चेतन_शब्दयोगी Profile picture
कवी 💓 ! पुस्तक 📖 & चित्रपट 📽 ! क्रिकेटर 🏏 ! बुद्धिबळ ! इतिहास व पुराणकथा ! Gym & Music 🎶 ! Singer🎤! खादाड ! ओशो ! प्रवासी ! #चेतन_शब्दयोगी 📝
Mar 5, 2022 5 tweets 3 min read
#झुंड पाहिला एकदाचा. २०१६ पासून वाट बघत होतो.. पुढं नागराज आणखी काय दाखवणार .. काय सांगणार .. काय मांडणार ..

फँड्री मध्ये दगड फेकून मारला होता पण या झोपलेल्या म्हणा किंवा झोपेचं सोंग घेतलेल्या समाजाला जागं करण्यासाठी यावेळी त्यानं ' लात ' मारली आहे .. ते पण प्रस्थापितांच्या 👇 मनुवाद्यांच्या अवघड जागेवर .. त्यांच्या कपाळात गोट्या येणारंच की !

' मैं सुधारणा चाहता हूँ तो ये लोग मुझे सुधारणे क्यूं नहीं दे रे ? ' ' भारत मतलब ? ' एक ना असे अनेक प्रश्न तो पात्रांच्या तोंडी घालून समाजाला विचारतो ! आपल्यालाच आपल्या नजरेत नागडं करतो .. उघडं पाडतो 👇
Feb 9, 2022 5 tweets 2 min read
मला नेहमी प्रश्न पडायचा की शूद्र म्हणून छळला गेलेला समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षापर्यंत निमूटपणे अन्याय आणि अत्याचार का म्हणून सहन करत जगत होता.. या प्रश्नाचे व्यवस्थित उत्तर डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या ' दलित साहित्य आणि सौंदर्य ' या पुस्तकात मिळाले 👇 पृष्ठ क्र. २१२ व २१३ वर ) तिथं ते म्हणतात

" ही व्यवस्था ईश्वराने निर्माण केली आहे. हा जन्म पूर्व जन्मी केलेल्या पापांमुळे प्राप्त झालेला आहे. यातून मुक्ती मिळवायची असेल, या जन्मी सत्कर्म करून पुण्य मिळवणे हा एकच मार्ग आहे. अन्यथा नरकात जावे लागेल. " अशा दैवी धमकीमुळे 👇
Feb 8, 2022 4 tweets 1 min read
आमच्या ओळखीत एक २२ वर्षाची मुलगी आहे.. तिचे लग्न झाले. आई वडिलांनी mediclaim policy काढली.. तिचे दुर्दैव तिच्या लग्नाच्या चारच दिवसांत दोन्ही किडन्या निकामी झाल्या.. claim करायला गेलो तर पॉलिसी उतरावनाऱ्या कंपनीने.. तिला काही आधीच आजार होता का ? घरच्यांची 👇 तशी काही मेडिकल हिस्टरी आहे का.? सगळं म्हणून सगळं तपासलं.. जेव्हा त्यांना काहीही लपवले नाही किंवा खोटे नाही याची खात्री पटली तेव्हा त्यांनी रक्कम मंजूर केली..

सांगतो यासाठी एक धडधाकट कोंबडीचे पिल्लू बेल मिळाली नाही म्हणून कोर्टाच्या आदेशानंतर बऱ्याच दिवसांनी शरण आले 👇
Nov 3, 2021 8 tweets 3 min read
#ओळख_चित्रपटांची
चित्रपट - जय भिम
लेखन व दिग्दर्शन - T.J.Gnanavel

संपूर्ण चित्रपट पाहिला.. शोषित वर्गावर होणारा अन्याय पाहिला.. त्या लोकांच्या न्यायासाठी लढणारा ( ते ही विना मोबदला ) नायक पाहिला... त्याचा काळा कोट पाहीला.. 👇 त्याच्या डोळ्यावरच्या गोल चष्मा पाहिला... शोषित वर्गासाठी लढण्याची त्याची तळमळ आणि चळवळ पाहिली.. त्याचा संघर्ष पाहीला.. त्याचा प्रस्थापित व्यवस्थेशी दिलेला लढा पाहिला.. आणि जो शब्द एकदाही उच्चारला नाही तो शब्द या चित्रपटाचे 👇
Jan 7, 2021 15 tweets 5 min read
आजचा चित्रपट :- Gangs Of वासेपूर ( 1 & 2 )
दिग्दर्शक :- अनुराग कश्यप

आधुनिक यूगातला शोले म्हंटलं तर वावगं ठरनार नाही..असा 2012 साली प्रदर्शित झालेला तसंच अनुराग कश्यप दिग्दर्शित Gangs Of वासेपूर.

तुमच्या कडं बजेट कितीही कमी असु द्या पण कथा

सरदार खान 👇 आणि पटकथा जर उत्तम असेल तर तुम्ही सोन्यासारखा चित्रपट बनवू शकता याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे GOW.

हा चित्रपट प्रत्येक अंगानी अभ्यास करायला ठेवावा आणि चित्रपट कसा बनवला पाहीजे हे शिकवणारा असा बनवला गेला आहे.

फैजल खान👇
Dec 28, 2020 14 tweets 3 min read
चित्रपट - ' Fandry ' ( 2014 )

खरं तर चित्रपट समीक्षा लिहिण्यास सुरुवात करावी असा एकमेव चित्रपट आहे. म्हणून हा पहिला.

खदखद काय असते आणि तिला व्यक्त कशी करायची असते. अख्खं जग विरोधात समोर उभं असताना पण त्यांना पाठ न दाखवता निधड्या छतीनं सामोरं जाऊन चार वार झेलायचे कसे आणि
👇 आठ वार करायचे कसे. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच ' Fandry '.

मला 100% खात्री आहे, कि या जगात कोणीच, या चित्रपटाला शब्दांत व्यक्त करून न्याय देऊ शकत नाही. त्याला वेगळं सांगायची गरजच नाही. तो स्वयंपूर्ण आहे.
👇
Dec 28, 2020 7 tweets 4 min read
Alone ( एकटं )

मला जवळ जवळ कायमच एकटं (Alone) राहायला आवडतं. मला माझी सोबत जगात इतर कोणाही पेक्षा जास्त आवडते. मीच अशी ती व्यक्ती आहे जिच्यावर मी सगळ्यात जास्त प्रेम करतो, जिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो तसंच जिची सर्वात जास्त काळजी घेतो.
@Archanagsanap2
@Rupachi_Rani
👇 मी बर्याचदा अनेकांना एकटं राहायला जगायला घाबरलेलं पाहिलं आहे. मी याच्या शिवाय जगू शकत नाही त्याच्याशिवाय जगू शकत नाही असं आपण म्हणतो पण तसं खरंच नसतं त्याचा एवढाच साधा अर्थ असतो की मी आमूक आमूक व्यक्ती सोबत थोडा जास्त आनंदी जगेल. बस्स. यापेक्षा आधिक त्यात काहीही अर्थ नसतो.
👇
Dec 28, 2020 9 tweets 3 min read
नुकतीच मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या झुंजार लेखणीतून रक्त ओकल्यासारखे शब्द लिहिलेली ' आघात ' नावाची कादंबरी वाचून संपवली..

अण्णाभाऊंच्या लेखनी म्हणजे तळपती तलवार जणू.. अशी कोणतीही भावना, विचार किंवा गोष्ट नाही जी ते तीला आपल्या लेखणीने योग्य न्याय नाही देऊ शकत..
👇 झोपडित राहणाऱ्या पण परिस्थितीशी झगडनाऱ्या लोकांचे जीवन चित्रित करणारी " आघात " ही कादंबरी, अण्णाभाऊंना कशी सुचली असेल हा प्रश्न पडत नाही.. कारण स्वताहा अण्णाभाऊ अशाच झोपडिवजा भागात लहानाचे मोठे झाले.. गरीबी, कष्ट, दारू, रोगराई, भांडण, संघर्ष, शिव्यागाळ्या हे
👇
Dec 28, 2020 8 tweets 3 min read
Is it ok.. to Loose ? 😊

मला पडणारा नेहमीचा प्रश्न की आपल्याला जिंकायचंच का असतं? आपण न जिंकता ही आनंदी तसंच यशस्वी जीवन जगू नाही का शकत? का त्यासाठी आपल्याला आनंदी आणि यशस्वी जीवन म्हणजे काय याच्याच व्याख्या बदलाव्या लागणार आहेत ?
👇 मला कायम वाटंत आलं आहे जीवन जगणं मंग ते कशाही प्रकारे असू दे तो एक प्रकारचा mind game च चाललेला असतो. तुमच्या सोबत घडलेल्या घटना व त्याचा तुम्ही तुमच्या बुद्धी नुसार लावलेला अन्वयार्थ तसंच त्याला तुम्ही दिलेला reply.
👇
Dec 28, 2020 4 tweets 1 min read
Holding..is BAD

Any kind of 'Holding Is BAD' whether it is Love, Hate, Grudge, Anger, Happiness, Sadness or Kindness!

कोणत्याही प्रकारची भावना प्रमाणापेक्षा जास्त काळ धरून ठेवणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी नक्कीच चांगलं नसते.
👇 कारण त्या भावनेसोबत जगण्याची आपल्याला सवय होते. ती भावना ज्या व्यक्ती, जागे किंवा कामा बाबतीत आहे तिचीही सवय होते. जर future मध्ये ती दूर झाली तर त्याचा आपल्याला त्रास होवून नैराश्य येण्याची शक्यता वाढते.
👇
Dec 26, 2020 7 tweets 2 min read
त्रास म्हणजेच दुःख का ?

आपल्या जीवनात अनेक चांगल्या वाईट गोष्ठी घडत असतात. चांगल्या, मनासारख्या घडल्या की आपल्याला आनंद होतो, मस्त - छान वाटतं.
पण काही न आवडणार्या घडल्या तर ? तर मंग आपल्याला शारीरिक तसंच मानसिक त्रास होतो वा त्याचं दुःख होतं! 👇 आपण आजारी पडलो तर त्याचा आपल्याला शारीरिक त्रास होतो पण आपणच का पडलो असा जर विचार केला तर दुःख होतं. आपल्या हातात काय आहे त्रास टाळनं का दुःख टाळनं, विचार करा!

त्रास होणं आणि दुःख होणं याची गल्लत करू नका कारण दोघेही वेगवेगळे आहेत! सख्खी भावंडं म्हणा ना ती पण जुळी! 👇
Dec 26, 2020 6 tweets 2 min read
जगात काही लोकं शापित म्हणून जन्माला येतात अन शापित म्हणूनच मारतात.त्या यादीतलं अग्रगण्य नावं असेल तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.

अफाट अन अचाट शब्द प्रतिभा लाभलेला लेखक. त्यांनी जेवढा लेखन प्रपंच केला.जेवढी साहित्य निर्मिती केली, तेवढी इतर कोणीही केली असती तर 👇 त्याला डोक्यावर घेऊन मराठी वाचक अक्षरशः नाचला असता. त्यांना दलित साहित्यिक म्हणून एका कोपऱ्यात ठेवून दिलं गेलं आहे. त्यांच्या लेखनाची कोणीही मुक्त मनाने, बुध्दीने चिकित्सा करत नाही. सोनं तुम्ही पारखलच नाही तर ते सोनं आहे तुम्हाला कळणारच नाही.👇
Dec 26, 2020 6 tweets 3 min read
"Strategic time out...

आपण म्हणजे मी, तु ..आपण सगळेच..ज्या प्रकारच्या rat race चा भाग झालो आहोत..ओरबाडून घेण्याच्या ( मंग ते सुख असो यश असो पैसा असो की आणखी काहीही..) मानसिकतेत जगत आहोत..त्याला ब्रेक देण्यासाठी छेद देण्यासाठी अशाच प्रकारच्या time out ची गरज होती की काय ? 👇 असं वाटायची वेळ आली आहे. ज्या प्रकारे नैसर्गिक साधन संपत्ती लुटली जात आहे, निसर्गाचा र्हास होत आहे ..वायू जल माती प्रदूषण होत आहे, त्यावर ते रोखण्यासाठी कोणीही एक क्षण ही थांबून विचार करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही/नव्हता. कोणालाही दुसऱ्याचापण विचार केला पाहिजे किंवा 👇
Dec 25, 2020 8 tweets 2 min read
रावण-राजा राक्षसांचा
लेखक - शरद उत्तमराव तांदळे

आजवर शेकडो म्हंटलं तरि चालतील एवढी पुस्तकं वाचली असतील, पण जे सुख, आनंद आणि त्रुप्ती या पुस्तकाने दिली ती मला तरी दुसऱ्या कुठल्याच पुस्तकांतून मिळालेली नाही..👇 आजही मला रामायण ही काल्पनिक कथाच वाटंत आली आहे.. त्याला इतिहास मानण्याचे आजही माझे मन आणि बुद्धी नाकारते..पण जो प्रभाव रामायण परिणामी रामा ने भारतीय समाज मनावर केला आहे तेवढा कुठल्याही सत्य किंवा काल्पनिक व्यक्तीचा भारतीय समाज मनावर झालेला नाही हे पण तेवढंच सत्य आहे.👇