संध्याकाळची वेळ होती, मी माझ्या एका मित्राबरोबर सिंहगड रोड ने जात होतो, हिंगण्या च्या स्टॉप च्या अलीकडे एक किलोमीटर असताना पुढे वाहतुकीच्या कोंडी मुळे गाडी थांबवावी लागली, इतक्यात आमची नजर रस्त्यावर खडी फोडणाऱ्या कुटुंबाच्या पाला कडे गेली.
( पाल म्हणजे तात्पुरती ताडपत्रीची झोपडी ), तिथे तीन दगडाच्या मांडलेल्या चुलीसमोर त्या झोपडीची मालकीण भाकरी भाजत होती, नवरा शेजारच्या बाजेवर जुन्या वर्तमानपत्राचा चुरगळलेला कागद वाचत बसला होता,
त्या बाजेखाली त्याचा छोटा मुलगा एका तुटलेल्या खेळण्या बरोबर खेळण्यात दंग झाला होता,