शेत विकून शिकलोय,
कर्ज काढून फीस भरलोय,
दोन चार पगारीने कर्ज तरी फिटू दे
घाई कशाला करते,
घेईन की ग घर!
२५ वर्ष कुटुंब सोडलोय,
जेमतेमीतून वर आलोय,
स्टेशन वरती रात्र काढलोय,
तू फ्लॅट आहे का विचारतेस?
थोडं दमान घे,
तुला शोभेल अस सुंदर, मी घेईल की घर!
#म #लगीन #मराठी #हुंडा १/६
बेरोजगारीच्या काळात,
लेऑफ च्या ट्ट्रेण्ड मधे,
टिकलोय माझ्या नोकरीमध्ये,
थोड मला मोठ होऊ दे,
मी घेईल की राव घर.
तू शिकलेली आहेस,
तू समजुतदार आहेस,
तुलाबी तेवडाच पगार,
मलाबी तेवडाच,
मग तू घेतलंय का ग घर?
तरीबी मला घराची अट घालतेस,
तू नसेल घेतल तर असुदे, मी घेईल की घर!
#म #मराठी
२