🇮🇳 Proud Indian
🚩 An unapologetic Hindu
🙏 Maharashtrian
👩💻 Software engineer
🙆Rationally opinionated
📺 Binge watching
📖 Read sometimes
Jul 22, 2020 • 7 tweets • 2 min read
* देवेंद्र फडणवीस यशस्वी मुख्यमंत्री ठरले, असं आम्ही का म्हणतो? *
४ पक्षांची भाऊगर्दी असलेल्या महाराष्ट्रात सलग २दा १०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणून, आणि ५ वर्ष मुख्यमंत्री पद टिकवून, खरं तर जनतेनं वरच्या प्रश्नाचं उत्तर दिलंच आहे! तरी गेल्या पाच वर्षांतील काही ठळक मुद्दे 👇🏻
१. समृध्दी महामार्गा सारखे अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि मेट्रो सारखे बहुचर्चित पण रखडलेले प्रकल्प हातात घेणे, पुढे नेणे.
विदर्भ- मराठवाड्याला न्याय्य निधी वाटप.
वॉटर ग्रीड सारख्या प्रकल्पातून औद्योगिक विकासातली पिछाडी भरून काढण्याबाबत आग्रही.
नाणार सारख्या प्रकल्पासाठी आग्रह.
Jul 20, 2020 • 5 tweets • 1 min read
मी भाजपा समर्थक का आहे?
गेल्या काही दिवसात हा प्रश्न TL वर विचारला जाताना दिसतोय, म्हणून हा थ्रेड.
१. रस्ते, पाणी, वीज, स्वस्त गॅस सिलेंडर, सार्वजनिक वाहतूक, परवडणारी घरे, प्रत्येक घरात शौचालय, प्रत्येकाचे बँक खाते, ह्यांसारख्या नागरी प्रश्नांना सोडवण्याची सुरुवात.
२. बेगडी धर्मनिरपेक्षतेला आणि ओघाने लांगूलचालनाला विरोध. भारतीय परंपरांचा अभिमानाने पुरस्कार. योग असो वा आयुर्वेद, प्रसार प्रचाराला चालना.
स्वार्थी प्रादेशिक पक्षांना सडेतोड प्रत्युत्तर. अवाजवी महत्त्व आणि ब्लॅकमेल संस्कृतीला बळी न पडणे.