वडिलांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे आणि ज्ञानाप्रमाणे आपल्याला वाढवले. दुसऱ्याना दोष देताना आपण आपली जबाबदारी टाळत असतो. लहानपणी आपल्याला जशी वाईट वागणूक त्यांनी दिली, तशीच त्यानासुद्धा त्यांच्या लहानपणी मिळाली होती. ते आपल्यासारखेच सतत घाबरलेले आणि दडपणाखाली असायचे, ते सुद्धा असेच
तुमच्यासारखे असहाय्य असायचे, ते जे शिकले तेच त्यांनी तुम्हाला शिकवलं. तुमच्या आई - वडिलांच्या लहानपणीची तुम्हाला कितपत माहिती आहे विशेषतः वयाच्या दहाव्या वर्षाच्या आधीची ? शक्य असेल, तर अजूनही विचार किंवा शोधून काढा. ते जर शोधून काढलं, तर ते तुमच्याशी असं का वागले तुम्हाला