Liberal | Legislative Researcher | Reader | Painter | Animator
Apr 10, 2021 • 8 tweets • 2 min read
म.फुलेंनी आधुनिक शिक्षणाची प्रेरणा पाश्चात्य संस्थाकडून घेतली. त्यांचे शिक्षण १८२४ मध्ये पुण्यात ख्रिस्चन मिशनरीने काढलेल्या शाळेत झाले होते. सर्वांना शिक्षण देणाऱ्या या शाळेची बाब सनातन्यांना खटकली. पालकांचे धार्मिक अंगाने कान भरून या मुलांना शाळेतून काढण्यास प्रवृत्त केले गेले
पुढे अहमदनगर जिल्ह्यात दर्जेदार शिक्षण संस्था काही मिशनऱ्यांच्या मार्गदर्शनातून उदयास आल्या होत्या. पुढील काळातही नगर जिल्ह्यातील या शाळा कॉलेजांतून शिकलेले अनेक बहुजन दिग्गज उदयास आले ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामापासून महाराष्ट्राप्रतीच्या योगदानात मोलाची भूमिका बजावली.
आल्फ्रेड पार्क मध्ये ब्रिटीश पोलिसांनी घेरले असतांना चंद्रशेखर आझाद पिस्तुलाने शर्थीचा प्रतिकार करत होते. असहाय्यता लक्षात घेऊन त्यांनी ब्रिटीशांना शरण न जाता स्वतःवर गोळी झाडून घेत या महान क्रांतीकारकाने आपले आयुष्य संपवले.
त्यांच्या खिशात त्यावेळी ३००० रुपयांचा हिशोब लिहिलेली डायरी आणि उर्वरित ४७२ रु रोख सापडले. ते पैसे नेहरूंनी दिलेले होते.
नेहरूंनी कॉंग्रेस अंतर्गत ‘नवजवान सभा’ स्थापन केलेली होती. त्या माध्यमातून पंडित नेहरू भारतीय क्रांतिकारकांच्या संपर्कात राहत होते.