Mangesh Jadhav Profile picture
स्वतःला थोडं चांगलं बनवलं ना की, जगातला एक वाईट माणूस आपोआप कमी होतो...❣️
Nakul Deshmukh Profile picture 1 subscribed
May 26, 2021 5 tweets 2 min read
बुद्ध जवळचा वाटतो कारण बुद्ध प्रश्न विचारायला सांगतो, तेही स्वतःला आणि उत्तर शोधायला प्रवृत्त करतो,तुम्हाला तुमच्या धडावर असलेल डोकं वापरायला सांगतो.मी सांगतो म्हणून नाही तर मी जे सांगतो ते किंवा जे कुणीही सांगेल ते तुमच्या तर्काच्या, बुद्धीच्या कसोटीवर घासून पहा पटल तरच स्विकारा मी परमेश्वर आहे आणि माझ्या पायावर डोस्की आपटली कि मी तुम्हाला मोक्ष देतो असला काहीही भंपकपणा न करणारा हा धर्म संस्थापक वेगळाच. ज्या धर्मातून असमानता, विषमता, शोषण या सगळ्यांतून बुद्धाने बाहेर पडूनही त्या धर्माचा, माणसांचा द्वेष केला नाही तर प्रेमाचं तत्वज्ञान सांगितलं.
May 24, 2021 14 tweets 3 min read
!! शुरविर बाजी पासलकर !!

वीर बाजी पासलकर छ्त्रपतींच्या स्वराज्य संग्रामाचे पहिले सेनापती होय. छ्त्रपति शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापान केले, जगच्या इतिहासात एक तेजस्वी पर्व निर्माण केले, रयतेच्या या राजाने असामान्य साहसाचे, ऊत्कट देशभक्तीचे आणि रयतेच्या कल्याणासाठी Image कार्यरत राहण्याचे व्रत आंगिकारले. छ्त्रपति शिवरायांच्या स्वरज्य कार्यात प्रारंभी सहभागी झालेले बाजी पासलकर हे स्वरज्याचे पहिले सेनापती होते.

ह्या पराक्रमी पुरूषाचा इतिहास प्रेरणादायी असाच आहे.

बाजी पासलकर हे मोस मावळखोर्याचे वतनदार. निगडे मोसे गावापासून सागरून-डावेजापासून,
Apr 13, 2020 7 tweets 2 min read
आजही बौध्दांचे आणि अनुसचित जातीचे उध्दारकर्ते अशीच डाॅ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा माध्यमांनी तयार केलेली आहे.

आपल्याला महिती नसलेले बाबासाहेब...

१०२ वर्षांपुर्वी १९१८ साली त्यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा, त्यांच्यापुढच्या शेतीसमस्या मांडणारं पुस्तक लिहिलं. "स्मॉल होल्डींग्ज इन इंडीया अॅंड देअर रेमेडीज" त्यांचे हे पुस्तक किती शेतकरी लोकांना माहित आहे..?

शेतीवरचा बोजा कमी करा, एकच मुल शेतीत ठेवा, बाकीच्यांना तिथून बाहेर काढा नी उद्योग, व्यापार, शिक्षण, सेवा क्षेत्रात घाला. शेतीमालाला योग्य बाजारभाव, सिंचन आणि उद्योगाचा दर्जा मिळायला हवा. शेतकरी सुखी
Mar 8, 2020 17 tweets 4 min read
#महिलादिन_विशेष

पुण्याची आण - बाण - शाण आणि अभिमान वगैरे असणाऱ्या शनिवारवाड्यापासून पुढे चालत गेलं की अप्पा बळवंत चौक लागतो. तिथं पुस्तके मिळतात अर्थातच अभ्यासाची. तिथे पुस्तकाची खूप दुकाने आहेत. तशी ती सगळीकडेच असतात पण इथे जरा जास्तच तेथून थोडं पूढे गेलं कि श्रीमंतांचा सोनेरी सोनेरी दगडूशेठ हलवाई गणपती लागतो. तिथं नतमस्तक व्हायचं. म्हणजे तसा काही नियम नाही पण मागच्या चौकताला सिग्नंंल तोडून आलेला माणूसही आपलं जे काही दोन - चार चाकांचं वाहन असेल ते सावकाश करून मान झुकवून बाप्पाच्या पाया पडून पुण्य पदरात पाडून घेतो. आपल्या चांगल्या - वाईट कर्मांची
Feb 6, 2020 13 tweets 3 min read
आपल्या चौंसष्ट वर्षाच्या राज्यकारभारात जागतिक दर्जाचे काम करून देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा राजा #महाराजा_सयाजीराव_गायकवाड यांचा स्मृतीदिन...

महाराजा सयाजीराव गायकवाडांचे हिंदुस्थानातील काही पहिले आणि वेगळे प्रयोग...

▪महाराजा सयाजीराव ६४ वर्षे राज्य करणारे हिंदुस्थानातील एकमेव राजा आहेत.

▪सयाजीरावांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकशाही संविधानाचा पाया घातला.

▪स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांना हिमतीने मदत कळणारे ते एकमेव राजा होते.

▪देशातील बहुतांशी युगपुरूषांना सयाजीरावांनी वेळोवेळी मदत केली. पितामह नौरोजी, म. गांधी, ना. गोखले,
Dec 18, 2019 7 tweets 2 min read
सावरकरांची समुद्रात मारलेली उडी घराघरात पोहोचली पण अजूनही इंग्रजांना चुकवणार्या खालील 4 जणांच्या उड्या लोकांना माहीत नाही
1) क्रांतिसिंह नाना पाटील यांनी अटकेत असताना रेल्वेतून कृष्णेच्या पात्रात मारलेली उडी
2) वसंतदादा पाटील यांनी पाठीमागून सुरू असलेला इंग्रज पोलिसांचा गोळीबार चुकवत ( यात वसंतदादांचे 2 साथीदार शहिद झाले होते ) दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीत 40 फुटांवरून मारलेली उडी यावेळी कुंडल चे क्रांतिकारक मामासाहेब पवार यांचा ही सहभाग होता
3) सातारा सेल्युलर जेल फोडून नागनाथअण्णा नायकवडी यांनी कारागृहाच्या भिंतीवरून मारलेली उडी
4) आणखीन एक उडी
Sep 9, 2019 22 tweets 4 min read
#SaveForts
गडकिल्ले आणि त्याच्या रहाळातली जमीन विकून खाण्याची राजकीय- आणि व्यावसायिक वृत्ती नवी नाही. इतिहास- वारसा तुम्ही आम्ही कुरवाळत बसायचा. ज्यांना स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे ती लोकं "इतिहास- अस्मिता- वारसा" खरकटी हातं पुसायला वापरतात. सध्या गडकिल्ल्यांच्या बाजारीकरणाचा जो विषय सुरु आहे त्याचं मला कसलंही आश्चर्य वाटत नाही. गडकिल्ल्यासंबंधी बऱ्याच मोठ्या मोठ्या राजकारण्यांचे उंबरठे आजवर झिजवलेत, यांच्या खायच्या दातातला आणि दाखवायच्या दातातला फरक त्यांना स्वतःला माहिती नसेल एवढा जवळून पाहिलाय.