Supriya Sule Profile picture
Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements
Apr 6, 2021 5 tweets 1 min read
औरंगाबाद येथील मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा पद्मश्री फातिमा झकेरिया यांच्या निधनाची वार्ता माझ्यासाठी अतिशय दुःखद आहे. त्यांच्याशी माझे वैयक्तिक,कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले आहेच याशिवाय मराठवाडा व महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले.
रफिक झकेरिया यांच्यानंतर फातिमा मॅडम यांनी मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या कार्याचा भार अतिशय समर्थपणे पेलला.
Apr 6, 2021 5 tweets 2 min read
#COVIDー19 ची दुसरी लाट आली असून विषाणूंचा वेगाने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर आदरणीय @PawarSpeaks साहेबांनी @NCPspeaks चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या कठीण काळात कशा पद्धतीने कार्यरत रहावे याबाबत पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आपणा सर्वांना प्रशासकीय यंत्रणांनी वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे.याशिवाय मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यासोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या तत्वाचे काटेकोर पालन करण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे.
Jan 11, 2021 13 tweets 2 min read
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या विविध कामांसाठी पुणे येथे रेल्वेच्या विभागीय अधिकारी रेणू शर्मा यांच्यासोबत बैठक झाली.यावेळी प्रवाशांची सुरक्षा व सुविधा आदी मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी ही प्रवाशांच्या मागणी रेल्वे खात्याकडे मांडली. ही गाडी सुरु झाल्यास प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्यास मदत होईल.याशिवाय प्रदूषणही कमी करता येऊ शकेल.
Jan 11, 2021 4 tweets 1 min read
रविवार, दि.१७ जानेवारी २०२१ पासून महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी व्याख्याने माझ्या फेसबुक पेजवर पाहणार आहोत. महात्मा फुले यांची वैचारीक जडण-घडण, अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य, स्त्रीशिक्षण व इतर शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, सत्यशोधक समाज, यासोबत त्यांचे साहित्यिक कार्य यांसारख्या विविध पैलूंचा सर्वांगिण आढावा घेणारी नामवंत लेखक, साहित्यिक व अभ्यासकांची व्याख्याने (cntd)
Jan 9, 2021 4 tweets 1 min read
अहमदनगर शहराची खास ओळख असणारी व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (व्हिआरडीए) ही संस्था चेन्नई येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याचे वृत्त वाचण्यात आले.ही संस्थेचा अहमदनगर शहराच्या विकासात अतिशय मोलाचा वाटा असून १९४७ पासून ही संस्था येथे अतिशय उत्तम रीतीने काम करीत आहे. येथील व्हिआरडीएच्या अखत्यारीतील प्रयोगशाळेने आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण संशोधने केली आहेत.देशाच्या संरक्षण विभागासाठी आवश्यक असलेली वाहने आणि इतर आवश्यक सामुग्री येथे विकसित झाली आहे.याशिवाय वाहनांची गुणवत्ता तपासून त्यांना प्रमाणित करणारा विशेष ट्रॅकही या संस्थेत आहे.