राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मला काय दिले ?
कालच दहावीची परीक्षा दिलेला माझा धाकटा
मुलगा संघाचे पंधरा दिवसांचे शिबीर पूर्ण करून
परतला.आठ दिवस सातारा येथे प्राथमिक शिबीर झाले आणि नंतर लगेच विस्तारक म्हणून शिरवळ येथे फिल्डवर काम केले. तिथे तो वार लावून जेवला. @RSSorg#RSS
वरती पत्रा असलेल्या एका जुन्या वाड्यात राहिला.
तिथे त्याला स्वावलंबन शिकायला मिळाले.
गावातील अनेक लोकांकडे दिवसभर फिरून त्याने
अनेक ओळखी करून घेतल्या.
सायंकाळी लहान मुलांच्या शाखेत काम केल्याने
नेतृत्व कसे करावे हे त्याच्या लक्षात आले.