Satej (Bunty) D. Patil Profile picture
MLC | Legislative Party Leader, INC Maharashtra | President, Fencing Association of India | President, Kolhapur District Congress Committee | Educationist |
May 15, 2022 7 tweets 4 min read
कोल्हापूर जिल्ह्याच्या हरित व औद्योगिक क्रांतीचा पाया रचण्यामध्ये अग्रस्थानी असलेल्या राधानगरी धरण येथे उभारण्यात आलेल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्राचे उदघाटन आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. राधानगरी धरण व राधानगरी गावाचे निर्माते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या आठवणींच्या पाऊलखुणा या परिसरामध्ये आपल्याला जागोजागी नजरेस पडतात.
May 15, 2022 11 tweets 5 min read
नवी आशा आणि नवी दिशा घेऊन वाटचाल करणाऱ्या दक्षिण भारत जैन सभा शताब्धी अधिवेशन (त्रैवार्षिक) चा मुख्य सोहळा आज मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. दक्षिण भारत जैन सभेची स्थापना ३ एप्रिल १८९९ रोजी कर्नाटकातील श्री क्षेत्र स्तवनिधी येथे झाली. सभेला १२३ वर्षाची झाली असून समाजाला विधायक वळण देणाऱ्या अधिवेशनांची शंभरी गाठली आहे. हे ऐतिहासिक शंभरावे अधिवेशन जैन समाज ऐक्य व अस्मितेच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे.
May 14, 2022 5 tweets 3 min read
आपत्तीवेळी शहरातील उंच इमारतींमधून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे जपान येथील कंपनीकडून खरेदी केलेल्या अद्ययावत 55 मीटर उंचीची शिडी असणारे 'टर्न टेबल लॅडर' अग्निशामक वाहनाचे आज लोकार्पण करण्यात आले. @mrhasanmushrif महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे अकरा मजल्यावरील इमारतीत आपत्ती घडल्यास बचावकार्य करण्यात मर्यादा येत होत्या. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहराची गरज लक्षात घेता राज्य शासन आणि मनपा यांच्या प्रत्येकी रु. ५ कोटी ५० लाख निधीतून हे वाहन खरेदी करण्यात आले आहे.
May 14, 2022 4 tweets 1 min read
अभिमानस्पद!

कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा रोवला असून अशी कामगिरी करणारी कस्तुरी ही पहिली कोल्हापूरकर बनली आहे. आज तिच्यासह जगभरातील वीस गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले असून या टीममध्ये ती एकमेव भारतीय आहे. #Brand_Kolhapur रणरागिणी महाराणी ताराराणी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या आपल्या कोल्हापुरातील कुस्तुरीने एवढ्या लहान वयात अशी सुवर्ण कामगिरी केल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन!
May 13, 2022 7 tweets 2 min read
शिवाजी विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इन्क्युबेशन इन सेरीकल्चर, प्राणीशास्त्र अधिविभागाच्या वतीने आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या सहकार्यातून उभारलेल्या ‘रेशीम शेती फिरत्या प्रयोगशाळे’चे लोकार्पण आज करण्यात आले. शेतीच्या बांधापासून रेशीम निर्मितीपर्यंत असा एक अनोखा आणि महत्त्वपूर्ण उपक्रम शिवाजी विद्यापीठाने हाती घेतला. त्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता आणि प्रशिक्षण अशा दोन्ही अंगाने विकास करण्यासाठी खास शेतकऱ्यांसाठी पदविका अभ्यासक्रम आखून त्याअंतर्गत सातत्याने मार्गदर्शन केले आहे.
Apr 24, 2021 11 tweets 2 min read
Do you remember paying even a penny for the Polio vaccine?

Do you remember @nsitharaman Ji had kept 35000 Cr for vaccination in India and committed to more funding if required? #FreeVaccineforAll 1/n As per the latest data, we still need 120 Cr Jabs for the 60 Cr eligible population for vaccination. Which should cost not more than 24,000 Cr as per the current rates given to govt by Manufacturers. 2/n
Apr 23, 2021 4 tweets 1 min read
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना आणि लसीकरण मोहिमेबद्दल आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आणि लसीकरणासंदर्भात सविस्तर माहिती घेतली. पन्हाळा तालुक्यात सध्या १५० बाधित रुग्ण आहेत. परंतु, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिंटमेंट या त्रिसुत्रानुसार 'अर्ली ट्रेसिंग आणि अर्ली ट्रिंटमेंटवर' भर देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
Apr 23, 2021 4 tweets 1 min read
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आणि जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी आणि कोल्हापूर जिल्ह्याला होणार पुरवठा याबाबी विचारात घेऊन आवश्यक ऑक्सिजन पुरवठा वेळेत उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
Dec 20, 2020 4 tweets 1 min read
आज २० डिसेंबर, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतिदिन. यानिमित्त त्यांच्या नावाने वसविण्यात आलेल्या टोप संभापूर येथील त्यांच्या समाधी मंदिराला भेट देऊन अभिवादन केले. करवीरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी इ.स. १७१४ ते इ.स.१७६० पर्यंत तब्बल ४६ वर्षे राज्य केले. इ.स. १७१८ च्या सुमारास कोट कोल्हापूर, पन्हाळा, राजापूर, नरगुंद, तोरगल, कोपल, तारळे, आजरे, बेळगाव आणि कुडाळ अशा १० सुभ्यासह एकूण ४६ किल्ले त्यांच्या ताब्यात होते.