची कॅन्सर तपासणी (१/७) ImageImageImage जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांसाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. (२/७)
Mar 20, 2023 17 tweets 3 min read
सुरक्षारक्षकांनी रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्यापूर्ण संवाद साधावा

आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार सुरक्षा रक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन (१/१७) ImageImage रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या हाती जसे रुग्णालयाची सुरक्षा अवलंबून असते, त्याचबरोबर अनेकदा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनी काही माहिती विचारल्यास किंवा एखाद्या तपासणीबाबत चौकशी केल्यास ते सांगण्यासही कर्तव्यावरील सुरक्षारक्षक मदत करतात. (२/१७)
Mar 13, 2023 6 tweets 1 min read
बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही (१/६) ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेमधील 2000 मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी लोढा धाम येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग एन-एच 3 च्या बाजूस बुधवार दिनांक 15/03/2023 रोजी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. (२/६)
Mar 13, 2023 19 tweets 3 min read
सावित्रीबाईंचे विचार लक्षात घेवून आजच्या स्त्रियांनी विवेकवादाच्या आधारावर
वाटचाल केल्यास त्यांना निश्चितच बळ मिळेल : प्रा. हरी नरके (१/१९) सावित्रीबाई फुले यांचे विचार आज जसेच्या तसे लागू होतील असे नाही, काळ बदललेला आहे, आव्हाने बदललेली आहेत, प्रश्न बदललेले आहेत. काळ हा गुंतागुंतीचा आहे त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे आपली आपल्यालाच शोधावी लागतील. (२/१९)
Mar 10, 2023 14 tweets 2 min read
कळवा नवीन पुलावरील साकेतकडील पाचवी मार्गिकाही
वाहतुकीसाठी खुली : आयुक्त अभिजीत बांगर (१/१४) महापालिका कार्यक्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व वाहतूक कोंडी मुक्त करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. कळवा खाडीवरील जुन्या पुलावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेवून नवीन पुलाची उभारणी महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. (२/१४)
Mar 7, 2023 25 tweets 3 min read
*उन्हाळ्यातील पाणी वितरणाचा कृती आराखडा तत्काळ तयार करा*

*पाणी पुरवठ्याबद्दलची तक्रार विनाविलंब दूर झाली पाहिजे*

*महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आदेश* (१/२५) *पाणी पुरवठ्याचा थेट संबंध कुटुंबाचे स्वास्थ्य, महिलांचे स्वास्थ्य याच्याशी आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याबद्दल कोणतीही तक्रार आली तर ती विनाविलंब दूर झाली पाहिजे. तेवढी संवेदनशीलता अभियंत्यांनी दाखवावी. (२/२५)
Mar 6, 2023 25 tweets 4 min read
नवीन कोपरी पुलाखाली सुरू असलेल्या नाल्याच्या कामाचीआयुक्त अभिजीत बांगर यांनी केली पाहणी

नाल्याचे काम विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश (१/२५) ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील नवीन कोपरी पुलाखालून वागळे इस्टेटला जोडणारा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच केली. (२/२५)
Feb 20, 2023 15 tweets 2 min read
*ठाण्यात चार दिवस पाणी पुरवठा झोनिंग पद्धतीने*
*पाणी जपून वापरण्याचे आवाहन* (१/१५) * ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करणाऱ्या एका मुख्य अशुद्ध जलवाहिनीची वेगवेगळ्या सहा ठिकाणी गळती काढण्याचे काम २१ ते २४ फेब्रुवारी या काळात होणार आहे. या काळात शहराला स्वत:च्या योजनेतून ५० टक्केच पाणी पुरवठा केला जाणार आहे. (२/१५)
Feb 20, 2023 18 tweets 2 min read
निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले

महापालिका आयुक्तांचे आदेश;
पालिका अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
स्थानिक नागरिकांनी केला कामाच्या दर्जाचा पाठपुरावा (१/१८) कोपरी येथील सर्वाधिक वर्दळीच्या अष्टविनायक चौकात मूळ रस्ता आणि त्याची केलेली दुरूस्ती ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची केल्याबद्दल कंत्राटदाराला ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. (२/१८)
Feb 19, 2023 13 tweets 2 min read
*महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि ठामपा विद्यार्थी यांच्यात रंगला प्रश्नोत्तराचा तास* (१/१३) तुम्ही इंटरनेट वापरता का?... हो, मग इंटरनेटवर काय पहाता? गुगल, यूट्यूब.. यूट्यूबर काय पाहता?.. शास्त्रज्ञांची माहिती वाचतो…, कोणते शास्त्रज्ञ? न्यूटन, आईनस्टाईन, गॅलेलिओ या शास्त्रज्ञांची माहिती वाचली. (२/१३)
Feb 19, 2023 16 tweets 3 min read
*‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताच्या सादरीकरणाने*
*ठाणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी* (१/१६) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पोवाडा.. नृत्य आणि ‘गीत जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताच्या सादरीकरणाने महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात साजरी करण्यात आली. (२/१६)
Feb 18, 2023 11 tweets 2 min read
*हिंद अयान ही बहुस्तरीय सायकलिंग शर्यत ठाण्यातून मुंबईला रवाना*

उपायुक्त मिनल पालांडे यांनी दाखविला स्पर्धेस झेंडा (१/११) ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत ठाण्यात दाखल झालेली ‘ हिंद अयान’ ही वार्षिक बहुस्तरीय सायकल स्पर्धा आज ठाणे महापालिका भवन येथून मुंबईकडे रवाना झाली. यावेळी उपायुक्त मिनल पालांडे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देवून स्पर्धेस झेंडा दाखविला. (२/११)
Feb 6, 2023 30 tweets 4 min read
स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास सयाजी गायकवाडांशिवाय पूर्ण होणार नाही : प्रा. बाबा भांड. (१/३०) महाराजा सयाजीराव हे प्रज्ञावंत राजे होते, त्यांनी समाजसुधारणा, दुष्काळ निवारण, शिक्षण इ. क्षेत्रामध्ये कालातीत कायदे केले. त्यांनी अनेक महापुरूषांना, स्वातंत्र्यसेनानींना मदत केली. (२/३०)
Feb 6, 2023 17 tweets 2 min read
समूह विकास (क्लस्टर)योजनेसंदर्भात महापालिकेची कार्यप्रणाली निश्चित : आयुक्त अभिजीत बांगर (१/१७) महापालिका क्षेत्रातील मुलभूत सेवासुविधांचा अभाव असलेल्या भागांचा तसेच धोकादायक व जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. समूह विकास योजना (क्लस्टर) ही झोपडपट्टी व दाटीवाटीचे क्षेत्र यांच्या पुनर्विकासासाठी महत्वाकांक्षी योजना आहे. (२/१७)
Feb 6, 2023 23 tweets 3 min read
ठाणे रेल्वेस्थानकाबाहेरील रिक्षांचे परिचलन शिस्तबद्ध पध्दतीने होणार : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे महापालिका आणि पोलीस संयुक्त कारवाई करणार (१/२३) ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर पश्चिमेकडे बेकायदेशीर आणि बेशिस्त रिक्षा व त्यातून प्रवाशांची होणारी गैरसोय या विरोधात आता ठाणे महापालिका आणि पोलीस संयुक्तपणे धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात येणार आहे. (२/२३)
Jan 26, 2023 4 tweets 1 min read
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील उन्नतीकरण व मजबुती करनाची कामे हाती घेतलेली आहेत. (१/४) यामुळे शुक्रवार दी. २७/०१/२०२३ रोजी एम् आयडीसीच्या जांभूळ जल शुद्धी केंद्रातून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार दि. २७/०१/२०२३ (गुरुवार रात्री १२.०० पासून शुक्रवार रात्री १२.०० पर्यंत), खालील प्रमाणे २४ तासाकरिता बंद राहील. (२/४)
Jan 26, 2023 11 tweets 2 min read
*ठाणे महापालिकेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा*

*सफाई कर्मचारी 'गुणवंत कामगार' पुरस्काराने सन्मानित* (१/११) भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन ठाणे महानगरपलिकेच्यावतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला, या निमित्ताने राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. (२/११)
Nov 18, 2022 19 tweets 2 min read
गोवरशी लढण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज

लसी आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध

लसीकरण वाढवण्याच्या सूचना

शिळ आणि कौसा येथे सापडले बाधित रुग्ण, या भागात २४ तास, सातही दिवस सतत सर्वेक्षण

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि पार्किंग प्लाझा येथे विलगिकरण कक्ष सुरू. (१/१९) शिळ आणि कौसा या नागरी आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत गोवर या आजाराचे बाधित सापडले आहेत. त्यामुळे, या दोन्ही आरोग्य केंद्रांच्या हद्दीत २४ तास आणि सातही दिवस घरोघरी जाऊन व्यापक सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.(२/१९)
Nov 17, 2022 11 tweets 2 min read
मतदार यादीत नाव नोंदणीकरिता महापालिकेच्यावतीने
8 डिसेंबर 2022 पर्यत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

नागरिकांनी या उपक्रमातंर्गत आपली मतदार नोंदणी करुन घ्यावी : महापालिकेचे आवाहन (१/११) ठाणे महानगरपालिकेच्यावतीने मतदार नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2023 राबविण्यात येत आहे. 8 डिसेंबर 2022 पर्यत सदर कार्यक्रम सुरू राहणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.(२/११)