विज्ञानवादी संत तुकाराम....
संत तुकारामांनी आपल्या अभंगातून विज्ञाननिष्ठ विचारमंच समाजाची पेरणी केली आहे. आज विज्ञान युगात लोक अंगारा देवून, प्रसाद देवून आंबा देवून तुम्हाला मुलगा होईल अशा अंधश्रद्धा वाढीस लावणारा सल्ला, आशिर्वाद देतात.
त्या ढोंगी प्रवृत्तीवर संत तुकारामांनी नेहमीच हल्ला चढविला आहे. माणसाने श्रद्धा ठेवावी, अंधश्रद्धा बाळगू नये. शिकलेली माणसं जेंव्हा अशा भोंदू वैद्य, बाबांच्या नादी लागतात. स्रिया आपली फसवणूक करून घेतात. त्याच विचाराला धक्का देवून महाराज म्हणतात.