व्हॉटसअप वर हा लेख वाचला. असंख्य भक्तांच्या भावना व्यक्त केल्या आहेत असे वाटले म्हणून शेअर करतेय.
प्रसंगोचित वक्तृत्वाचा आदर्श नमुना!
पंतप्रधानांचं आजचं भाषण त्यांची उंची आणि दर्जा दर्शवणारं होतं. त्यांचं नेतृत्व केवळ 'आक्रमक' नसून ते किती 'अभ्यासू' आहे याचं आज दर्शन घडलं.
१/१०
श्रीरामांचा सामाजिक संदेश सांगताना, श्रीरामाच्या मुखातील चार पाच पंक्ती त्यांनी उद्धृत केल्या. प्रत्येक ओळीपाठोपाठ तिचा अर्थ! ''वृध्द, बाल व वैद्यकीय चिकित्सक यांचं रक्षण होणं गरजेचं आहे'' या रामवाक्याचा संदर्भ त्यांनी 'करोनातून' मिळालेल्या धड्याशी नेऊन भिडवला.
२/१०
Jul 19, 2020 • 11 tweets • 3 min read
शिंदे घराण्यांचे संस्थापक राणोजी शिंदे!
१९ जुलै राणोजी शिंदेची पुण्यतिथीनिमित्त !
मराठ्यांच्या इतिहासात शिंदे घराणे पराक्रमी व एकनिष्ठ म्हणून प्रसिद्ध होते. साता-याजवळ २० कि.मी. अंतरावरचे कोरेगाव तालुक्यातील कण्हेर - खेड हे शिंदे पाटलांचे मूळ गाव होय.
१/१०
याच घराण्यातील राणोजी शिंदे हे पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पदरी नोकरी करीत होते. मात्र राणोजीचा उत्कर्ष हा थोरले बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. आपल्या बरोबर तरुण कर्तबगार शूर लोकांचा भरणा असावा हा बाजीरावांचा विचार होता.
२/१०
Jul 14, 2020 • 6 tweets • 2 min read
संघ समजून घ्यायचा असेल तर ही सत्य घटना जरुर वाचावी 🙏
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक श्री बाळासाहब देवरस यांनी तब्येत ठीक नसल्यामुळे सरसंघचालक जबाबदारीतून मुक्त होऊन प्रो. रज्जूभैया यांच्यावर ती जबाबदारी सोपवली.
१/६
नवनियुक्त सरसंघचालकांची मुलाखत घ्यायला 'ब्लिट्ज' साप्ताहिकचे संपादक असलेले श्री. रुसी करंजिया नागपुर संघ कार्यलयात पोहोचले.
त्यांची रज्जूभैया यांच्याशी चर्चा सुरु होती आणि तितक्यात जेवणाची सूचना देणारी घंटेचा आवाज ऐकू आला.
२/६
Jun 4, 2020 • 6 tweets • 3 min read
इतिहास आणि वर्तमान
बाबासाहेब पुरंदरे यांनी एका व्याख्यानात त्यांची व्यथा मांडली होती.
१. आपल्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखे अलौकिक व्यक्तिमत्व होऊन गेले पण सध्याची परिस्थिती पाहता त्या इतिहासाचा आपण अभ्यास करून काही उपयोग करून घेतला असे दिसत नाही.
२.आयुष्याची ८० वर्षे अनेक व्याख्याने केली पण खरं सांगायचं तर वर्तमान पाहता असे वाटते की ती सर्व व्याख्याने श्रोत्यांनी फक्त टाईमपास म्हणून ऐकली.
सुरुवातीपासून इतका काळ जर लेखनासाठी दिला असता तर ते लेखन साहित्य नंतर का होईना पण कदाचित जास्त उपयोगी पडले असते.