भारत (parody account ) Profile picture
parody account 🙏 अबे भैताडा अच्छे दिन वैगरे काही नसतं !अंधश्रद्धा असते ते !!
Feb 19, 2021 5 tweets 2 min read
दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असतांना कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त फायदा व अतिशय सुरक्षित कधीही मंदी न येणार क्षेत्र "बाबा बुवा "
त्याकरिता काही साचेबद्ध वाक्य पाठ करावी! (1/5) 1) तू मनाने खूप साफ आहे
2)लोकं तुझ्या चांगुलपणाचा फायदा उचलतात
3) मित्रांची संगत सोड
4) कितिही कष्ट केले तरी यश हाती लागत नाही
5) पैसा हातात टिकत नाही
6) तुझा काळ आला होता पण तू xyz चा भक्त असल्याने त्याने तुला तारलं, (2/5)
Feb 18, 2021 19 tweets 3 min read
चुकीच्या आणि अन्याय्य गोष्टीपुढे न झुकण्यासाठी निडर बाणा हवा, मुख्य म्हणजे कोणतीही किंमत मोजायची तयारी हवी. मग तो विरोध, तो संघर्ष आभाळाहून मोठा होतो. ही हकीकत अशाच एका सामान्य माणसाची.

तो एक सामान्य लोहार होता. (1/19) तो काही शूरवीर योद्धा नव्हता ज्याला विविध शस्त्रे चालवता येत होती. तो एक सामान्य माणूस होता, तरीही त्यानं एक असं काही असामान्य कर्तृत्व करून दाखवलं की त्याच्या मायदेशी बेलारूसमध्ये आजही त्याच्या पुतळ्यापुढे लोक नतमस्तक होतात. (2/19)
Feb 4, 2021 12 tweets 2 min read
By Kapil Patil
बदनामी सोबत दंडेलशाही दडपशाहीचा वापर करून सुद्धा शेतकरी आंदोलन मोडीत निघत नाही उलट ते आणखी तीव्र होताना दिसतंय म्हणल्यावर देशातच काय जगात पण चर्चा होणारच की
दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आंदोलन चालू आहे, पावणे दोनशेच्या आसपास बळी गेलेत, (1/11) शंभर पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत, सुविधा तोडल्या जातायत तरी सुद्धा शेतकरी आपली एकवाक्यता टिकवून निकराची झुंज देतायत. एवढी गंभीर परिस्थिती बघून याची का नाही चर्चा होणार? (2/11)
Jan 30, 2021 10 tweets 2 min read
महात्मा गांधी यांच्या हत्त्येनंतर पेढे वाटणाऱ्या हिंदू बद्दल वाचले होते. कांही वर्षापुर्वी ज्ञानपीठ यु.आर.अनंतमूर्ती यांच्या निधनानंतर फटाके वाजवणारे प्रत्यक्ष पाहिले व अनुभवले आहेत ! दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या झाल्यावर अत्यानंदी झालेले लोक पाहीले आहेत. (1/10) आज तामीळ जनतेचा आवाज असणा-या एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या बद्दल गलिच्छ लिहीणारेही पाहीले! हे सर्व समाजकंटक लोक एकाच पक्षाचे समर्थक असावे आणि हल्ली एकाच व्यक्तीचे भक्त असावे हा निव्वळ योगायोग नाही! (2/10)
Jan 29, 2021 5 tweets 2 min read
'दिल्लीत पाणी कापल्यावर राकेश टिकैत म्हणाले गावावरून लोकं पाणी घेऊन येत नाहीत, तोपर्यंत पाणी पण पिणार नाही.'..... आपल्या नेत्याचं रडं कोणत्या समूहाला आवडणारै? रात्रीत वातावरण फिरलं. म्हातारे लोकं पण , 'हमारे राकेस को पानी लेकर चलो, (1/5) ' म्हणत गावोगांव फिरले अन् जत्थेच्या जत्थे खांद्यावर पानी घेऊन निघाले. एक म्हातारा म्हणतो, 'राकेस के लिए पानी और दही लाये गावसे|'
सरकारशी संगनमत करून शेतकर्यांना झोडपून काढायला भाजपाचे पालतू गुंड आलेले. पाणी कापलं, वीज कापली, आता आंदोलनाचं कसं होणार? (2/5)
Jan 29, 2021 8 tweets 1 min read
न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कुणाल काम्रावर खटला भरला गेला. त्या संदर्भात कुणाल काम्राने शपथपत्र दिले आहे.
अनुवाद ~मुग्धा कर्णिक 👇
ते मराठीत देतेय. शेअर करा. (1/7) ---------------
"माझ्या ट्वीट्समुळे जगातील सर्वात बलाढ्य अशा न्यायालयाचा पाया खिळखिळा होऊ शकतो असे म्हणणे माझ्या क्षमतेला अती महत्त्व देण्यासारखेच आहे. जसे सर्वोच्च न्यायालयाला लोकांच्या विश्वासाचे मोल वाटते, तसेच त्यांनी असाही दृढ विश्वास बाळगायला हवा, (2/7)
Jan 28, 2021 4 tweets 1 min read
Lockdown असतांना आलेला अनुभव 👇
आज साईट वरून येत असताना एक मजूर खांद्याला भलीमोठी पिशवी अडकवून, डोक्यावर राहुटीच सामान, दोन पाण्याचा बॉटल, पायात स्लिपर घालून टोल नाक्याजवळ चकचकीत चार पदरी महामार्गावर पायपीट करताना दिसला. थोडं समोर गेल्यावर काय वाटलं माहिती नाही !1/4 खरतर त्याचा केविलवाणा चेहरा पाहून दया आली मी माघारी आलो, विचारपूस केल्यावर कळलं की तो छिंदवाडा ते नागपूर 130km चा प्रवास (40+ तापमान ) लिफ्ट घेत, कधी पायी असा करीत होता, त्याच्या प्रवासात 25km चा हातभार लागला, निरोप घेतांना तो केविलवाणा असह्य चेहराच लक्षात राहिला, 2/4
Jan 26, 2021 24 tweets 3 min read
आज 2021 ला भारता सारख्या विकसनशील देशात ,जागतिकीकरणाच्या स्पर्धेत तरुणाईला सार् जग आपल्या कवेत घ्यायचे आहे, जिथे विविध प्रकारच्या भाषा, पंथ,परंपरा ,वेशभुषा व प्रचंड भौगोलिक तफावत असलेले भुभाग आहे तिथे खरच राम मंदिर, हिंदू मुस्लिम, सावरकर, (1/25) नेहरू ह्या चर्चा किती गैरलागू आहेत? एखादा विषय ५००० वर्षे मागे जाऊन चर्चा करणे,प्रत्येक गोष्टींना संस्कृती आणि आस्थेला जोडत त्यावर वातावरण तापवून निवडणूकांकरीता मैदान करत जिंकणे बस हेच एकमेव उद्दिष्ट. (2/25)
Jan 26, 2021 10 tweets 2 min read
देशातल्या शेतकऱ्यांचा जीव नवीन कृषिकायद्यांमुळे धसकला आहे. आंदोलने चालली आहेत. लोक थंडीवाऱ्याची, संसर्गाची पर्वा न करता गेला दीड महिना रस्त्यावर तळ ठोकून आहेत.
आज राजधानी दिल्लीत भारतीय प्रजासत्ताकातील सार्वभौम लोकांना प्रवेश बंद करण्यासाठी भली मोठी यंत्रणा कामी लागली आहे. (1/10) रस्ते बंद करण्यात आले आहेत. देशाच्या बलशाली असण्याचे प्रदर्शन दिल्लीत या दिवशी होते. पण आज दिल्लीत लोकांच्या बळाचे प्रदर्शन होणार आहे.
हे या माज चढलेल्या सत्तांधाना अर्थातच चालणारे नाही. आज दिवसभरात काय होईल ते साशंक मनाने पाहात रहायचे आहे. (2/10)
Jan 23, 2021 14 tweets 2 min read
मै जल रही हूँ मां मुझको बचाओ ना
क्या घर से भी ना निकलूँ इतना बताओ ना

दर दोन चार दिवस जात नाही तर सामूहिक बलात्काराच्या बातम्या प्रसिद्ध होत असताना पालकांना आपल्या दोन वर्षे वयाच्या मुली पासून तर ७० वर्षे वय असलेल्या स्त्रियांची काळजी वाटत असेल तर आश्चर्य वाटायला (1/14) नको. खासकरून शाळा, कॉलेज मधे जाणाऱ्या मुलींचे पालक त्या घरी सुखरूप परत येत पर्यंत प्रचंड तणावाखाली राहत असतील. वासनांध नराधमांना वयाच काही घेणेदेणे नाही समोर दिसत ते स्त्रीच शरीर, एक भोगवस्तू. (2/14)