चहा..❤️
काही महिण्यापासून मॉर्निंग वॉकला येणाऱ्या आजोबांबरोबर मैत्री झाली.रोज सकाळी माझी ऑफिसला यायची वेळ आणि त्यांची वॉकला यायची वेळ एकदम जुळून आली होती.गेल्या दोन-अडीच महिण्यापासून रोज भेटणं आणि गप्पा मारत मारत चहा ओढणं चालू होतं. कधी मला उशीर झाला, आलो नाही तर आजोबा माझ्या 👇
नावानं चहा पिऊन जातं.पण गेल्या हफ्त्यात ते आलेच नाही..😔 म्हणून चहा वाल्याकडं चौकशी केली, तर तो बोलला बाबा कालचं दुसऱ्या रस्त्याला दिसलें मला.आज- काल इकडं येतच नाही.मला जरा वाईट वाटलं आपल्या कडून काही चुकलं का, बाबांना काय झालं, कोण्ही बोललं असेल का असे असंख्य प्रश्न डोकयात👇
Feb 10, 2023 • 5 tweets • 1 min read
गांव... ✊️❤️
गांव आपल्या प्रत्येकाच असं हक्काचं ठिकाण. जिथं आपल्या जन्मापासून सुरु झालेला जीवन प्रवास मृत्युच्या सरणावर चढू पर्यंत साथ देणार एक अविस्मरणीय ठिकाण असत.बदलत्या काळानुसार गांव पण बदलत गेलं.पंचवीस तीस वर्षांपूर्वीच अनुभवलेलं गांव आता बदलेलं दिसत.सकाळी हफश्याच्या..👇
खडकड आवाजानी तर कधी गाय,म्हशी, चिमण्याच्या आवाजाने जागं होणार गांव आता मोबाईल अलार्मने जागं होतं.सकाळी किटलीत पावशेरच्या मापाने दूध टाकणारा गवळी आता पिशवी घेऊन येतो.चपातीचा वास,चटणीचा ठसका, अंड्याच्या पोळीचा घमघमाट आता नाहीसा झालाय, त्याची जागा ब्रेड, मॅगी सॅन्डविच ने.. 👇
Feb 8, 2023 • 6 tweets • 2 min read
बाप..✊️❤️
दहावीला असताना शाळेत लागणाऱ्या वह्या, पुस्तकांसाठी बापाला निरोप पाठवला होता.तालुक्याच्या बाजाराचा दिवस पकडून दादा आले.नायलॉनची भली मोठी लिंबाने भरलेली पिशवी सायकलच्या हँडल ला अडकवून उन्हा तान्हात ते आले होते.थोडा वेळ मी राहत असलेल्या वसतिगृहात विश्रांती करून मी.. 👇
एवढे लिंब विकून येतो असं बोलून गेले.मी शाळेत नं जाता त्यांची जवळ पास तीन-चार तास वाट पाहत बसलो.ते आले.चेहरा थोडा पडलेला होता,लिंबाची पिशवी खाली होती,अंगावरचे कपडे घामाने भिजलेले होते.पाच दहा मिनटं बसल्यावर वसतिगृहाच्या मुलांचा आणि शिक्षकांचा अंदाज घेऊन जरा डबक्या आवाजात.. 👇