आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने|
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू |
शब्दे वाटू धन जनलोका|
तुका म्हणे पाहा शब्दची हा देव|
शब्देची गौरव पूजा करू|’
Aug 6, 2021 • 12 tweets • 2 min read
सेव्हिंग खात्यावरचे पैसे दामदुप्पट झाले आणि मनमोहनसिंग यांना टेन्शन आलं...
जर काही न करता तुमच्या अकाऊंटमधले पैसे डबल झाले तर? मग काय लॉटरीच की! आपण नवीन गाडी, नवीन मोबाईल, दोस्तांना पार्टी, गर्लफ्रेंडला गिफ्ट, आईला नवीन साडी काय आणि काय काय. लई प्लॅन असतात.
अहो साधं पँटेच्या खिशात एखादी 100 ची नोट गावली तर खुश होणारे आपण.
अशीच लॉटरी आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना लागली होती.
गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. आपल्या अनेक राजकीय विरोधकांना मागे टाकून नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान बनले होते.