Dasarp Edihb Profile picture
intolerant of pseudo liberals/ seculars. शापादपि शरादपि
Jan 18, 2023 4 tweets 2 min read
मुलाच्या वयाच्या आणि बलात्कार, दहशतवाद इत्यादीचं आडून समर्थन करणाऱ्या #रियाझ_अली बरोबर रील मधे नाचायला #अमृता_फडणवीस यांना लाज नाही वाटली?

तरुण आहेत, स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या आहेत. त्यांना त्यांचे छंद जोपासायचा अधिकार आहे असं म्हणत मी आजवर समर्थन करत आलोय १/४ पण #उर्फी_जावेद च्या सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शन करत हिंडण्याला त्यांनी केलेलं समर्थन, संक्रांतीच्या दिवशी अत्यंत घट्ट कपडे घालून दिलेल्या शुभेच्छा आणि आता आलेला हा रियाज अली बरोबरचा रील पाहून बोलावं लागतंय.

अमृता ताई, जरा आवरतं घ्या. २/४
Dec 14, 2022 13 tweets 6 min read
भाजप सत्तेत असूनही असाच पुचाटपणा करत राहणार आहे का? नेत्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर स्कॅनर लावून त्यातील निवडक भाग काढून "अपमान अपमान" करत गदारोळ करण्याचा डाव शिवसेना-राष्ट्रवादी प्रणित मीडिया व त्यांची एकूणच इकोसिस्टीम यशस्वी करत असल्याचं दिसतं. १/१३ १. #चंद्रकांत_पाटील यांनी भीक शब्द वापरायला नको होता. वर्गणी शब्द योग्य झाला असता. पण बोलण्याच्या ओघात एखाद वेळी पटकन एखादा शब्द निसटतो. त्यांचं संपूर्ण भाषण ऐकल्यास #महात्मा_फुले यांचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू अगदीच नव्हता हे स्पष्ट होतं. २/१३
Sep 26, 2022 4 tweets 1 min read
"सुषमा अंधारे नवरात्र" हे तीन शब्द गुगल सर्च मध्ये टाका आणि या बाईंचे फुत्कार ऐका. ऐकून झाल्यावर आपल्या मित्र यादीतील आणि मोबाईल फोन बुक मधील प्रत्येक शिवसैनिकास ते व्हिडीओ पाठवा आणि त्याला विचारा हेच का तुमचं हिंदुत्व.

१/४ पक्षप्रमुख #उद्धव_ठाकरे एकीकडे मुंबादेवीच्या आणाभाका घेतात आणि दुसरीकडे हिंदूंच्या श्रद्धेची कुचेष्टा होईल, देवदेवतांची विटंबना होईल अशा भाषेत बोलणाऱ्या #सुषमा_अंधारे यांना पक्षात घेतात आणि लगेचच उपनेते पद बहाल करतात!

२/४
Sep 25, 2022 4 tweets 1 min read
कोण आहेत हे विचारवंत? फोटो त्यांचाच असेल तर वयाने ज्येष्ठ असावेत. मी त्यांच्या मुलाच्या वयाचा असेन पण तरीही अवधूत परळकर काकांना हे ४ प्रश्न विचारतो.

१. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया हे भारताची फाळणी होऊन निर्माण झालेले देश आहेत का?

१/४ २. इथे पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारे पाकिस्तानातून येऊन इथे स्थायिक झाले आहेत का?
३. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया हे भारताचे शत्रु देश आहेत का? भारत व या देशांमध्ये युद्ध झाले आहे का?
४. इथे पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्या व्यक्तींची मायभूमी पाकिस्तान आहे का?
२/४
Sep 9, 2022 6 tweets 3 min read
#याकूब_मेमन ला फाशी कोर्टाने दिली. भारताच्या कायद्यात फाशीनंतर मृतदेह समुद्रात फेकून देण्याची तरतूद नाही. त्यामुळे #आदित्य_ठाकरे यांनी कितीही दावा केला तरी याकूब मेमनचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना दिला गेल्यास त्याचा दोष तत्कालीन गृहमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांना जात नाही. १/३ परंतु निरपराध मुंबईकरांचे प्राण घेणाऱ्या याकूब मेमनची फाशी रद्द करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या #असलम_शेख यांना त्याच मुंबईचा पालकमंत्री करण्याचं पाप मात्र आदित्य ठाकरेंच्या वडिलांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत केलं. २/२
Jun 15, 2022 9 tweets 7 min read
#मराठा_आरक्षण मोर्चाच्या वेळी स्टेजवरून एक मुलगी "आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही" असं तत्कालीन मुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांना म्हणत होती तेव्हा आपण गप्प होतात, #सुप्रियाताई. मुख्यमंत्र्याला असं म्हणणं म्हणजे #महाराष्ट्राचा_अपमान आहे असं आपल्याला तेव्हा वाटलं नव्हतं. १/९ आज तुमच्या #अजितदादा ला, म्हणजेच उपमुख्यमंत्र्याला भाषण करायला मिळालं नाही तर तुम्हाला तो #महाराष्ट्राचा_अपमान वाटतोय? वा ताई वा! भले शाब्बास.

उपमुख्यमंत्री हे संविधनिक पद नाही. प्रोटोकॉलमधे त्याचा विचार झालाच पाहिजे अशी सक्ती नसावी. २/९
Nov 16, 2021 8 tweets 2 min read
काही धार्मिक धारणा म्हणा अथवा गैरसमजूत म्हणा परंतु वस्तुस्थिती ही आहे की बहुतांश मुस्लिम समाज रक्तदान अथवा मरणोत्तर देहदान त्याज्य (हराम) समजतो. अशी समजूत असणारे मुसलमान स्वतःचा अथवा आपल्या जिवलगाचा जीव वाचवताना दुसऱ्याचे रक्त वा अवयव घेण्याचे सुद्धा टाळत असेल का? १/८ तर अर्थातच त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि अगदी नाईलाजास्तव जर ते दुसऱ्याचे अवयव घेत असतील तर वरील वस्तुस्थिती पाहता ते अवयव एखाद्या हिंदूचे (काफिर) असण्याची शक्यताच जास्त. तर मग अशा वेळी एखाद्या काफिराचे अवयव आपल्या शरीरात जोडून घेणे हराम होत नाही का? २/८
Nov 16, 2021 7 tweets 1 min read
ज्या दिवशी महाराष्ट्राच्या सशस्त्र पोलीस दलाने नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे याचा खात्मा केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आदिवासींच्या एका जाहीर कार्यक्रमात शरद पवारांनी "अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही" अशा अर्थाचं एक विधान केलं. १/७ पवारांचं हे विधान एरवी कितीही सुयोग्य वाटलं तरी त्याचं टायमिंग बघता ते बुद्धीभेद करणारं ठरावं. पवारांना असं खरंच वाटत असेल तर त्यांनी मुक्तकंठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून वनवासी कल्याण आश्रमांद्वारे आदिवासीबहुल भागात जे मोलाचं काम केलं जातं त्याचं कौतुक करावं. २/७
Nov 15, 2021 4 tweets 1 min read
महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर एल्गार परिषद प्रकरणी अटक असलेल्यांची सुटका होण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न केले. या सरकारच्या काळात शहरी नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेचा सशस्त्र पोलीस दलाकडून खातमा करण्यात आला. राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यानी त्याबद्दल पोलीस दलाचं अभिनंदन केलं. बाबासाहेब पुरंदरेंवर नको तितकी खालच्या पातळीवरची टीका करणाऱ्या आणि त्यांच्या मृत्यू बद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या ब्रिगेडींना एरवी पाठीशी घालणाऱ्या शरद पवारांनी, सुप्रियाताईंनी व अजितदादांनी पुरंदरेंच्या देहावसनानंतर शोक व्यक्त केला.
Nov 15, 2021 4 tweets 1 min read
१. कित्येकांना २०१४ साली भारतात हुकुमशाही अवतरली असं वाटतं. एखादीला २०१४ साली भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं असं वाटत असेल तर त्यात एवढी आदळआपट करण्यासारखं काय आहे? २. खरं स्वातंत्र्य २०१४ मधे मिळालं असं कंगना म्हणाली तर फणकारणारेच जेव्हा कन्हैय्या छाप झोळीवाले अजूनही आझादी मागत असतात तेव्हा खुश होऊन टाळ्या पिटताना दिसतात.