या कठीण काळात आपल्या सर्वांसाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन कर्तव्य बजवणाऱ्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना आपण ओळखलं पाहिजे,
डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,पोलीस आहेतच,
पण अजून खूप लोकं आहेत हो ज्यांना रोज तुमच्या माझ्या साठी कामावर जावं लागतंय, त्यांचं योगदान विसरू नका. #wecareforyou
टेलिकॉम मध्ये काम करणाऱ्या मुंबईच्या मित्राला फोन केला, बोलण्यातून काळजी जाणवत होती, म्हणाला कामावर जावंच लागतंय आम्हाला, अत्यावश्यक आहे म्हणतात पण आमच्या बद्दल ना कोणी बोलतंय ना कोणी विचारतंय, हे बंद केलं तर इंटरनेट बंद होईल. हे ऐकुन खरंच खूप वाईट वाटलं. #wecareforyou