Yogesh.R.Sathe Profile picture
#Ahmednagar District General Secretary @VBAforIndia,Social-Political activities & farmer, We become what we think @Verified
Apr 1, 2022 18 tweets 5 min read
#ThanksPhuleAmbedkar भारतीय रिझर्व बँकेचे जनक – डॉ.बाबासाहेब आंबेडकर.महात्मा गांधी देशाच्या संविधान निर्मितीच्या अगोदर आपल्या सहकार्यांशी बोलताना म्हणतात, “भारत देशाचे संपूर्ण अर्थकारण,राजकारण,समाजकारण,इतिहास, भाषावार प्रांतरचना विश्लेषण,भौगोलिक रचना,भारतीय व्यापार,शेती(१८/१) भारतीय कामगारांचे प्रश्न या विविध बाबतींची सखोल माहिती जर कोणाला असेल तर ते डॉ.आंबेडकर हे आहेत.संविधान निर्मितीसाठी त्यांच्यासारखा विद्वान पंडित कोणी नाही.म्हणून कोणत्याही परिस्थितीत डॉ.आंबेडकरांना संविधान समिती मध्ये निवडून आणा.”आर्थिक विकासासंदर्भात डॉ.आंबेडकर यांच्या मते(१८/२)
Apr 1, 2022 7 tweets 6 min read
#ThanksPhuleAmbedkar
#JaiBhim 💙
जोतीराव - वास्तविक विचारअंती असें ठरतें की ब्राह्मण लोक हे समुद्राचे पलीकडेच जो इराण देश आहे त्या देशांतील मूळचे राहणारे होत.पूर्वी त्यास इराणी किंवा आर्य लोक म्हणत असत. असे कित्येक इंग्लिश ग्रंथकारांनी त्यांच्याच ग्रंथावरून सिद्ध केले आहे. (७/१) प्रथम त्या आर्य लोकांनी मोठमोठ्या टोळ्या करून या देशांत येऊन अनेक स्वाऱ्या केल्या व येथील बहुतेक राजांच्या मुलुखात वारंवार हल्ले करून मोठा धिंगाणा केला.पुढे वामनाचे मागून आर्य लोकांचा ब्रह्मा या नावाचा मुख्य अधिकारी झाला.त्याचा स्वभाव फार हट्टी होता.(७/२)
#JaiBhim 💙
Nov 18, 2020 18 tweets 3 min read
#उठा_भीमाच्या_लेकरानो_समाजाचे_होतकरू_लेकरांचे_बळी_पडत_आहे.
१० नोव्हें २०२० रोजी मयत समाधान शिंदे यांनी आत्महत्या केली अशी बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली त्याचे कारण असे की,मयत समाधान हा गणेश मोरे नामक व्यक्तीच्या ट्रॅक्टर वर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता.(१७/१) ऐके दिवशी तो ट्रॅक्टर चोरीला जातो आणि त्याचा मालक मयत समाधान वर संशय घेत गणेश मोरे चे अन्य सहकारी धनंजय गुंड,काका सुद्रिक,नाना गायकवाड यांच्या सह कारखान्याचे कर्मचारी गावडे,काळे यांनी पोलिस कर्मचारी म्हेत्रे यांना हाताशी धरून त्याला मारहाण करीत त्याला ट्रॅक्टर चोरला आहे,(१७/२)
May 31, 2020 9 tweets 2 min read
#संकलित
रणरागिणी #कोंडाबाईचा भीमपराक्रम - ज्या काळात महिलांना केवळ चूल आणि मूल सांभाळण्याची जबाबदारी रूढी-परंपरेने सोपविली होती,त्या काळात पाच महिन्यांची गरोदर असलेल्या एका महिलेने निधड्या छातीने हल्लेखोलांशी दोन हात केले.पोटात वाढत असलेल्या अंकुरासह स्वतःच्या(१/९) जीवाची पर्वा न करता डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्राण वाचविले.ती महिला आता १११ वर्षांची झाली.तिचे नाव आहे कोंडाबाई कांबळे.या रणरागिणीचा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सत्कार झाला.१९३८ सालची ही गोष्ट.संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या लढाईत उतरला.(२/९)
Feb 18, 2020 5 tweets 2 min read
पुन्हा एकदा महाराष्ट्राचे अभिनंदन।गर्व वाटतो मनुवादी आणि सडलेल्या मानसिकता असलेल्या लोकांमध्ये राहतो त्याचा।पुन्हा एकदा निर्दयी महिला अत्याचार केला त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे।आधी खैरलांजी केलं मग कोपर्डी ,अमरावती, औरंगाबाद केलं आणि पुन्हा एकदा औरंगाबाद केलं,(१/५) आता बाकीचे जिल्हे राहिले आहेत तिथे याच्यापेक्षा जास्त भयंकर अत्याचार झाले पाहिजे।त्यासाठी मनुवादी आणि सडलेल्या मानसिकता असलेल्या लोकांना शुभेच्छा।तुम्ही तुमच काम एकदम निष्ठेने करतात आणि आम्ही चांगले लोक पण तुमच्या पेक्षा कमी नाहीत,आम्ही हिंदू,मुस्लिम,open, obc, sc, st...(२/५)