शेतकरी शेतीमध्ये एका दाण्याचे हजार दाणे पिकवतो
किलोभर बियाणे पेरले तर टनभर धान्य पिकवतो
तरीही त्याला शेती परवडत नाही ?
याचंच नवल वाटतं ना तुम्हाला, आम्हालाही तेच नवल वाटत हंगाम संपल्यानंतर जेव्हा वर्षभराच्या
कमाईचा खर्च आणि उत्पन्नाचा हिशोब जुळत नाही तेव्हा
कारण उत्पादन किती येणार हे निश्चित नसतं पण आशा असते चांगले उच्चांकी यावे व सर्व देणंघेणं फिटाव यासाठीच तो जीवाचे रान करून कष्टत असतो लढत असतो
बरं त्याची लढाई एकाच गोष्टीशी नसते हो
Oct 31, 2019 • 13 tweets • 3 min read
आपल्या देशात कायद्यांची अंमलबजावणी हि फक्त शेतकरी विरोधी असतील तेव्हाच कठोरपणे केली जाते पण तेच कायदे जर शेतकरी हिताचे असतील तर सोयिस्करपणे दुर्लक्षित केले जातात
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सुचनेनुसार ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांवर आपत्तीजनक परिस्थिती ओढावते म्हणजे दुष्काळ, १/
अतिवृष्टी, किडरोग, हवामानातील बदलांमुळे होणारे नुकसान पिक उत्पादनात येणारी घट, ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी यामुळे शेतकऱ्यांची कर्जफेडीची ऐपत नसते त्या त्या वेळी बॅंकांनी पिककर्ज व इतर शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावायचा नाही तसेच नियमित कर्ज पुनर्गठित करुन २/