एका छोट्या गावातून दहावी पास करून मी सांगली ला 11वी ला ऍडमिशन घेतलं. नवीन लोक , नवीन वातावरण , जमवून घेणं अवघड जायचं .
पहिल्यांदाच घरापासून बाहेर राहिल्यामुळं नोकिया चा बटनाचा मोबाईल भेटला होता .घरी संपर्क करण्यासाठी कमी आणि मन रमवण्यासाठी त्याचा खरा उपयोग !
👇
त्या मोबाईल मध्ये 'मरणादारी' नावाची एक ऑडिओ कथा होती . गावठी भाषा , गावातली सगळी व्यक्तिचित्रण , कथाकाराची आवाजफेक यामुळं ती कथा खूप आवडायची. वाचनाची आवड आधी पासूनच होती पण कथा ऐकायला मजा यायची. पण बऱ्याचदा तेच तेच ऐकून कंटाळलो आणि मी इतर कोणत्या कथा सापडतात का हे बघू लागलो .
👇