No bio. Because there’s no logic. Hence not biological. RTs/likes not necessarily endorsements.
Feb 17 • 6 tweets • 1 min read
कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीतील बळींचे नेमके आकडे का कळत नाहीत? किमान दोन ठिकाणी घटना घडूनही प्रशासन आधी लपवाछपवी का करतं? दिल्लीतल्या चेंगराचेंगरीबद्दलही असं का होतं? कोविडमधल्या मृत्यूबाबतही असं का झालं?
हा पॅटर्न आहे.
राष्ट्र जेव्हा एकक बनतं तेव्हा व्यक्तीची किंमत शून्य बनते.
म्हणजे काय? तर एकदा फाइव ट्रिल्यन इकनॅामीची स्वप्नं दाखवल्यावर पर कॅपिटा इन्कम (दरडोई उत्पन्न) कोणी बघत नाही. मग तुमचं, माझं उत्पन्न किती वाढलं, घसरलं याची चर्चा होत नाही. एकदा चकचकीत वंदे भारत सुरू झाली की रोज लोकल ट्रेनमधून किती लोक पडून मरतात यावर बोललं जात नाही. खरी गरज गरीब
Oct 6, 2024 • 4 tweets • 1 min read
गेले दोन तीन दिवस सोशल मीडियावर नितीन गडकरींना इतकं टोल, I mean troll, केलं गेलंय की त्यांच्या आयुष्यात कधी केलं गेलं नसेल. याला कारण खुद्द गडकरीच आहेत. चांगले रस्ते हवेत तर टोल द्यावाच लागेल असं ते ठासून सांगत असतात आणि वेळोवेळी इतके हजार किमी रस्ते बांधले, हा एक्सप्रेसवे बनवला
वगैरे सुबक, ड्रोनद्वारे बनवलेले व्हिडिओ शेअर करत असतात. प्रत्यक्षात या रस्त्यांचा दर्जा इतका खराब असतो की एक टर्म सोडा, एक वर्षभर ते धड राहत नाहीत. मोठमोठाले खड्डे, असमतल पृष्ठभाग असे सगळे दोष एका पावसातच उघडे पडतात. मग अशा रस्त्यांसाठी टोल का द्यायचा असं साहजिकच लोकांना वाटतं.
Aug 25, 2024 • 6 tweets • 1 min read
पूर्वी मतदानाच्या आदल्या रात्री झोपडपट्टीतील पुरुष मतदारांना दारू पुरवली जायची. रबराच्या फुग्यातून यायची आणि रसदान केलं जायचं. मग गावठीची चपटी दिली जाऊ लागली. मग थोडीबहुत रोख रक्कम. पण हे सगळं व्हायचं रात्रीच्या अंधारात. चोरुन. मध्यमवर्ग नाक मुरडायचा. झोपडीवाले मत विकतात म्हणून
आम्हाला असे नेते सहन करावे लागतात वगैरे बोलायचा. मग जग थोडं पुढे गेलं. शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हजार रुपये मतामागे द्यायला लागले. मुंबई, पुण्यातल्या सोसायट्या नगरसेवक, आमदारांकडून डस्टबिन, बास्केटबॉल हुप्स, टाइल्स लावलेलं प्रेमिसेस मागायला लागल्या. नगरसेवक, आमदार तरी
Jul 23, 2024 • 7 tweets • 1 min read
चला एक गोष्ट सांगतो. गोष्ट तशी जुनाच. तुम्हाला माहीतही असेल. तरीही…
…तर…आटपाट नगर असतं. राजा असतो. प्रजा असते. प्रजा जनरली राजाच्या प्रेमात असते. राजा एकदम प्रजेसाठी कायपण वगैरे भाषणं देऊन त्यांना खूष ठेवत असतो. व्यापारी पण खूष असतात कारण प्रजेला माहीत नसतं पण राजा तसा
व्यापारी लोकांबरोबर पण चांगले संबंध राखून असतो. त्यांच्या मुलाबाळांच्या लग्नात आहेर वगैरे सगळं व्यवस्थित असं असतं. एक दिवशी काय होतं व्यापारी लोकांना वाटतं पिठाचे भाव खूपच स्वस्त आहेत. आपला फायदा होत नाहीय. व्यापारी कैफियत घेऊन राजाकडे जातात. राजा ऐकून घेतो. त्यांना पाच रुपये
Jun 25, 2024 • 4 tweets • 1 min read
वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करताना चार बँकांमध्ये खाती उघडली. आज चारही बँकांमध्ये सेविंग खात्याचं इंटरेस्ट सर्टिफिकेट आणायला गेलो तर चार वेगवेगळे अनुभव. सर्वात बेस्ट- आयसीआयसीआय. अकाऊंट नंबर सांगितला. दोन मिनिटांत सर्टिफिकेट प्रिंट करुन हातात. एचडीएफसी- तुम्हाला ईमेल करतो. थोडी
विनवणी केल्यावर प्रिंटआउट. येस बँक- तुम्ही आम्हाला ईमेल करा, मग आम्ही तुम्हाला ईमेल करतो. आयसीआयसीआयचा अनुभव सांगितल्यावर प्रिंटआउट मिळाला. सगळ्यात विचित्र? अर्थात आपली सरकारी बँक ऑफ इंडिया. आधी तर बँकेत नेटवर्कच नाही. त्यामुळे परत बाहेर जाऊन अकाऊंट नंबर शोधून लायनीत उभा राहिलो.
Jun 9, 2024 • 13 tweets • 3 min read
मी जातपात मानत नाही असं मी मानतो पण मला स्वतःला माझ्या जातीचा बायस पूर्णपणे काढलेलं जमलेलं नाही. इतरांकडे बोट गाखवण्याआधी मी स्वतःपासून सुरूवात करतो. चारेक दिवसांपूर्वी मी मला आवडलेले निकाल पोस्ट केले घाईत. पण नंतर लोकांनी त्यांचे निकाल सांगितले तेव्हा माझा बायस किती तीव्र आहे हे
मला जाणवलं. अगदी डोळ्यांसमोर वर्षाताई गायकवाड विजयी झाल्या होत्या. सीट बदललेली होती. मुंबईसारख्या शहरात जिथे फॅाल्स हीरो वर्शिपिंग चालते तिथे उज्ज्वल निकमांसारखा तगडा उमेदवार होता. मुंबई काँग्रेसची संघटना जिथे पॅट्रिआर्की वर्षा गायकवाडांना सतत पाण्यात पाहते. तथाकथित सुशिक्षित
Dec 13, 2023 • 4 tweets • 1 min read
चार बेरोजगार तरुणांनी संसदेची ' अभेद्य ' सुरक्षा भेदून आपला निषेध नोंदवला. बऱ्याच जणांना हा मार्ग पटलेला नाहीय. काहींना तर आपल्या देशाची पत गेलीय असं वाटतं आहे. पण खरोखर देश म्हणजे शेवटी काय? संसद काय? देशाच्या प्रतिनिधींना बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा वाटत नसेल, २४/७ सरकारचं
गुणगान करणाऱ्या मिडियातल्या चारणाना ऐकू जात नसेल, न्यायव्यवस्था सेलेक्टिवपणे react होत असेल तर काय करावं? देशाची पत गेली म्हणजे काय? देश म्हणजे दगड माती नव्हेत, देश म्हणजे देशातले लोक. संसद म्हणजे लोकशाहीचं मंदिर वगैरे ठिक आहे, पण तिथे बसतात ते लोकांचे प्रतिनिधी. लोकांचे. त्यांना
Jul 11, 2023 • 8 tweets • 2 min read
तर राष्ट्रवादीमधून फुटून निघालेल्या अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील अशा दिग्गजांनी अशी भूमिका मांडली आहे की त्यांनी जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा, लोकांची कामं व्हावीत म्हणून सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून फुटून
निघालेल्या बऱ्याच आमदारांची अशीच तक्रार होती की सरकारमध्ये असूनही अजित पवार निधी देत नसल्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील विकासाची कामं अडून राहिली होती. यातले बरेच किमान दोन ते तीन टर्म आमदार राहिलेले आहेत. तरीही त्यांना असं वाटतं की सरकारमध्ये सामील झाल्याखेरीज
Jun 4, 2023 • 6 tweets • 1 min read
मुंबईत अदानी पॉवरने उच्छाद मांडलाय. काळे रात्री दीड वाजता गेलेली वीज आज संध्याकाळी पाच वाजता परत आली होती जनरएटर लावून. त्यासाठी डझनावारी फोन झाले, ऑफिसची चक्कर झाली, मेंटेनन्स टीमच्या नाकदुऱ्या काढून झाल्या. चार पाच बिल्डिंगची अवस्था वाईट आहे. समोर म्हातारा म्हातारी राहतात आणि
म्हातारीला उन्हाळा असह्य होतोय. तिची सून सारखी विचारात होती बघा ना अंकल काही होतंय का. रविवारच्या दिवशी ऑफिसमध्ये कुणी भेटत नाही. मेंटेनन्सच्या टीमने सांगितलं सर तुम्ही पुढे व्हा आम्ही आलोच. मी गाडी काढेपर्यंत टीम गायब. मग थोड्या वेळाने दोन चार तुकड्या वेगवेगळ्या बिल्डिंगला
Jun 3, 2023 • 9 tweets • 2 min read
दीड तास वीज नाहीय. तक्रार नोंदवण्यासाठी @Adani_Elec_Mum ला फोन केलाय तर पाऊण तास वेटींग वर आहे. मी फक्त सहावा कॉलर आहे. पण अजून नंबर आलेला नाही. शेठच्या दोस्ताला सगळं माफ.
दुसरा कॉलर लय तापलेला दिसतोय. १५ मिनिटं हललेला नाहीय.
Apr 25, 2023 • 12 tweets • 2 min read
मुर्दाड विरोधी पक्षावर आणखी लिहायचं नाही असं ठरवलं होतं पण हे लयच सुस्त आहेत. म्हणून हा प्रपंच.
अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि जमलं तर आताच व्हायचं आहे. २०२४ पर्यंत थांबायचीदेखील तयारी नाही. यात चुकीचं काहीच नाही. राजकारणात महत्त्वाकांक्षा असायलाच हवी. पण सोबत बरंच
काही लागतं आणि ते लोकांपर्यंत पोचावं लागतं. गोपीनाथराव मुंडे असेच महत्त्वाकांक्षी विरोधी नेते होते. तत्कालीन सरकारवर तुफान आक्रमण करून त्यांनी आपलं वलय निर्माण केलं. विधानसभेतील त्यांची भाषणं, सबंध राज्यात फिरून राजकारणाचं गुन्हेगारीकरण यावर तापवलेलं वातावरण आठवून पाहा. वेळ आली
Apr 23, 2023 • 5 tweets • 1 min read
नॅार्मल लोकशाहीः
१. सरकारी कार्यक्रमात दुर्घटना होते. डझनावर लोक मरण पावतात.
२. मीडिया सरकारला धारेवर धरतो. दुर्घटनेला जबाबदार कोण याची कारणमीमांसा करतो. कुटुंबांशी बोलून उद्ध्वस्त घरांच्या व्यथा लोकांसमोर आणतो. दोषी अधिकारी, मंत्री, सरकारी यंत्रणांना सतत प्रश्न विचारत राहतो.
३. विरोधी पक्ष मीडियात येत असलेल्या बातम्यांच्या आधारावर सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो. बळी गेलेल्या कुटुंबांशी बोलून धीराचे चार शब्द सांगतो. तुमच्या सर्व लढाईत सोबत असू म्हणून विश्वास देतो.
आपली लोकशाहीः
१. सरकारी कार्यक्रमात दुर्घटना होते. डझनावर लोक मरण पावतात.
Apr 20, 2023 • 5 tweets • 1 min read
छगन भुजबळ विरोधी पक्षनेते होते विधान परिषदेत. बहुतेक पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याच्या भूमिकेवरून तेव्हा सत्तेत असलेल्या शिवसैनिकांनी मुंबईतल्या बी सी सी आय च्या ऑफिसवर हल्ला केला आणि नासधूस केली. त्यात भारतीय संघाने १९८३ साली जिंकलेल्या विश्वचषक ट्रॉफीचाही समावेश होता. घटना
कळल्यावर मीडियाने तिथे धाव घेतली (तेव्हा आधी कळवून असले प्रकार होत नसत). पण पोलीस आतमध्ये जाऊ देत नव्हते. प्रकार गंभीर होता आणि फोटो बाहेर गेले तर मनोहर जोशींना विधानभवनात उत्तरं द्यायला नाकी नऊ आले असते. म्हणून ' वरून आदेश आहेत ' असं पोलीस सांगत होते. शेवटी काही पत्रकारांनी
Apr 18, 2023 • 4 tweets • 1 min read
आज अजित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर बऱ्याच लोकांनी सुधीर सूर्यवंशी, निखिल वागळे, आशिष जाधव यांना शिव्या घातल्या आहेत. पण तिघांनीही पत्रकारिता धर्माचं पालन केलंय. बातमीला बातमी म्हणून ट्रीट करण्यात काहीही चूक नाहीय. परवा संजय राऊत यांनी अजित पवार वेगळा निर्णय घेऊ शकतात हे सूचित
केलं होतं. नंतर अजित पवार अनाकलनीयरीत्या नॅाट रीचेबल होत होते. मग बातम्या सुरू झाल्यावर परत काहीतरी थातुरमातुर उपस्थिती दर्शवत होते. गेल्या दहा पंधरा दिवसात त्यांची वक्तव्यं संशय निर्माण करणारी होती. आशिष जाधवांची ट्विट्स नीट पाहिली तर त्यांनी आपले सोर्सेस कोण आहेत हेदेखील
Mar 19, 2023 • 14 tweets • 3 min read
खूपच गोंधळ असतो. रोहित पवार वानखेडेवर मॅच बघायला जातात. कारण कुठल्या तरी क्रिकेट असोसिएशनवर पदाधिकारी आहेत. आशिष शेलारना मुंबई क्रिकेट असोसिएशनवर आणि रोहित पवार बहुतेक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अशी सेटिंग असते. सांभाळून घेतात एकमेकांना. इथे खाली दोन्हीकडचे कार्यकर्ते तुफान लढत
असतात एकमेकांशी. वर दोघे एकत्र. कारण? महाराष्ट्राची राजकीय संस्कृती. ही संस्कृती एकतर्फी असते बरं...आणि हे फोटो पण स्वतः रोहित पवारच टाकतात. कधी अदानीचे ड्रायव्हरपण बनतात. तो अडचणीत येतो तेव्हा त्याच्या बाजूने खिंडदेखील लढवतात. पवार घराण्याच्या मूळ पुरुषाचे देखील उद्योगपतींशी
Dec 1, 2022 • 19 tweets • 4 min read
मारुतीभौंबरोबर झालेल्या ट्विटर संवादातून उपजलेला हा थ्रेड.
रविशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर बऱ्याच लोकांना स्वतंत्र पत्रकारितेचं युग संपलं आहे आणि आता ज्यांना तशी पत्रकारिता खरंच करायची असेल त्यांनी यूट्यूब, crowdfunding, रिपोर्टर co-operative अशा वेगवेगळ्या मॉडेलवर काम करावं असं
बऱ्याच जणांना वाटतं आहे. आतापर्यंत हे जवळजवळ सगळे प्रयोग झाले आहेत आणि ते फसले आहेत. मी यातल्या बऱ्याच गोष्टी खूप जवळून पाहिल्यात, काहींची झळ बसली, काही गोष्टी पटेनाशा झाल्या तेव्हा लिहिणं बंद केलं आणि आता पत्रकारिता सोडून दिली. माझी हिम्मत नव्हती इतरांनी जे सोसलं ते सोसण्याची.
Sep 10, 2022 • 5 tweets • 1 min read
आपल्यातच एक आशावादी आणि एक निराशावादी दडलेला असतो. आज राहुल गांधी भारत जोडो यात्रा घेऊन निघालेत. याचा काँग्रेसला कितपत राजकीय फायदा होईल याची गणितं सगळे मांडताहेत- काँग्रेसी, विरोधक, इतर पक्ष, खुद्द काँग्रेसमधील राहुल विरोधक. पण या यात्रेचा विचार राजकारणापलीकडे जाऊन करायला हवा.
आज देशातलं वातावरण कमालीचं पोलराइज्ड आहे. अशा परिस्थितीत राहुलने काँग्रेसच्या झेंड्यापेक्षा देशाचा तिरंगा हातात घेणं महत्त्वाचे आहे. तुम्ही त्याला रिडिक्यूल करा, त्याच्या टीशर्टची, सुसज्ज कंटेनरची चर्चा करा, पण तुम्ही त्याच्या हेतूवर शंका उपस्थित करू शकता का?
तुलना करू नये, तरीही
Aug 16, 2022 • 8 tweets • 2 min read
बिल्कीस बानो केसमध्ये काल जे काय झालं त्याचा विचार करून डोकं बधीर होतं. समाज पार रसातळाला गेला आहे याचं हे द्योतक आहे. मुळात गुन्हा अतिशय गंभीर. पाच महिन्याच्या गर्भवती असलेल्या महिलेवर तिचे शेजारी पाजारी बलात्कार करतात. तीन वर्षाच्या मुलीला ठार मारलं जातं. कशीबशी वाचलेली बिल्कीस
तक्रार नोंदवायला जाते तर हेड कॉन्स्टेबल त्रोटक तक्रार घेतो. मग तीस्ता सेटलवाड यांच्या पुढाकाराने तक्रारीचा पाठपुरावा होतो. तपास सीबीआयकडे जातो. गुजरातमध्ये न्याय मिळणार नाही म्हणून पुन्हा सुप्रीम कोर्टात दाद मागावी लागते. खटला मुंबईत वर्ग होतो. इथे ज्या न्यायाधीश सजा सुनावतात
Aug 14, 2022 • 10 tweets • 2 min read
शाळेतला स्वातंत्र्यदिन वेगळाच असायचा. सकाळ आणि दुपार अशी दोन अधिवेशनं असायची. ५ वी ते ७ वी सकाळ आणि ८ वी ते १० वी दुपार. दरवर्षी आलटून पालटून प्रकल्प सादर करायची जबाबदारी असे दोन अधिवेशनातील विद्यार्थ्यावर. ३५-४० वर्षांपूर्वी इंटरनेट नव्हतं. जुलैमध्ये एखादा विषय निवडला जायचा आणि
१५ ऑगस्टला आपल्या वर्गाचा प्रोजेक्ट इतरांपेक्षा चांगला व्हावा म्हणून शिक्षक - विद्यार्थी जबर मेहेनत घ्यायचे. आमचे मुख्याध्यापक प्रभू सर खूप शिस्तीचे होते आणि त्यांचा आदरयुक्त दरारा असायचा. त्यांनी कौतुक केलं तर हात आभाळाला टेकले असं वाटायचं. इंटरनेट नव्हतं. सगळा रिसर्च स्वतः
Jun 29, 2022 • 4 tweets • 1 min read
गोष्ट महाभारतातील आहे. आता वाचली होती की शाळेत ऐकली होती ते आठवत नाही. पण पक्की बसलीय डोक्यात. गुरू द्रोणाचार्य युधिष्ठिर आणि दुर्योधन दोघांना एक exercise देतात. युधिष्ठिराला एक असा माणूस शोधून आणायचा असतो ज्याच्यात अजिबात चांगले गुण नसतील. दुर्योधनाला त्याच्या उलट. म्हणजे असा
माणूस ज्याच्यात अजिबात वाईट गुण नसतील. दोघे संध्याकाळपर्यंत फिर फिर फिरतात आणि रिकाम्या हाताने परत येतात. द्रोणाचार्य विचारतात काय झालं? दुर्योधन सांगतो खूप शोधलं पण असा एकही माणूस सापडला नाही ज्याच्यात अजिबात वाईट गुण नाहीत. प्रत्येकात काही ना काही तरी वाईट होतंच. युधिष्ठिर
Mar 30, 2022 • 16 tweets • 5 min read
गेले काही आठवडे @Aakar__Patel यांच्या #priceofthemodiyears या पुस्तकातून थ्रेड केले. ते सर्व आज एकत्र करून थ्रेड करतोय. ज्यांनी आधी वाचले नसतील त्यांनी वाचा. ज्यांनी वाचले असतील त्यांनी पुन्हा पुन्हा वाचा.
मोदी राजवटीतील न्यायव्यवस्था