@shivsena #yuvasena सहसचिव - विस्तारक (अकोला जिल्हा). मै खामीयां अंदर और खुबियां बाहर ढुंडता हूं ॥ माझं पूर्ण नाव ॲड. जयेश कुमुद अनंतराव वाणी
Nov 14, 2022 • 15 tweets • 3 min read
साल २००१ असावं, महाराष्ट्रातल्या बहूतांश महाविद्यालयीन वक्तृत्व वाद-विवाद स्पर्धेत काही नावं स्वतःला सिध्द करत होती. अण्णा जगताप, विश्वाधार देशमुख, गुरुराज गर्दे आणि सुषमा अंधारे. मी सुषमाताईंना तेव्हा पासुन ओळखतो. महाराष्ट्रातली क्वचितच
अशी एखादी स्पर्धा असेल ज्याचं स्मृतीचिन्ही सुषमाताईंच्या शोकेसमधे नसेल. आजची पोस्ट ताईंचे माझे कौटूंबिक संबंध किती जवळचे आहेत याच्या आत्मप्रौढीसाठी नाही पण ते सांगीतले नाहीत तर माझ्या बोलण्यातल्या अनेक गोष्टींवर "याला काय माहीत ?" असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
Nov 12, 2022 • 6 tweets • 4 min read
नात्यांपेक्षा निष्ठा श्रेष्ठ
छत्रपती महाराजांचं निधन झालं... ज्यांनी राज्याभिषेकावेळी युवराज पद भुषवलं होतं ते संभाजीराजे पन्हाळगडावर होते. महाराजांच्या निधनाची वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचायची होती. पोरक्या झालेल्या सिंहासनाला वारस नव्हता. एका विविक्षीत क्षणी
राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला. संभाजी राजेंना रायगडाचे दरवाजे बंद होते. संभाजी राजे पन्हाळगडावरुन रायगडाकडे निघालेत. राजाराम महाराजांच्या आईसाहेब सोयराबाई साहेबांना वाटलं या अटीतटीच्या वेळी त्यांचा सख्खा भाऊ, छत्रपतीपदी विराजमान राजाराम महाराजांचा
Aug 14, 2021 • 6 tweets • 2 min read
Thread - माझा @BJP4Maharashtra च्या सगळ्या नेत्यांना अगदी @ChDadaPatil पासुन सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रश्न आहे… लॅजिकल आणि बुध्दीप्रामाण्यवादी उत्तर द्या - तुम्हाला भारत - पाकिस्तान फाळणी चं दु:ख आहे की आनंद? १/६
दु:ख असेल तर आज दोन देश एकत्र झालेत तर तिथल्या मुसलमानांना तुम्ही स्विकारणार का? फाळणीनंतरही भारतभूला आपलं मानुन इथल्या लोकांवर विश्वास ठेऊन राहिलेल्या मुसलमानांना तुम्ही कधी गुरांच्या मासा वरुन कधी जय श्रीरामच्या घोषणेवरुन मारहाण करता मग त्यांना कसं आपलसं करणार ? २/६
Aug 12, 2021 • 7 tweets • 3 min read
भारतीय जनता पक्षाचे नेते एक नंबरचे खोटारडे आहेत. काल परवा पर्यंत आमदार @Dev_Fadnavis सातत्याने सांगत होते की OBC आरक्षणाचे अधिकार राज्य सरकारांकडेच आहेत. केंद्र सरकारशी याचा संबंध नाही पण काल केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करत OBC आरक्षणाचे अधिकार राज्य सरकारांना दिलेत. १/७
देवेंद्र फडणवीसांच्या पुर्वीच्या म्हणण्या प्रमाणे OBC आरक्षणाचे अधिकार केंद्र सरकारकडे नव्हते तर मग काल केलेली घटना दुरुस्ती कशा करता होती?आता फडणवीस म्हणताय की राज्य सरकारला अधिकार मिळालेत तर मराठ्यांना आरक्षण द्या. मला भाजप वाल्या वकिल नेत्यांच्या डिग्रीवर नेहमीच शंका येते. २/७