Vishal Jayashri Vishwas Waghmare Profile picture
अत्त दीप भव...
Aug 23, 2022 32 tweets 13 min read
भीमाची वाघीण बनुबाई येलवे गेली.
शेवटी #दवाखान्यातच आणि आता
#स्मशानातच निवारा मिळाला.
वाघिणीला शेवटचा जय भीम... 🙏

काही वर्षांपूर्वी #शालिनी_पाटील हे नाव अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलं, आपल्या बिनबुडाच्या आणि जातीयवादाला चिथावणी देण्याऱ्या वक्तव्यामुळे असंख्य लोकांनी त्यांच्यावर टिकेचा भडीमार केला होता.
'राज्यघटना केवळ #आंबेडकरांनी लिहिलेली नाही,ते फक्त मसुदा समितीचे मुख्य सदस्य होते. गांधी आणि नेहरू हेच स्वातंत्र्यासाठी लढत होते. ज्या वेळी हे शिक्षा भोगत होते, त्यावेळी डॉ. आंबेडकर ब्रिटीश सरकारमध्ये मंत्री होते. भारताची #गोपनीय माहिती ते ब्रिटिश सरकारला
Aug 21, 2022 9 tweets 5 min read
|| डॉ. दाभोळकरांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना घातला होता घेराव ||
यशवंतरावजी चव्हाण साहेब परराष्ट्रमंत्री असतानांचा एक प्रसंग, #साताऱ्यातील एका महिलेवर अत्याचार करून तिच्या पतीची हत्या करण्यात आली होती. या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ दाभोळकर, किशोर बेडकिहाळ, चंद्रकांत शेडगे, विजय मांडके, पार्थ पोळके, उपराकार लक्ष्मण माने असे पंधरा-वीस जणांचे शिष्टमंडळ यशवंतरावजी चव्हाण साहेबांना भेटण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर गेले. त्या दुर्दैवी घटनेचा सारा वृत्तांत सांगून आरोपीला तात्काळ अटक करण्याची आग्रही मागणी या शिष्टमंडळाने केली आणि यामधून काही मार्ग
Nov 27, 2021 5 tweets 5 min read
#फर्स्ट_क्लास मिळवूनही
ज्याला #सातबारा आणि #8अ मधला फरक कळत नाही,
ज्याला बँकेच्या डिपोझिट आणि विड्रॉल स्लीपमधला फरक कळत नाही,
ज्याला लाईट बिलातील देयक रक्कम शोधताना प्रचंड गडबडायला होतं,
ज्याला लिफाफ्यावर टू आणि फ्रॉम खाली नक्की कुणाचं नाव टाकावं हे बिलकुल कळत नाही, जे आजही कंम्प्युटर बंद करताना खाली वर दाबायचे बटनच वापरतात,
जे आजही रिचार्ज मारणे याला ब्यालन्स टाकणे म्हणतात,
ज्यांना बँक पासबुकावर #व्याजाचा आकडाच सापडत नाही,
ज्यांना टू व्हिलरच्या पेट्रोल टाकीच्या ऑन ऑफ आणि #रिजर्व्हची भानगड कळत नाही,
असे उच्चशिक्षित एकीकडे-

आणि त्या तुलनेत-