चारुता कुलकर्णी Profile picture
जय श्रीराम 🙏🏻 भारतीय सनातनी 🚩
Mar 5, 2024 23 tweets 10 min read
आजचा ब्राम्हण कसा आहे

सध्या ब्राह्मणांचे शिरकाण करावे. महाराष्ट्रात एकही ब्राह्मण औषधाला देखील शिल्लक राहिला पाहिजे असे अनेक अब्राह्मण लोकांना वाटते. मला सत्ता द्या की ब्राह्मणांना ३ मिनिटात संपवू असे कुणीतरी म्हणाले याचा प्रतिवाद कोणताही पुरोगामी, गांधीवादी, अहिंसावादी निर्भयवाद्यांना याचा करत नाही किंवा याचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता वाटत नाही. संविधानाने ब्राह्मणांना निर्भय जगण्याचे हक्क दिलेत. गांधी हत्येनंतर झालेले ब्राह्मणांचे शिरकाण आणि देशोधडीला लागणे पुरेसे नसावे. मी मागे एका नेत्याच्या ब्राह्मणांविषयी केलेल्या अनुचित वक्तव्याला प्रतिवाद म्हणून एक लेख लिहिला होता. तोच लेख आजच्या संदर्भात थोडा बदल करून पुन्हा पाठवत आहे. मूळ लेख एका मंत्र्यांच्या ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या उद्गारासंदर्भात होता. त्याविषयी उल्लेख येईल.
+ भाग १
मी, स्वत: माझे ब्राह्मणत्व विसरून गेलेला ब्राह्मण. जानवे घालत नाही म्हणजे कधीच घातले नाही (आज वय ६५+ आहे) संध्या करण्याचा प्रश्नच नाही. माझ्यात जे ब्राह्मणत्व उरले आहे ते फक्त तुमच्यासारखे जेव्हा अशा पद्धतीने जाणीव करून देतात तेव्हाच उफाळून येते आणि कुलकर्णी आडनाव चिकटले आहे म्हणून. पण तुम्हाला सांगतो जातीयवादाच्या चर्चेत निर्विवादपणे कोणता समाज बदललाय तर ब्राह्मण समाजच. कारण तो निर्भीड आहे. ब्राह्मण हा एकच समाज आहे त्याने त्याच्या जातीचे दुर्गुण स्वातंत्र्यानंतर टाकून दिलेत.
+
Feb 9, 2024 27 tweets 4 min read
सचिन गोस्वामी नावाच्या प्राण्याने प्रशांत दामले यांना लोककला म्हणजे काय ? हे अभाविपच्या मारहाण करणाऱ्या मुलांना समजावून सांगा असे आवाहन केले आहे.
दामले बोलतील त्यावेळी बोलतील... गोस्वामी मीच तुम्हाला थोडी माहिती देतो.
+ संगीत वस्त्रहरण- मच्छिंद्र कांबळी
संपूर्ण नाटक थोडेसे अश्लीलतेच्या अंगाला झुकेल असे होते म्हटले तरी चालेल. वेगवेगळे रोल्स करणारे कलाकार आणि त्यांचे स्व अस्तित्व यावर गम्मतशीर भाष्य होते. काही ठिकाणी काय बऱ्याच ठिकाणी देवांची थट्टा होती.
पण तरीही एकाची सुद्धा भावना दुखावली नाही.
+
Apr 25, 2023 25 tweets 3 min read
मी मराठी मालिका बघत नाही, तरीही ही पोस्ट नक्कीच धक्कादायक वाटली:
WhatsApp साभार:
हा नालायक पणा बंद करावा
सिरीयल तयार करता आहात की आमची बदनामी करत आहात
हे इथेच थांबवा
नाहीतर ह्याचा परिणाम वाईट होईल
जसा बॉलिवूड वर बहिष्कार टाकण्याची तयारी चालू आहे
तशी वेळ मराठी वर येऊ देऊ नका
+ मराठी मालिका वास्तव.....!
“या कथानकातील सर्व पात्रे काल्पनिक आहेत. यांचा वास्तविकतेशी काही संबंध नाही. आढळल्यास तो योगायोग समजावा.” अशी पाटी दोन सेकंद दाखवली की, वाट्टेल ते दाखवायला आपण मोकळे, असाच खाक्या सर्व वाहिन्यांनी राबवलेला दिसतो.
+
Jul 24, 2022 5 tweets 1 min read
आतून तुटलेली माणसं ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात, इमोशनल होणं बंद होत जातं कालांतराने.

आतून तुटलेली माणस व्यक्त होत नाहीत फारशी, त्या लोकांपुढे तर बिलकुलच नाही ज्यांच्यामुळे त्यांना सहन करावं लागल असेल काहीतरी.
+ 2+2=5 कुणी म्हणालं तरी ते "it's okay man" म्हणून निघून जातात.

ती माणसं वाद टाळतात, माणसांशी बोलणं टाळतात. एका पॉइंट नंतर त्यांचा realisation sense झपाट्याने वाढलेला असतो. समोरचा माणूस किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतेय, फायद्यासाठी बोलतोय की स्वार्थ आहे हे पटकन समजून येत.
+