Vishvajit Profile picture
🚩 ‘जननी-जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ 🚩
17 Jul
🌞

गायत्रीदेवीचे आध्यात्मिक महत्त्व !

ॐ भूर्भुवः स्वः तत् सवितुः वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो नः प्रचोदयात् ।

जो सूर्य आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो, त्याच्या सर्वश्रेष्ठ तेजाची आम्ही उपासना करतो. 🙏

#म #FridayFeeling 🔅🌷
🌞
गायत्रीदेवी ही सरस्वती, महालक्ष्मी आणि पार्वती या तिन्ही देवींचे एकत्रित रूप आहे.
ती आदिशक्तीस्वरूप आहे.
अथर्ववेदात गायत्रीला ‘वेदमाता’ म्हटले आहे. गायत्री देवीची उत्पत्ती सरस्वतीपासून झालेली असल्यामुळे काही ठिकाणी तिचा उल्लेख ‘सावित्री’ असाही केला जातो.

2/4
🌞
‘गायन्तं त्रायते ।’, म्हणजे गायन केल्याने (मंत्र म्हटल्याने) रक्षण करते ती आणि ‘गायंतं त्रायंतं इति ।’ म्हणजे सतत गात गेल्यामुळे जी शरिराला गायला लावते (शरीरात मंत्राची सूक्ष्म स्पंदने निर्माण करते.) आणि जी तारण्याची शक्ती उत्पन्न करते (रक्षण करते), ती गायत्री होय.’

3/4
Read 4 tweets
14 Jul


बाली येथील जागृत ज्वालामुखी असलेला अगुंग पर्वत आणि समुद्रमंथनात दोरीचे कार्य केलेल्या वासुकी नागाचे बेसाखी मंदिर.

दक्षिण पूर्व आशियातील १७ सहस्र द्वीपांचा देश म्हणजे इंडोनेशिया.येथे हिंदूंची संख्या १.७% एवढीच आहे.त्यातील सर्वाधिक हिंदू बाली द्वीपावर रहातात.

#TuesdayThoughts
ज्याला पुराणांमध्ये ‘वाली’ द्वीप म्हटले आहे, तेच आताचे बाली द्वीप आहे. बाली येथील ८३.५ टक्के लोक हिंदू आहेत
वाल्मीकि रामायणात सीतामातेच्या शोधात सुग्रीवाने वानरसेनेला ‘यावाद्वीप' आणि ‘वालीद्वीप’ येथे पाठवल्याचे उल्लेख आहेत.
बाली येथील हिंदूंसाठी अगुंग पर्वत एक पवित्र स्थान आहे.
सत्ययुगात समुद्रमंथनाच्या वेळी रवीचे कार्य केलेला सुमेरू पर्वत जावा द्वीपावर आहे. अगुंग पर्वताकडे पाहिल्यावर असे वाटते की, जणू काही तो समुद्रमंथनात दोर बनलेल्या वासुकी नागाचे तोंडच आहे. या पर्वताची रचना नागाचे तोंड उघडल्यासारखी आहे.
Read 5 tweets
10 Jul


"समुद्रातील शिवाजी"
नौसेनाधिपति कान्होजी आंग्रे !

स्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेणारा,परकीय शत्रूंची दाणादाण करून त्यांची झोप उडविणारा #मराठी सरदार, दर्याबहाद्दर कान्होजी आंग्रे यांचा स्मृतिदिन 🌷विनम्र अभिवादन 🌷🌿

#KanhojiAngre
@The_Lion_RS @SG_HJS
@KaduAmol @malhar_pandey
पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे गावी १६६९ मध्ये कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्म झाला. कालोसे गावातील आंगरवाडी ह्या छोट्या भागावरून त्यांचे आंग्रे हे आडनाव रूढ झाले.
कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा याची परंपरा कान्होजीला पूर्वजांकडून लाभलेली होती.
कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती. समुद्रात मुक्त संचार करणार्या परकीयांवर निर्बंध आले होते.१६९८पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवान्याशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते
Read 8 tweets
4 May
🔅
#Thread

“महाराजा छत्रसाल बुंदेला”
४ मे १६४९

शिवछत्रपतींच्या प्रेरणेनं उत्तरेत स्वतंत्र राज्य स्थापन करणाऱ्या छत्रसाल बुंदेला यांचा आज जन्मदिन!

शिवाजी पीछे हुवा बुंदेला बलवान,
प्राणनाथ का शिष्य यह छत्रसाल महान ।।

शिवछत्रपतींची प्रेरणा आजही बुंदेलखंडी जनता विसरली नाही.

१/६
आज ही छत्रसाल यांच्या समाधीवरचं कवन या गुरुशिष्यांची यशोगाथा दृग्गोचर करत आहे.
मोगलांना कडवी झुंज देणारा मध्यभारतातील एक झुंजार योद्धा एकेकाळी जेव्हा छत्रसाल मोगलांच्या हैवानी अक्रमणाने त्रस्त होऊन छत्रपती शिवरायांच्या आसऱ्याला आले होते,
२/६
तेव्हा शिवरायांनी त्यांना शरण देऊन त्यांच्यात मोगलांशी लढा देण्याची प्रेरणा निर्माण केली व स्वतंत्र बुंदेलाराज्य प्रस्थापित करण्याची उर्मी जागृत केली तसेच राजकारणाचे पाठही दिले.पुढे जाऊन ह्याच छत्रसाल बुंदेलांनी शिवरायांनी अखून दिलेल्या मार्गाने मोगलांना पळता भुई थोडी केली.

३/६
Read 7 tweets