इडलीवाला अण्णा Profile picture
गुगलवर भरपूर शोध घेतला, पण माझ्यातला मी कधी सापडलो नाही!
Oct 17, 2023 13 tweets 2 min read
क्लच- ब्रेक - गियर आलं म्हणजे आपण ड्रायव्हर होत नाहीत. आपल्या ड्रायव्हिंगचं सामान्यज्ञान असायला पाहिजे. आपल्याला साधे नियम, त्यातून होणारे नुकसान,शिस्त या गोष्टींची काहीही माहिती नसते, एक ड्रायव्हर म्हणून आपण अर्धवट नालायक लोक आहोत. #समृद्धी_महामार्ग (थ्रेड पूर्ण वाचा) समृद्धी महामार्ग हा सर्वोत्तम मार्ग आहे, आपले ड्रायव्हर पण एकदम जगात भारी ड्रायव्हर आहेत, पण चुकतं कुठे तर एक ड्रायव्हर म्हणून आपलं अधिकृत शिक्षण झालेलं नाही. आपण गाडी चालवायला शिकलो आहोत पण त्याचे नियम माहीत नसतात.
Jul 10, 2020 22 tweets 4 min read
फ्रेशर्स मुलांनी नौकरी शोधताना नौकरीची आवश्यकता,मिळणारी संधी,मार्केटची परिस्थिती,स्वतःचे कौशल्य ह्याचा विचार करून पगाराच्या अपेक्षा ठेवायला हव्यात. केवळ अवास्तव पॅकेजेसचे हट्ट पकडून चांगल्या संधी सोडून देण्याने केवळ तुमचा मौल्यवान वेळ वाया जातो. #मराठीनोकरी @iamShantanu_D फ्रेशर्स मुलांकडे इंडस्ट्रीचा अनुभव नसल्याने त्यांना ही जाणीव नसते की हे क्षेत्र,ह्या कंपन्या काम कसे करतात.त्यांना त्याबद्दल योग्य मार्गदर्शन मिळालेलं नसतं आणि त्यातून ह्यांच्या मनात त्या त्या क्षेत्राकडून चुकीच्या अपेक्षा निर्माण होतात.