संकेतस्थळ Profile picture
पुणे-कल्याण, विना मशागत शेती, ट्रेकिंग. आणि हे करत नसीन तेंव्हा CA, Investment Banker, Registered Valuer (SFA), Insolvency Professional
Nov 28, 2022 7 tweets 3 min read
ईडन हाझार्ड-एक शोकांतिका: चेलसी चा हिरो ते माद्रिद मध्ये पत गमावलेला एक खेळाडू हा प्रवास खूप क्लेशदायक आहे..तुम्ही एका ठिकाणी हिरो, लिजन्ड म्हणून असता. पण ड्रीम मूव्ह म्हणून ज्या क्लब मुळे तुम्ही एका फुटबॉल खेळाडू पासून लिजन्ड झाले. तो क्लब तुम्ही परमोच्च शिखरावर सोडता Some transfers are just not meant to be.. पुढील प्रवास हा एक चेलसी फॅन म्हणून खूपच कठीण आहे.. बर्नाबाऊ ला अनव्हेल केल्यावर अर्धा सिझन दुखपतीत गेला, रुजू झाला तेंव्हा वजन वाढलेले, फॉर्म गमावलेला..अश्यातच एक सीझन गेला.. नंतर मॅनेजर कारलो द बॉस आला..
Jun 29, 2022 21 tweets 3 min read
आनंदाचे डोही.. आनंद तरंग -१

जून महिना सुरू झाला की पावसा बरोबरच वेध लागतात ते आषाढी वारीचे.. गेली अनेक वर्षं वारीचा अनुभव घेतोय पण वृत्तपत्र, बातम्या, आणि अलीकडे फेसबुक दिंडी मार्गे. तसंच दर वर्षी माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी मार्गाचे आणि रोजच्या वाटचालीचा-मुक्काम विसावा-पुढील मुक्काम, गोल रिंगण-उभे रिंगण, नीरा स्नान, धावा या सर्व बातम्या वाचायचा माझा कयास असतो..
Jun 21, 2022 8 tweets 4 min read
आज माचीवरला बुधा वाचल्या नंतर पहिल्यांदा प्रवास करायचा योग आला.. आता पुण्याला आल्या नंतर.. इंद्रायणी/डेक्कन च्या ऐवजी सिंहगड पकडली..शिवाजी नगर ला पोहोचे पर्यंत पाऊस लागला..

कामशेत येई पर्यंत नुकत्याच सुरू झालेल्या पावसाच्या खुणा दिसत होत्या.. पेरणी केलेल्या भाताच्या दाढी हिरव्या कंच झाल्या होत्या. कामशेत स्टेशन शेजारची नदी अगदी तुडुंब भरली होती. पेरणी साठी पाणी सोडलं असावं बहुतेक.

लोणावळा सोडलं तसं आपोआप पाय डब्याच्या दाराजवळ आले. खंडाळा मागे पडल्यावर ट्रेन आणि अमृतांजन जवळील एक्सप्रेस वे चा पट्टा दृष्टीक्षेपात आला.
Jun 18, 2022 5 tweets 4 min read
माचीवरला बुधा आणि योगायोग:
काही दिवसांपूर्वी 'माचीवरल्या बुधा'शी ओळख @sunandanlele यांच्या एका व्हिडीओ ब्लॉग वरून झाली..त्या नंतर ट्विटर मित्र @amlya02 यांच्या संभाषणात देखील बुधाचा रेफरन्स आला, दुवा होता- प्रवासवरी मधील राजमाची चा उल्लेख
.. @sunandanlele @amlya02 उत्सुकता चाळवल्याने @amazonIN वरून मागवलं, थोडं वाचलं आणि थोडं @Storytel_In वर ऐकलं

गोनीदांच्या लिखाणात फक्त प्रवास वर्णनच नाही तर व्यक्ती वर्णन, प्राणी-पक्षी वर्णन एवढं जिवंत आहे की बुधा, राजमाची, टेम्बलयी चं पठार, बुधाचा कुत्रा, खारी, शेळ्या-मेंढ्या म्हैस डोळ्यासमोर उभे राहिले
Jun 7, 2022 7 tweets 2 min read
लॉक डाऊन च्या आधी लोकल आणि "फर्स्ट क्लास कट आणि हँडीकॅप्पड डब्बा" ह्या गोष्टी जगण्यातील अविभाज्य घटक होत्या.. सकाळी ऑफिस ला जाताना आधी ७.४४ जी कालांतराने ७.३४ झाली...कट डब्ब्यात चढून डब्याच्या शेवटच्या बाजूस ची विंडो म्हणजे ग्रुप ची फिक्स जागा.. येताना लोकल कुठलीही असली तरी डब्बा ठरलेला.. हँडीकॅप्पड सेक्शन च्या मागे जनरल.. इथे बसायचं कारण म्हणजे एगझिट ला लागून मोठ्ठी जाळी असल्याने हवेशीर जागा..

मुंबई लोकल ने खूप मित्र दिले ..असे मित्र जे फक्त लोकल पुरतेच मर्यादित न राहता मित्रांच्या परिवरासाहित एक मोठ्ठं कुटुंब झालं..
Jun 5, 2022 5 tweets 2 min read
#प्रवासडायरी आज कल्याण होऊन पुण्याला कोणार्क एक्सप्रेस नि यायचा योग आला.. सुटीचा शेवटचा दिवस असल्या मुळे तत्काळ मध्ये जे मिळालं ते काढलं.. घाटात उल्हास दरी आणि राजमाची परिसर सुंदर आणि झाडी देखील हिरवी गार होती. करपलेली जमीन पावसाची आतुरतेने पावसाची वाट पाहत होती पूर्वी कोड्रिंक वाले खूप असायचे..अल्युमिनियम ची बादली. त्यात बर्फ आणि भोवती गोल्डस्पॉट, मँगोला, लिम्का, एनर्जी च्या काचेच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंक वाला तो यायची दवंडी ओपनर नि बाटल्यांवर टिरनिंग-टिरनिंग आवाज करून पिटायचा. आता प्लास्टिक बाटल्यांच्या जमान्यात ते सगळं काळात जमा झालं
May 27, 2022 19 tweets 7 min read
@kreedajagat दुभाष्या (ट्रान्सलेटर) ते जग प्रसिद्ध आणि मुख्य म्हणजे कायम बातम्यांमध्ये असणे आवडणारा आणि भरमसाठ इगो असणारा (जे जोसे स्वतः मान्य करतो) आणि पोर्तो सारख्या टीम ला घेऊन युनायटेड ला हरवणारा अवलिया. कोणे एके काळी बार्सिलोनाचा सहा. प्रशिक्षक ते कट्टर शत्रू ही एक वेगळीच कथा @kreedajagat कधी खेळाडू म्हणून खास नव्हता... पण चांगला प्रशिक्षक होईल असे गुण आधी पासूनच जोसे कडे होते.. ज्या साठी त्याने व्यवसायिक प्रशिक्षण देखील घेतले. जोसे चे वडील देखील पोर्तुगाल मध्ये फुटबॉल प्रशिक्षक होते. जेंव्हा पोर्तो चे प्रशिक्षक म्हणून आले तेंव्हा पोर्तो चा संघ कामगिरी करत नव्हता