Nilesh Zalte Profile picture
पिहूचा बाबा ❤️ | Journalist | Digital Media | Translator | Producer at @mumbaitak (India Today) | Past: Abp Majha, Janshakti, Lokmat... (इथली मतं व्यक्तिगत.)
Mar 29, 2023 6 tweets 2 min read
सोपलांच्या धास्तीने बापट स्पोर्ट्स शूज घालून झोपायचे...

हा किस्सा खरोखर भन्नाटय..

खासदार गिरीश बापट आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांची जिगरी मैत्री. हे दोघेही एकत्र आले की हास्यकल्लोळ ठरलेला. असाच एक आठवणीतील किस्सा दिलीप सोपल यांच्या शब्दात. (1) 👇 '' नागपूर अधिवेशन काळातील हा प्रसंग. अधिवेशन काळात मॉर्निंग वॉकचा गिरीश बापट आणि मी संकल्प केला. बापट म्हणले चला सोपल स्पोर्ट शुज घेऊ. दोघांनी स्पोर्ट शूज घेतला. सकाळी ६ ला नागपूरच्या थंडीत मॉर्निंग वॉकला जायचेच असा निश्चय करून आम्ही आपापल्या रूमकडे गेलो. (2) 👇
Sep 1, 2021 7 tweets 2 min read
फ्रॉड करणाऱ्या लोकांचा एक वेगळाच स्वॅग असतो. यांची काही वैशिष्ट्य.

1. ही लोकं प्रचंड आत्मविश्वासानं डोळ्यात डोळं घालून खोटं बोलतात आणि ते अगदी सहज.
2. फेकायच्या बाबतीत जगातले सारे विक्रम मोडीत काढायची क्षमता यांच्यात असते.
(1)👇 यात घरं, गाड्या, पार्टनर्शीपसह बड्या बड्या ओळखी वगैरे प्रामुख्याने. बरं समोरच्याला माहीत असलं तरीही हे तीव्र पद्धतीनं फेकण्याची कला ढिल्ली सोडत नाहीत.
3. राहणीमान एकदम क्लास. म्हणजे घरात दरिद्री असली तरी सोशल मीडियात किंवा कुणाला भेटायचं असल्यास तरी प्रचंड काळजी घेतात.
(2)👇
Jul 13, 2021 10 tweets 3 min read
निळू फुले या नावाची, व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख करून द्यायची खरंतर गरज नाहीच. आजही खेड्यांमध्ये पन्नास ते नव्वदच्या दशकातील बायकांना निळू फुलेंबद्दल विचारलं तर त्या नाक मुरडतात, शिव्या देतात. प्रत्यक्ष आयुष्यात 'हिरो' असलेल्या निळूभाऊंच्या कामाची ही पावतीच.
(1)👇
#niluphule आपल्याकडे सरसकट 'बाई वाड्यावर या' हा डायलॉग म्हणजे निळू फुले असं समीकरण लोकांनी करून टाकलंय आणि कॉमेडी शोमध्ये लोक त्याच्याशी संबंधित फालतू विनोदांवर टाळ्याही वाजवतात हे दुर्दैव आहे.
आपणच आपल्या एका महान कलाकाराला किती खाली आणतोय याची त्यांना कल्पनाही नसते. (2)
👇
Jul 20, 2020 5 tweets 1 min read
कृपया हा थ्रेड नीट वाचावा.
हा माणूस आपल्यासारखं घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा नाही. 'अमक्या कार्यकर्त्यांनी धारावी कोरोनामुक्त केली, तमक्या साहेबांनी दौरे झोडले, दमक्या भाऊंनी ह्यांव केलं' अशा गोष्टी घरात बसून फॉरवर्ड करणाऱ्या लोकांनी ही त्यांनी मांडलेली गरज लक्षात घ्यावी. Image नाहीतर प्रेतं पुरायला, जाळायला जागा शिल्लक राहायची नाही. देव, अल्लाह, जीजस वगैरे सर्वव्यापी आहेत ना, मग त्यांनी निर्मिलेल्या या विश्वात महामारी येतेच कशाला? आणि आली तरी हे सगळे कुठं गेलेत?
कुणाच्याही धार्मिक भावनेला ठेस पोहोचवायची नाहीये, मंगेश दादाच्या मताशी पूर्ण सहमत आहे.