सारा..💫💫 Profile picture
मनांत येईल ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न कुणाला पटेल न पटेल याच्याशी मला काही देण घेणं नाही #सारा ❤️ #भटकंती #मनातलं #कोल्हापूरकर #लव्ह_रंकाळा #अधीर_मन
Apr 11, 2022 7 tweets 2 min read
बायको म्हणजे कोण???
बायको ह्या शब्दाला जर फोडले तर “बा” म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी “य” म्हणजे येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी आणि “को” म्हणजे कोणासाठीहि नाही तर फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी! सुख दुःखात साथ देणारी म्हणून तिला बायको असं म्हंटलं जात मैत्रिणीला सहज समजून घेतलं जातं पण बायकोला मैत्रिण बनवलं तर आयुष्य किती सुंदर होईल शेवटी नवऱ्यापेक्षा अधिक जवळचा मित्र तिच्यासाठी कोण असेल बाहेर मैत्री आणी मैत्रिणी शोधण्यापेक्षा बायको मध्येच
Apr 26, 2021 13 tweets 4 min read
आजही आपल्या भारतभुमीकडे पाहीलं तर एक गोष्ट जी भारतीय समाजव्यवस्थेला वाळवीप्रमाणे खाते ती म्हणजे जातीप्रथा.हे जातीव्यवस्थेचं मूळ उपटण्यासाठी महाराष्ट्रात भागवतधर्मी संतांनी अतोनात प्रयत्न केलेले दिसतात.काही संत तर याच व्यवस्थेने वाळीत टाकले,त्यातील एक होते #संत_चोखामेळा..! (१/१३) तेराव्या ( इसवी सन १३०० ) शतकात उदयास आलेल्या निस्सीम विठ्ठल भक्ताबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच! ज्ञानदेवांनी संत लोकशाहीचा पाया रोवला होता.तोच भागवतधर्म नामदेवांनी आणि चोखामेळा यांनी तत्कालीन उपेक्षित ठेवलेल्या समाजापुढे आणून ठेवण्याचं काम चोखपणे पार पाडलं. (२/१३)
Apr 7, 2021 11 tweets 3 min read
दिनकरराव जवळकर आणि र. धो कर्वेंच्या वादग्रस्त खटल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढवलेल्या तिसर्‍या खटल्याबाबत खूपच कमी जणांना ठाऊक आहे. तर खटला चालला होता फिलीप स्प्रॅट या ब्रिटिश लेखकावर! फिलीप स्प्रॅट ( २६ सप्टेंबर १९०२ - ८ मार्च १९७१ ) हा ब्रिटिश लेखक होता. (1/11) Image फिलीप हा कम्युनिस्ट होता, फिलीपला ब्रिटिश आर्म ऑफ कम्युनिस्ट इंटरनॅशनल ने भारत आणि मॉस्को येथे कम्युनिझमचा प्रचार प्रसार करण्यासाठी पाठवलं होतं. फिलीप हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक मनबेंद्रनाथ रॉय यांचे मित्र आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सभासद होते. (2/11)