Mohasin Profile picture
सहराज्य प्रमुख,सोशल मीडिया फ्रंट, राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार,महाराष्ट्र.
Jan 27, 2023 4 tweets 1 min read
निकोला या अमेरिकन कंपनीने 1जबरदस्त इलेक्ट्रिक ट्रक काढून मजबूत हवा केली होती.या कंपनीचे Founder होते Travor Milton.हे ट्रक इतके दमदार होते की,जगप्रसिद्ध जनरल मोटर्सने देखील या कंपनीसोबत 2बिलियन डॉलर्सचा करार केला होता.यामुळे 10 डॉलरवर असणारा निकोलाचा शेअर पुढे 63 डॉलर वर पोहचला. अचानक वाढलेल्या या शेअर च्या किमतीमुळे नॅथन अँडरसनच्या हिंडेनबर्ग रिसर्चच लक्ष या कंपनीकडे गेलं.त्यांनी खोदकाम सुरू केलं आणि Travor Milton ला जगापुढे नागड केलं.त्याने देखील नॅथनला बघून घेईल वगैरे धमक्या दिल्या होत्या.
Jan 27, 2023 10 tweets 2 min read
2008 साली अमेरिकेत एक जबरदस्त आर्थिक घोटाळा उघडकीस आला.हा घोटाळा करणारा होता,बर्नार्ड मेडोफ.1960 साली बर्नार्ड ने "पेंनी स्टॉक एक्सचेंज"नावाने एक कंपनी उघडली आणि हळूहळू तिचा विस्तार करत तीच रूपांतर पुढे,"बर्नार्ड एल.मेडोफ इंवेस्टमेंट सिक्युरिटी"मध्ये केलं. बर्नार्ड ने या कंपनीला इतकं मोठं केलं होत की,अमेरिकन स्टॉक एक्सचेंज मधील ती पहिल्या काही कंपनी पैकी एक होती.

भारतात आर्थिक बाबींवर नजर ठेवण्यासाठी जशी "सेबी" नावाची संस्था आहे,तशीच "सेक" नावाची संस्था आहे..जी अमेरिकेतील आर्थिक व्यवहारांवर/ गोष्टींवर नजर ठेवून असते.
Aug 28, 2022 14 tweets 2 min read
Thread.
नरेंद्र मोदी उर्फ शेठ जसे सत्तेत आले तस मालकांनी देशातील कोणकोणत्या सरकारी संस्था,कंपन्या यांना विकून टाकले,किंवा त्या कंपन्यांत असणारी सरकारी गुंतवणूक काढून घेतली...यावर एक नजर टाकूयात. 2014-15
1. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड.
0.29% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

2.SAIL(Steel Authotiry of india ltd.)
5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

3.NALCO (National Aluminium Company Ltd.)
0.13 % सरकारी हिस्सा विकण्यात आला.
Apr 7, 2022 8 tweets 2 min read
समजा,
एखादा गुन्हा घडलाय,तुमचा त्या गुन्ह्याशी काही एक संबंध नाही,तरी पोलिसांनी तुमची केवळ संशयाच्या आधारे चौकशी करत,
तुमच्या हातांचे ठसे घेतले,
तुमच्या विर्याचा नमूना घेतला,
तुमच्या रक्ताची चाचणी केली,
तुमची सगळी बायोलोजिकल माहिती घेतली,
तुमचा swab घेतला, तुमच्या सर्व शरारिक चाचण्या करून घेतल्या,
केसांचे नमुने आणि तुमचं हस्ताक्षर देखील घेतले तर..?
आणि हे करण्यास एखाद्या व्यक्तीने नकार दिल्यास
त्याच्यावर IPC 186 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा देखील दाखल केला तर..?
Apr 7, 2022 12 tweets 2 min read
IL&FS - देशाची सगळ्यात मोठी फायनान्स करणारी कंपनी बुडाली.

फायनली इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राला कर्ज पुरवण्यात देशाची सर्वात मोठी कंपनी असणारी IL&FS ( इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस) आता टोटली बुडाली आहे,अस समजलं तरी हरकत नाही. या कंपनीला NCLT म्हणजे National company Law Tribunal ने आता NPA(Non performing asset) म्हणून जाहीर करायला परवानगी दिली आहे.NCLT ही गव्हर्नमेंटची संस्था आहे.याच काम थोडक्यात सांगायच तर कॉर्पोरेट कंपन्यांचे लफडी सांभाळणे.त्यावर लक्ष ठेवणे.
Apr 6, 2022 8 tweets 2 min read
Lic मध्ये तुमची गुंतवणूक आहे का? असेल तर तुमच्यासाठी एक मजबूत धोक्याची घंटी लवकरच वाजणार आहे. देशभरातील शासकीय कंपन्या डुबत असताना आता,"जिंदगीके साथभी,जिंदगीके बादभी" चा नारा देणाऱ्या LIC वर जबरदस्त मंदीचे वारे घोंघावत आहे. 2002 पासून LIC चा NPA (Non performing asset)हा जास्तीत जास्त 1.5-2 परसेंट असायचा.परंतु केंद्रात बसलेल्या कर्मदरिद्री सरकारच्या गलथान कारभारामुळे,हा NPA चालू आर्थिक वर्षात चक्क 8.17 वर पोहचला आहे. NPA ही अशी रक्कम असते जिला वसूल करण्याच्या सर्व आशा अपेक्षा धुळीस मिळालेल्या असतात.