भक्ती ते मुक्ती
२०१४ हे वर्ष भारतीय राजकारणातली महत्वाचे वर्ष.सत्तेची सवय असणाऱ्या काँगेसल हरवून भाजपने एक मोठ्या बहुमताने सत्ता स्थापन केली.
मी मतदान केले नव्हते पण निकालानंतर मात्र जाम खुश होतो कारण मला वाटत होते की एका नवा पंतप्रधान मिळाला, आणि आता नुसता विकासच विकास.
कॉलेजात होतो राजकारणाविषयी कुतूहल होते. पण समज नव्हती.मोदींचे सगळे बोलणे खरे समजुन प्रत्येक statement ला defend करण्याच्या नादात मी कधी भक्त झालो हे कळलेच नाही.जवळपास २ वर्ष मी हेच करत राहिलो.पण कॉलेजच्या शेवटी अवांतर पुस्तके वाचण्याचा छंद जडला.बरीच पुस्तके वाचण्यात आली.
Jun 20, 2020 • 9 tweets • 2 min read
सध्या चीन सोबतच्या वादामुळे राष्ट्रवाद (Nationalism) आणि देशभक्ती ( Patriotism) ह्या शब्दांचा वापर सर्रास वाढला आहे. काही जण यांचा वापर सामना अर्थाने करतात. तर खरेच हे शब्द समानार्थी आहेत का? तर नाही.
प्रथम देशभक्ती..
आपला देश आणि येथील जीवनपद्धती, संस्कृती, भाषा, येथील लोक यांच्या विषयी असणारी आस्था म्हणजे देशभक्ती. यात आपली ही संस्कृती, भाषा दुसऱ्यावर लादण्याचा समावेश नसतो. आपल्या देशाकडे जे आहे त्यावर अभिमान असतो आणि जे नाही ते सुधारण्याचा मानस असतो.
Jun 19, 2020 • 9 tweets • 4 min read
राहुल गांधी..
नाव वाचल्या बरोबर चेहऱ्यावर हसू किंवा एखादा मजेदार meme किंवा व्हिडिओ आठवला असेलच. मागच्या जवळपास १० वर्षांपासून या माणसाची प्रतिमा कशी एक पप्पू , मंदबुद्धी,नेतृत्वहीन अशी व्यवस्थित पणे तयार केली गेली याचाच तो परिणाम.
खरेतर मनुष्याने कोठे जन्म घ्यावा हे त्याच्या क्षमता आणि इच्छा दोन्हींच्या पलीकडचे.गांधी घराण्याला ४-५ पिढ्यांपासून लाभलेला राजकीय वारसा आणि अश्या वातावरणात राहुन राजकारणात करिअर करायचं म्हटल्यास त्याचा थोडेफार फायदा होणारच.आई वडिलांच्या व्यवसायाचा फायदा त्यांच्या मुलांना होणार